Blog Views

Showing posts with label गजानन महाराज. Show all posts
Showing posts with label गजानन महाराज. Show all posts

II श्री गजानन महाराजांचे २१ नमस्कार (दुर्वांकुर) II

II श्री गजानन महाराजांचे २१ नमस्कार (दुर्वांकुर)  II
शेगाव ग्रामी वसले गजानन I स्मरने तयांच्या हरतील विघ्न II

म्हणूनी स्मरा अंतरी सद्गुरूला I नमस्कार माझा श्री गजाननाला II १ II


येऊनी तेथे अकस्मात मूर्ती I करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती II
उच्छिष्ट पात्राप्रती सेवियेला I नमस्कार माझा श्री गजाननाला II२ II


उन्हा तहानेची नसे त्यास खंत I दावियले सत्य असेची संत II
पाहुनी त्या चकित बॅंकटलाल झाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II ३ II


घेऊनी गेला आपुल्या गृहासी I मनोभावे तो करी पूजनासी II
कृपाप्रसादे बहु लाभ झाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II ४ II


मरणोंन्मुखी तो असे जाणराव I तयांच्या मुळे लाभला त्यास जीव II
पदतीर्थ घेता पुनर्जन्म झाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II ५ II


पहा शुष्कवापी भरली जलाने I चिलीम पेटविली तये अग्निविने II
चिंचवणे नशिले करी अमृताला I नमस्कार माझा श्री गजाननाला II ६ II


ब्रह्म गिरिला असे गर्व मोठा I करी तो प्रचारा अर्थ लावुनी खोटा II
क्षणार्धात त्याचा परिहार झाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II ७ II


बागेतली जाती खाण्यास कणस I धुरामुळे करिती मक्षिका त्यास दंश II
योगबळे काढिले कंटकाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II ८ II


भक्ताप्रती असे प्रीत अपार I धावूनी जाती तया देती धीर II
पुंडलीकाचा ज्वर तो निमाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II ९ II


बुडताच नौका नर्मदेच्या जलात I धावा करिती तुमचाच भक्त II

स्त्री वेष घेऊनी तिने धीर दिला I नमस्कार माझा श्री गजाननाला II १० II


संसार त्यागीयला बायजाने I गजानना सन्निध वही जिणे II

सदा स्मरे ती गुरूच्या पदाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II ११ II


पितांबरा करी भरी उद्कात तुंबा I पाणी नसे भरविण्या नाल्यास तुंबा II

गुरुकरपेने तो तुंबा बुडाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II १२ II


हरितपर्न फुटले शुष्क आम्रवृक्षा I पितांबराची घेत गुरु परीक्षा II
गुरुकृपा लाभली पितांबरला I नमस्कार माझा श्री गजाननाला II १३ II


चिलीम पाजवी म्हणून श्रीसी I ईच्छा मनी जाहली भिक्षुकसी II
हेतू तयाचा अंतरी जाणियेला I नमस्कार माझा श्री गजाननाला II १४ II


बाळकृष्णा घरी त्या बाळापुरासी I समर्थरूपे दिले दर्शनासी II
सज्जनगडाहुनी धावूनी आला I नमस्कार माझा श्री गजाननाला I I१५ II


नैवेद्य पक्वान्न बहू आणियेले I कांदा भाकरीसी तुम्ही प्रिय केले II

कवरासी पाहुनी आनद झाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II १६ II


गाडी तुम्ही थंबिवली दयाळा I गार्डाप्रती दावियेली तिला II
शरणांगती घेऊनी तोही आला I नमस्कार माझा श्री गजाननाला II १७ II


जाती धर्म नाही तुम्ही पाळीयेला I फकीरा सवे हो तुम्ही जेवीयेला II
दावूनी ऐसे जाना बोध केला I नमस्कार माझा श्री गजाननाला II १८ II


अग्रवालास सांगे म्हणे राममूर्ती I अकोल्यास स्थापुनी करी दिव्यकीर्ती II

सांगता क्षणी तो पहा मानिला I नमस्कार माझा श्री गजाननाला II १९ II


करंजपुरीचा असे एक विप्र I उदरी तयाच्या असे की हो दु:ख II

दु:खातूनी तो पहा मुक्त झाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II २० II


दुर्वांकूरा वाहुनी एकवीस I नमस्काररुपी श्री गजाननास II

सख्यादास वही श्रीगुरूच्या पदाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II २१ II

 

 


।। श्री गजानन बावन्नी ।।

।। श्री गजानन बावन्नी ।।


जय जय सद्गुरु गजानना ।
रक्षक तूची भक्तांना ।।१।।


निर्गुण तू परमात्मा तू ।
सगुण रुपात गजानन तू ।।२।।


सदेह तु परि विदेह तू ।
देह असुनी देहातीत तू ।।३।।


माघ वद्य सप्तमी दिनी ।
शेगांवात प्रगटोनी ।।४।।


उष्ट्या पत्रावळी निमीत्त ।
विदेहत्व तव हो प्रकट ।।५।।


बंकटलाला वरी तुझी ।
कृपा जाहली ती साची ।।६।।


गोसाव्याच्या नवसासाठी ।
गांजा घेसी लाऊनी ओठी ।।७।।


तव पदतीर्थे वाचविला ।
जानराव तो भक्त भला ।।८।।


जानकीरामा चिंचवणे ।
नासवूनी स्वरुपी आणणे ।।९।।


मुकीन चंदुचे कानवले ।
खाऊनी कृतार्थ त्या केले ।।१०।।


विहरीमाजी जलविहिना ।
केले देवा जलभरणा ।।११।।


मधमाश्याचे डंख तुवा ।
सहन सुखे केले देवा ।।१२।।


त्यांचे काटे योगबले ।
काढुनि सहजी दाखवले ।।१३।।


कुस्ती हरिशी खेळोनी ।
शक्तीदर्शन घडवोनी ।।१४।।


वेद म्हणूनी दाखवला ।
चकीत द्रवीड ब्राम्हण झाला ।।१५।।


जळत्या पर्यंकावरती ।
ब्रम्हगिरीला ये प्रचिती ।।१६।।


टाकळीकर हरिदासाचा ।
अश्व शांत केला साचा ।।१७।।


बाळकृष्ण बाळापुरचा ।
समर्थ भक्तचि जो होता ।।१८।।


रामदास रुपे त्याला ।
दर्शन देवुनि तोषविला ।।१९।।


सुकलालाची गोमाता ।
द्वाड बहु होती ताता ।।२०।।


कृपा तुझी होताच क्षणी ।
शांत जाहली ती जननी ।।२१।।


घुडे लक्ष्मण शेंगावी ।
येता व्याधी तू निरवी ।।२२।।


दांभिकता परि ती त्याची ।
तू न चालवुनि घे साची ।।२३।।


भास्कर पाटील तव भक्त ।
उद्धरिलासी तूं त्वरीत ।।२४।।


आज्ञा तव शिरसावंद्य ।
काकहि मानती तुज वंद