Blog Views

श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह


🟠🚩पुजा साहित्य यादी :

हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांडे, तांब्या, ताम्हण, नारळ-१, हार, फुले, केवडा, कमळ, सुट्टे पैसे/नाणी, *"जानवे जोड"*, दूर्वा, बेल, तुळशी, पत्री, (आघाडा, केणा, शमीपत्र, हराली), पाट/आसने, खारीक, बदाम, सुपाऱ्या, हळकुंडे (प्रत्येकी ५), विड्याची पाने १५, पळी भांडे, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर), उदबत्ती/धुप, कापूर, कापसाचे गेजवस्त्र/वस्त्रमाळ, फळे ५ प्रकरची, (सिझनेबल)

👏👏👉 गणपतीचे तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला होईल अशी आरास करावी. क्वचित उत्तरेला चालेल परंतु त्यावेळी पूजा करणाऱ्या व्यक्तीने तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला होईल असे बसावे.
गणपतीसमोर २ पानांचे ५ विडे मांडावेत.  देठ देवाकडे करावेत. त्यावर खारीक, बदाम, सुपाऱ्या, हळकुंडे व सुट्टे पैसे ठेवावेत. आपल्या समोर डाव्या हाताला पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा. डाव्या हाताशी पळी- भांडे ताम्हण व उजव्या हाताला पूजा साहित्याचे ताट ठेवावे. गणपतीच्या मूर्ती खाली पाटावर वस्त्र घालावे व थोड्याशा अक्षदा ठेवाव्यात.  ही सर्व तयारी पुरेशी आधी करावी म्हणजे पूजेच्या वेळी धावपळ/चिडचिड होणार नाही.

🔸 आचमन:

डाव्या हातात पळी/(चमचा) घेऊन उजव्या हातावर पाणी घ्यावे.  पहिल्या तीन नावांनी पाणी प्यावे.

१) केशवाय नमः
२) नारायणाय नमः
३) माधवाय नमः
चवथ्या नावाला पाणी हातावरुन सरळ ताम्हणात सोडावे.
४) गोविंदाय नमः।
पुन्हा पहिल्या तीन नावांनी पाणी प्यावे चवथ्या नावाला हातावरुन सरळ ताम्हणात सोडावे.
नंतर पुढील नावे म्हणावीत.
५) विष्णवे नमः।
६) मधूसूदनाय नमः।
७) त्रिविक्रमाय नमः।
८) वामनाय नमः।
९) श्रीधराय नमः।
१०) हृषीकेषाय नमः।
११) पद्मनाभाय नमः।
१२) दामोदराय नमः।
१३) संकर्षणाय नमः ।
१४) वासुदेवाय नमः।
१५) प्रद्युम्नाय नमः।
१६) अनिरुद्धाय नमः।
१७) पुरुषोत्तमाय नमः।
१८) अधोक्षजाय नमः।
१९) नारसिंहाय नमः।
२०) अच्युताय नमः।
२१) जनार्दनाय नमः।
२२) उपेंद्राय नमः।
२३) हरये नमः।
२४) श्रीकृष्णाय नमः।
यानंतर मनामध्ये गणपती, कुलदेवता, आई वडिल गुरुंचे स्मरण करुन नमस्कार करावा. एक विडा देवापुढे ठेवून देवांना व घरातील वडीलधारी मोठ्याना नमस्कार करावा व पूजेला सुरुवात करावी.

🔸 श्रीमन्महागणपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। एतद् कर्मप्रधानदेवता श्रीपार्थिव सिद्धीविनायकाय नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। अविघ्नमस्तु।

🔸संकल्प : आता उजव्या हातामध्ये थोड्या अक्षता घेऊन पुढील संकल्प करावा. श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णा वेण्ण्याः उत्तरे तीरे शालिवाहन शके रामक्षेत्रे राम रामाश्रमे अस्मिन् वर्तमाने पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ इंदूवासरे आद्यापूर्व उच्चारीत वर्तमान एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं (आपल्या गोत्राचा उच्चार करावा; गोत्र माहित नसल्यास काश्यप गोत्र घ्यावे) अहं अस्माकं सकल कुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं श्री सिद्धिविनायक कृपाप्रसाद प्राप्त्यर्थं प्रति वार्षिक विहितं पार्थिव सिद्धिविनायक व्रत अंगत्वेन श्री पार्थिव सिद्धीविनायक देवता प्रीत्यर्थं यथाशक्ति यथाज्ञानेन यथामिलित सामग्र्यां प्राणप्रतिष्ठापना पूर्वकं ध्यान आवाहनादि षोडशोपचार पूजनं अहं करिष्ये । हातावर पाणी घेऊन अक्षता ताम्हणात सोडाव्यात. आदौ निर्विघ्नता सिद्यर्थं महागणपति पूजनं/स्मरणं करिष्ये । पुन्हा एकदा हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.
🔸(आमच्या घरातील सर्वांना दीर्घायुष्य, आरोग्य, सुख-शांति, समाधान, ऐश्वर्य प्राप्त व्हावे म्हणून मी हे व्रत करत आहे, अशी भावना मनात ठेवावी.)

उजव्या हाताला तांदळावर एक सुपारी ठेवून त्याची गणपती समजून पुजा करावी. किंवा शक्य नसल्यास फक्त गणपतीचे स्मरण करुन नमस्कार करावा.

श्री महागणपतये नमः । ध्यायामि । सुपारीला अक्षता वहाव्यात.
श्री महागणपतये नमः । आवाहयामि। पुन्हा अक्षता वहाव्यात. श्री महागणपतये नमः । गंध अक्षता पुष्पं समर्पयामि । एक फूल गंध अक्षतात बुडवून वहावे श्री महागणपतये नमः । हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि । हळदी कुंकु वहावे.
श्री महागणपतये नमः । दुर्वांकुरं विल्वदलं पुष्पाणि च समर्पयामि । दुर्वा, बेल व फुले वहावीत.
श्री महागणपतये नमः । धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि । उदबत्ती नीरांजन ओवाळावे / दोन वेळा ताम्हणात पाणी सोडावे. श्री महागणपतये नमः । गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि । गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.
श्री महागणपतये नमः । मुखवासार्थे पूगीफल तांबूलं सुवर्ण पुष्प दक्षिणां समर्पयामि । पुढच्या विड्यावर व फळावर थेंबभर पाणी घालावे. श्री महागणपतये नमः । मंत्राक्षतां समर्पयामि । अक्षता वहाव्यात. श्री महागणपतये नमः । प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि । नमस्कार करावा.  अनेन कृत पूजनेन श्री महागणपती प्रीयताम् । हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.

🔸कलशपूजा :
कलशस्य मुखे विष्णु: कंठे रुद्र: समाश्रित: मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा: स्मृता: ॥
कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा। ऋग्वेदोऽथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथर्वण:। अंगैश्च सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिताः । अत्र गायत्री सावित्री शांतिः पुष्टिकरी तथा । आयांतु देव  पूजार्थ दुरितक्षयकारकाः ॥
गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वती । नर्मदे, सिंधु, कावेरि जलेऽस्मिन्‌ सन्निधिं कुरु || श्रीवरुणाय नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि ॥
शुद्ध पाण्याने भरलेल्या कलशाला गंध, अक्षता व फुले वाहावी.

🔸शंखपुजा :
शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता । पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगासरस्वती ॥ त्वं पुरा सागरोत्पन्नौ विष्णुना विधृतः करे । अग्रतः सर्वदेवानां पांचजन्य  नमोऽस्तुते ॥
शंखदेवयायै नमः । सर्वोपचारार्थे गंध-पुष्प-तुलसीपत्रं समर्पयामि ॥
गंध, फुले, तुलसी शंखाला अर्पण करावी.

🔸घंटापूजा :

आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां । कुर्वे घंटा रवं तत्र देवताऽव्हानलक्षणम्‌ ॥
घंटायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥
घंटेला गंध, अक्षता, फुले वाहावी व घंटा वाजवावी.

🔸दीपपूजा :

भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यः । अतस्त्वां स्थापयाम्यत्र मम शांतिप्रदो भवो ॥ दीपदेवतायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥
समईला गंध, अक्षता, फूल वाहावे. नमस्कार करावा.
ह्यानंतर कलश, शंख, घंटा व दिव्याची गंध अक्षता फूल वाहून पूजा करावी व नमस्कार करावा.
पूजा केलेल्या कलशातील पाणी फुलाने किंवा तुळशीच्या पानाने स्वतःच्या अंगावर, मूर्तीवर आणि पूजा साहित्यावर शिंपडावे. नंतर गणपतीच्या मूर्तीवरील रुमाल/वस्त्र काढावे व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.

🔸👏 प्राणप्रतिष्ठापना :

सर्व प्रथम ह्या निर्जीव असणाऱ्या मातीच्या मूर्तीत देवाचे हात,पाय, डोळे इ. एकेक अवयव साकार होत आहेत आणि मूर्तीमध्ये प्राण येऊन ती सजीव होत आहे अशी मनामध्ये भावना करावी. मूर्तीच्या हृदयाला आपला उजवा हात लावून ठेवावा व पुढील मंत्र म्हणावा.

औं आं -हीं क्रों । अं यं रं लं वं शं सं हं ळं क्षं अः । क्रों -हीं आं हंसः सोऽहम् ॥ अस्यां मूर्तौ प्राण इह प्राणाः ॥
औं आं -हीं क्रों । अं यं रं लं वं शं सं हं ळं क्षं अः । क्रों -हीं आं हंसः सोऽहम् ॥ अस्यां मूर्तौ जीव इह स्थितः ॥
औं आं -हीं क्रों । अं यं रं लं वं शं सं हं ळं क्षं अः । क्रों -हीं आं हंसः सोऽहम् ॥ अस्यां मूर्तौ सर्वे इंद्रियाणि सुखं चिरं तिष्ठंतु नमः ॥

गर्भादानादि पंधरा संस्कार पूर्ण व्हावेत म्हणून पंधरा वेळा ‘-हीं ’ चा जप करावा .
नंतर देवाच्या दोन्ही डोळ्यांना दूर्वाच्या काडीने तूप लावावे.

’श्री सिद्धिविनायकाय नमः ’ असे म्हणत गंध अक्षता फूल हळदी-कुंकु वहावे. 'श्री सिद्धिविनायकाय नमः’ धूप समर्पयामि । दीपं दर्शयामि । असे म्हणत दोन वेळा ताम्हणात पाणी सोडावे. गुळखोबरे अथवा खडीसाखर किंवा साध्या साखरेचा नैवेद्य दाखवावा.
पुढच्या विड्यावर पाणी सोडून देवाला नमस्कार करावा.
अनेन कृत पूजनेन श्री सिद्धिविनायकः प्रीयताम् । असे म्हणून ताम्हणात एकदा पाणी सोडावे.

🔸षोडशोपचार पूजन :
हातामध्ये दूर्वा किंवा अक्षता घेऊन मनामध्ये गणपतीचे ध्यान करावे,
एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं । पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ॥

श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। ध्यायामि । दूर्वा किंवा अक्षता गणपतीच्या मूर्तीवर वहाव्यात, श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि । अक्षता वहाव्यात. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। आसनार्थे अक्षतां समर्पयामि । अक्षता वहाव्यात. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। पाद्यं समर्पयामि । फुलाने/दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। अर्घ्यं समर्पयामि । गंध अक्षता मिश्रित पाणी शिंपडावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। आचमनीयं समर्पयामि । फुलाने / दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। स्नानं समर्पयामि । फुलाने / दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। पंचामृत स्नानं समर्पयामि । फुलाने पंचामृत शिंपडावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। गंधोदक स्नानं समर्पयामि । फुलाने गंधमिश्रित पाणी शिंपडावे.  श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। शुद्धोदक स्नानं समर्पयामि । फुलाने/दूर्वाच्या काडीने पाणी शिंपडावे.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। पूजार्थे गंध अक्षता पुष्पं समर्पयामि । देवाला गंध, अक्षता, फूल वहावे.  श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। हरिद्रा कुंकुमं समर्पयामि। हळदी कुंकु वहावे. श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि । उदबत्ती निरंजन ओवाळून
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नैवेद्यार्थे पंचामृत नैवेद्यं समर्पयामि। पंचामृताचा नैवेद्य दाखवावा  श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। पूगीफल तांबूल सुवर्णपुष्प दक्षिणां समर्पयामि। पुढच्या विड्यावर पाणी घालावे.  श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। मंत्राक्षतां समर्पयामि। अक्षता वहाव्यात.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि। देवाला नमस्कार करावा.  अनेन पंचामृत पूजनेन श्री सिद्धिविनायकः प्रीयताम् । ताम्हणात एक पळीभर पाणी सोडावे.

🔸अभिषेक :

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थसिद्धये ॥ १॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः । न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् । पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् । संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥
अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् । तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥

किंवा

🔸अथर्वशीर्ष:
गणपति अथर्वशीर्ष

ॐ नमस्ते गणपतये।
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि।।
त्वमेव केवलं कर्त्ताऽसि।
त्वमेव केवलं धर्तासि।।
त्वमेव केवलं हर्ताऽसि।
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि।।
त्वं साक्षादत्मासि नित्यम्।
ऋतं वच्मि।। सत्यं वच्मि।।
अव त्वं मां।। अव वक्तारं।।
अव श्रोतारं। अवदातारं।।
अव धातारम अवानूचानमवशिष्यं।।
अव पश्चातात्।। अवं पुरस्तात्।।
अवोत्तरातात्।। अव दक्षिणात्तात्।।
अव चोर्ध्वात्तात।। अवाधरात्तात।।
सर्वतो मां पाहिपाहि समंतात् ।।3।।
त्वं वाङग्मयचस्त्वं चिन्मय।
त्वं वाङग्मयचस्त्वं ब्रह्ममय:।।
त्वं सच्चिदानंदा द्वितियोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि |।4।|
सर्व जगदि‍दं त्वत्तो जायते।
सर्व जगदिदं त्वत्तस्तिष्ठति।
सर्व जगदिदं त्वयि लयमेष्यति।।
सर्व जगदिदं त्वयि प्रत्येति।।
त्वं भूमिरापोनलोऽनिलो नभ:।।
त्वं चत्वारिवाक्पदानी ।।5।।
त्वं गुणयत्रयातीत: त्वमवस्थात्रयातीत:।
त्वं देहत्रयातीत: त्वं कालत्रयातीत:।
त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं।
त्वं शक्ति त्रयात्मक:।।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यम्।
त्वं शक्तित्रयात्मक:।।
त्वां योगिनो ध्यायंति नित्यं।
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं।
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम् ।।6।।
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं।।
अनुस्वार: परतर:।।
अर्धेन्दुलसितं ।।
तारेण ऋद्धं।। एतत्तव मनुस्वरूपं।।
गकार: पूर्व रूपं अकारो मध्यरूपं।
अनुस्वारश्चान्त्य रूपं।। बिन्दुरूत्तर रूपं।।
नाद: संधानं।। संहिता संधि: सैषा गणेश विद्या।।
गणक ऋषि: निचृद्रायत्रीछंद:।। ग‍णपति देवता।।
ॐ गं गणपतये नम: ।।7।।
एकदंताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदंती प्रचोद्यात।।
एकदंत चतुर्हस्तं पारामंकुशधारिणम्।।
रदं च वरदं च हस्तै र्विभ्राणं मूषक ध्वजम्।।
रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्।।
रक्त गंधाऽनुलिप्तागं रक्तपुष्पै सुपूजितम्।।8।।
भक्तानुकंपिन देवं जगत्कारणम्च्युतम्।।
आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृतै: पुरुषात्परम।।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनांवर:।। 9।।
नमो व्रातपतये नमो गणपतये।। नम: प्रथमपत्तये।।
नमस्तेऽस्तु लंबोदारायैकदंताय विघ्ननाशिने शिव सुताय।
श्री वरदमूर्तये नमोनम: ।।10।।

देवाला वाहिलेले फूल उचलून त्याचा वास घेऊन उत्तर दिशेला टाकावे व अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र (प्रणम्य शिरसा देवं) म्हणत देवाला अभिषेक करावा. दोन्ही येत नसल्यास २१ वेळा "गं गणपतये नमः" असे म्हणत अभिषेक करावा.  नंतर देवाला फुलाने वासाचे तेल किंवा अत्तर लावून किंचित गरम पाणी शिंपडावे व पुन्हा चांगले पाणी शिंपडावे. मूर्ती हलक्या हाताने स्वच्छ पुसुन जागेवर ठेवावी. पुढील पूजा करण्यापूर्वी मूर्ती नीट योग्य ठिकाणी बसली आहे ह्याची खात्री करावी. कोणत्याही कारणास्तव पुन्हा मूर्ती हलवू नये.

श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। सुप्रतिष्टितमस्तु । (अक्षता वहाव्यात ) श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। वस्त्र उपवस्त्रं समर्पयामि । ( प्रत्यक्ष वस्त्र किंवा अक्षता वहाव्यात)
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। यज्ञोपवीतं समर्पयामि । (चित्रात दाखविल्याप्रमाणे गणपती देवाच्या डाव्या खांद्यावरुन उजवीकडे "जानवे" घालावे.  नसल्यास अक्षता वहाव्यात.) श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि । (गंध लावावे)
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि । (अक्षता वहाव्यात)
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। हरिद्रा कुंकुमं समर्पयामि । (हळदी कुंकु वहावे)
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नानाविध परिमल द्रव्याणि समर्पयामि । (शेंदूर, गुलाल, बुक्का इ. वहावे)
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। नानाविध पुष्पाणि पुष्पमालां च समर्पयामि । (फुले वहावीत व हार घालावा)

यानंतर निरांजन/कापूर लावून आरती करावी.
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। प्रदक्षिणापूर्वक नमस्कारं समर्पयामि । (प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा)
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि । (हातात फुले व अक्षता घेऊन मंत्रपुष्पांजली म्हणून ती फुले वहावीत. मंत्रपुष्पांजली येत नसल्यास ’वक्रतुंड महाकाय' श्लोक म्हणावा)

यानंतर पुढील मंत्र म्हणून नमस्कार करावा.
आवाहनं न जानामि न जानामि तव अर्चनं । पूजां चैव जानामि क्षम्यतां परमेश्वर ॥
श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि ।

👏👏(पूजा कशी करायची मला माहित नाही. जसे माझ्या मनात आले तशी मी केली. काही चुकले असेल राहिले असेल तर माफ करा आणि सर्वांच्या घरात कायम सुख शांती समृद्धी राहू दे अशी प्रार्थना करावी.)

सर्वांनी श्रद्धापूर्वक तीर्थ प्रसाद घ्यावा.

पूजेचे संपूर्ण फल प्राप्त व्हावे यासाठी गुरुजींना दक्षिणा व तुपात तळलेल्या मोदकाचे वायन द्यावे.

🔸दररोजची पूजा :
(जितके दिवस आपल्या कुळातील नियम असेल त्यानुसार दररोज दोन्ही वेळा पुजा आरती करावा, घरातील शिजवलेल्या अन्नाचा बाप्पाला नैवेद्य दाखवावा, उपाशी ठेवु नये कारण आपण आव्हान करुन त्यांना आपल्या घरी बोलावले आहे,🙏🏻🙏🏻

श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः। या मंत्राने दररोज सकाळ - संध्याकाळ गंध, अक्षता, फुले, दुर्वा वाहून पूजा करावी.
उदबत्ती निरंजन ओवाळून नैवेद्य दाखवावा व आरती करावी.

🔸उत्तरपूजन : अनंत चतुर्दशी

श्री पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थं यथाशक्ती उत्तरपूजनं अहं करिष्ये असा संकल्प सोडून गंध, अक्षता, फुले, दुर्वा वाहून पूजा करावी. उदबत्ती निरंजन ओवाळून दही पोहे/दही भात किंवा खिरापत इ. नैवेद्य दाखवावा व आरती करावी.

यांतु देवगणाः सर्वे पूजां आदाय पार्थिवीम् । इष्ट कामना सिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ॥

ह्या मंत्राने अक्षता वाहून मूर्ती थोडीशी उत्तर दिशेला हलवावी. नंतर विसर्जना करिता नदी अथवा जलाशयावर घेऊन जावी. किंवा मातीची मुर्ती असेल तर मोठ्या कुंडीमधे पाणी घालुन,  घरीच विर्सजन करावे.

शुभम भवतु 🙏🏻 

समर्थ रामदास रचित || श्री नरसिंह पंचक ||

|| श्री नरसिंह पंचक ||

नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें। प्रगट रूप विशाळें दाविलें लोकपाळें। खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें। तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हिजाळें ।।

झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी। लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी। हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी। कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं ।।

कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं। घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं। तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं। धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।।

भरभरित भरारी भर्भराटे भरारी। थरथरित थरारी थरथराटे थरारी। तरतरित तरारी तर्तराटे तरारी। चर्चरित चरारी चर्चराटे चरारी।।

रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी। गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी। न धरित जन मानें लोक गेलें निदानें। हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।।

श्रीसमर्थ रामदास स्वामी

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!
 
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी !! जयदेव जयदेव..!!
 
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार, याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार,तेथे जडमूढ कैसा करु विस्तार !! जयदेव जयदेव..!!
 
देवाधिदेव तू स्वामीराया, निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपली ही काया,शरणागता तारी तू स्वामीराया !! जयदेव जयदेव..!!
 
!!..अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, तुझ्या सूता नलगे चरणावेगळे !! जयदेव जयदेव..!!




तळीभरणे विषयी माहिती..

तळीभरणे विषयी माहिती..
(श्री खंडोबा षडरात्रोत्सव)
(श्री मार्तंडभैरव उत्सव)

       सध्या खंडोबा षडरात्रोत्सव सुरू आहे. चंपाषष्ठी ला घरोघरी तळी भरतात. तळीभरणे हा एक कुळाचार आहे. ताम्हणामध्ये विड्याची (नागवेलीची) पाने, सुपारी, देवाचा टाक, खोब-याचे तुकडे , भंडार इ. साहित्य घेऊन तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण वर खाली तीन वेळा उचलले जाते तद्नंतर पान ठेवून (काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी, रुमाल अथवा वस्त्र जमिनीवर ठेवतात) त्यावर ताम्हण ठेवले जाते. देवाला भंडार वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडार लावल्या नंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण उचलले जाते. सरते शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावले जाते.
        तीन वेळा ताम्हण उचलून वरखाली करताना "सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार" असा जयजयकार करतात.
        मराठी मध्ये एखाद्याचे समर्थन करणे किंवा उदो उदो करणे या अर्थाचा वाक्प्रचार 'तळी उचलणे' हा या आचारा वरूनच आला असावा.
         मणीसुर आणि मल्लासुर या दैत्यांना मार्तंडदेवाने युध्दात हरवले  त्यामुळे त्या देवतेला मल्लहारी (मल्हारी) म्हणतात. 
        या देवाने त्यांचा संहार केल्या नंतर ऋषीमुनींना आणि  सर्व नगरवासियांना जो आनंद झाला, त्यांनी त्या आनंदात मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला. त्याचेच हे प्रतिक म्हणजे तळी भरणे आहे. त्याचा उदो उदो हा हेतु आहे.

खंडोबा महाराज तळी आरती

बोल खंडेराव महाराज की जय॥
सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय म ल्हार॥
हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥
भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥
सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥
निळा घोडा॥ पाई तोडा॥
कमर करगोटा ॥ बेंबी हिरा॥
गळयात कंठी॥ मोहन माळा॥
ङोईवर शेला॥ अंगावर शाल॥
सदा हिलाल॥ जेजुरी जाई॥
शिकार खेळी॥ म्हाळसा सुंदरी॥
आरती करी॥ देवा ओवाळी ॥
नाना परी॥ देवाचा श्रृंगार ॥
कोठ लागो शिखरा॥ खंडेरायाचा खंडका ॥
भंडाऱ्याचा भडका॥ बोल सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय मल्हार॥


श्री गणेश आरती - प्रार्थना - मंत्रपुष्पांजली - गणपती स्तोत्र आणि अथर्वशीर्षा सहित


श्री गणपतीची आरती

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची

कंठी झळके माळ मुक्ताफ़ळांची ॥धृ॥

जयदेव जयदेव जय मंगल मुर्ती

दर्शन मात्रे मन:कामना पुरती जयदेव जयदेव

रत्नखचित फ़रा तुज गौरीकुमरा

चंदनाची उटी कुंकुमकेशरा

हिरेजडीत मुकुट शोभतो बरां

रुणझुणती नुपूरे चरणी घागरिया ॥१॥

जयदेव जयदेव ....

लंबोदर पितांबर फ़णिवर बंधना

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना

दास रामाचा वाट पाहे सदना

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥२॥

जयदेव जयदेव ....


श्री शंकराची आरती

लवलवथी विक्राळा ब्रह्मांडी माळा

विषे कंठकाळा त्रिनेत्री ज्वाळा

लावण्यसुंदर मस्तकी बाळा

तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा ॥१॥

जयदेव जयदेव जय श्री शंकरा आरती

ओवाळू भावार्थी ओवाळू  तुज कर्पुरगौरा

कर्पुर्गौरा भोळा नयनी विशाळा

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा

विभूतीचे उधळण शतकंठ निळा

ऎसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥२॥  जयदेव जयदेव....

देवी दैत्यी सागर मंथन पै केले

त्यामाजी अवचित हलाहल  जे उठिले

ते त्वां असुरपणे प्राशन केले

नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥३॥ जयदेव जयदेव....

व्याघ्रांबरफ़णिवरधर सुंदर मदनारी

पंचानन मनमोहन मुनिजनसुखहारी

शतकोटीचे बीज वाचे उच्चारी

रघुकुलटिळक रामदासा अंतरी ॥४॥ जयदेव जयदेव....

                         


श्री देवीची आरती

दुर्गे दुर्गट भारी तुजविण संसारी

अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी

वारी वारी जन्म मरणाते वारी

हारी पडलो आता संकट निवारी॥१॥

जयदेवी जयदेवी महिषासुरमर्दिनी

सुरवरईश्वरदे तारक संजीवनी जयदेवी जयदेवी

त्रिभुवनी भुवनी पाहता तुजाऎसी नाही

चारही श्रमले परंतु न बोलवे काही

साही विवाद करता पडीले प्रावाही

ते तु भक्तलागी ते तु दासालागी पावसि लवलाही ॥ २॥

जयदेवी जयदेवी ....

प्रसन्न वदने प्रसन्ने होसी निजदासा

क्लेशापासुनी सोडी तोडी भवपाशा

अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा

नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥३॥

जयदेवी जयदेवी ....

 

श्री दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्त हा जाणा

त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा

नेती नेती शब्द नये अनुमाना

सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥

जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्त आरती

ओवाळीता हरली भवचिंता जयदेव जयदेव

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त

अभाग्यासी कैसी कळे न ही मात

पराही परतली तेथे कैचा हा हेत

जन्म मरणाचा पुरला से अंत  ॥२॥  जयदेव जयदेव....

दत्त येउनिया उभा ठाकला

सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला

प्रसन्न होऊनी आशिर्वाद दिधला

जन्म मरणाचा फ़ेरा चुकविला ॥३॥ जयदेव जयदेव....

दत्त दत्त ऎसे लागले ध्यान

हरपले मन झाले उन्मन

मी तु पणाची झाली बोळवण

एका जनार्दनी श्री दत्त ध्यान  ॥४॥  जयदेव जयदेव....

 

श्री विठ्ठलाची आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा 

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा 

चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥

जयदेव जयदेव हरी पांडुरंगा रखुमाई वल्लभा

राही च्या वल्लभा पावे जिवलगा जयदेव जयदेव

तुलसीमाळा गळा कर ठेवुनी कटी | 

कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी

देव सुरवर नित्य येती भेटी | 

गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥२॥

जयदेव जयदेव....

धन्य वेणूनाद अनुक्षेत्र पाळा | 

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा

राही रखुमाई राणीया सकळा | 

ओवाळिती राजा विठोबा सांवळा ॥३॥ जयदेव जयदेव....

ओवाळू आरत्या कुर्वंडया येती | 

चंद्रभागेमाजी सोडुनिया देती

दिंड्या पताका वैष्णव नाचती | 

पंढरीचा महीमा वर्णावा किती ॥४॥ जयदेव जयदेव... 

आषाढी कार्तिकी भक्त जन येती | 

चंद्रभागे मधे स्नान जे करिती

दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती | 

केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥  जयदेव जयदेव....

 

प्रार्थना

घालीन लोटांगण वंदीन चरण

डोळ्यांनी पाहीन रुप तुझे

प्रेमे अलिंगिन आनंदे पुजिन

भावे ओवाळीन म्हणे नामा ॥१॥

त्वमेव माता च पिता त्वमेव

त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव

त्वमेव सर्वं मम देव देव ॥२॥

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा

बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात्

करोमि यद्यत सकलं परस्मै

नारायणायेति समर्पयामि ॥३॥

अच्युतं केशवं राम नारायणमं

कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे

श्रीधरं माधवं गोपिका वल्लभमं

जानकी नायकं रामचंद्रं भजे ॥४॥

हरे राम हरे राम , राम राम हरे हरे

हरे  कृष्ण हरे कृष्ण , कृष्ण कृष्ण हरे हरे ॥५॥

 

मंत्रपुष्पांजली

यद्येन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्

तेहनाकं महिमान:संच यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा:

राजाधिराजाय प्रसह्यसाहिने

नमो वयं वैश्रवणाय कुर्महे

स मे कामान् कामकामाय मह्य़ं

कामेश्वरो वैश्रवणौ ददातु

कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम:

स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं

वैराज्यं पारमेष्ठ्य़ं राज्यं

महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या ईस्यात् सार्वभौम:

सार्वायुष आंतादापरार्धात्  पृथिव्यै

समुद्रपर्यंताया एकराळिती

तद्प्येषश्लोको भिगितो " मरुत: परिवेष्टारो

मरुत्तस्यावसन् गृहे

आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा:

सभासद " इति:

॥ गणपती बाप्पा मोरयामंगलमुर्ती मोरया ॥



॥ श्री गणेश स्तोत्र ॥

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥

**********



 || श्री गणपती अथर्वशीर्ष ||

हरिः 

नमस्ते गणपतये॥

त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमासि॥ त्वमेव केवलं कर्तासि॥

त्वमेव केवलं धर्तासि॥ त्वमेव केवलं हर्तासि॥

त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि॥ त्वं साक्षादात्मासि नित्यं ॥१॥

ऋतं वच्मि॥ सत्यं वच्मि

अव त्वं माम्॥ अव वक्तारम्॥ अव श्रोतारम्॥

अव दातारम्॥ अव धातारम्॥ अवानूचानमव शिष्यम्  २॥

अव पश्चात्तात्॥ अव पुरस्तात्॥ अवोत्तरात्तात्॥

अव दक्षिणात्तात्॥ अव चोर्ध्वात्तात्॥ अवाधरात्तात्॥

सर्वतो मां पाहि पाहि समंतात्॥ ३॥

त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः॥ त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः॥

त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि॥ त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि॥

त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि॥ ४॥

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते॥ सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति॥

सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति॥ सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति॥

त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः॥ त्वं चत्वारि वाक्पदानि।।५॥

त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः॥

त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारास्थितोऽसि नित्यम्॥

त्वं शक्तित्रयात्मकः॥ त्वां योगिनोध्यायंति नित्यम्॥

त्वं ब्रह्मा । त्वं विष्णुस्त्वं । रुद्रस्त्वंमिंद्रस्त्वमग्निस्त्वं

वायुस्त्वं । सूर्यस्त्वं । चंद्रमास्त्वं । ब्रह्मभूर्भुवःस्वरोम्॥ ६॥

गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम्॥

अनुस्वारः परतरः॥ अर्धेन्दुलसितं॥ तारेण ऋद्धं॥

एतत्तव मनुस्वरूपम्॥ गकारः पूर्वरूपम्॥

अकारो मध्यमरूपम्॥ अनुस्वारश्चांत्यरूपम्॥

बिन्दुरुत्तररूपम्॥ नादः संधानम्॥ संहिता संधिः॥

सैषा गणेशविद्या॥ गणक ऋषिः॥

निचृद्गागायत्रीच्छंदः॥ गणपतिर्देवता॥

 गं गणपतये नमः॥ ७॥

एकदंताय विघ्नहे वक्रतुण्डाय धीमहि॥

तन्नो दंतिः प्रचोदयात्॥ ८॥

एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणाम॥

रदं  वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्॥

रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्॥

रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम्॥

भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्॥

आविर्भूतं  सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम्॥

एवं ध्यायति यो नित्यं  योगी योगिनां वरः॥ ९॥

नमोव्रातपतये। नमो गणपतये। नमः प्रमथपतये।

नमस्ते अस्तु लंबोदरायैकदंताय। विघ्नानाशिने।

शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः॥१०॥

एतदथर्वशीर्षं योऽधीते॥

 ब्रह्मभूयाय कल्पते॥ स सर्वविघ्नैर्नबाध्यते॥

 सर्वतसुखमेधते। स पंचमहापापात्प्रमुच्यते॥

सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति॥

प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति॥

सायं प्रातः प्रयुंजानो अपापो या भवति॥

सर्वत्राधीनोऽपविघ्नो भवति॥ धर्मार्थकाममोक्षं  विंदति॥

इदमथर्वशीर्षमशिष्याय  देयं 

यो यदि मोहाद्दास्यति  पापीयान् भवति।

सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत्॥ 

अनेन गणपतिमभिषिंचति  वाग्मी भवति॥

चतुर्थ्यामनश्नन् जपति  विद्यावान् भवति।

इत्यथर्वणवाक्यम्॥ ब्रह्मद्यावरणं विद्यात्   बिभेति कदाचनेति॥

यो दूर्वांकुरैर्यजति  वैश्रवणोपमो भवति॥

यो लाजैर्यजति  यशोवान् भवति  मेधावान् भवति॥

यो मोदकसहस्रेण यजति  वाञ्छितफलमवाप्नोति॥

यः साज्यसमिद्भिर्यजति  सर्वं लभते  सर्वं लभते॥

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति॥

सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति॥

महाविघ्नात्प्रमुच्यते॥ महादोषात्प्रमुच्यते॥

महापापात् प्रमुच्यते॥  सर्वविद्भवति  सर्वविद्भवति॥

 एवं वेद इत्युपनिषत्॥ १४॥

 सहनाववतु॥ सहनौभुनक्तु॥ सह वीर्यं करवावहै॥

तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै॥

 शांति॒ शांति॒: शांति॑:

 इति श्रीगणपत्यथर्वशीर्षं समाप्तम्॥

 *******


श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह

🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...

Popular Blogs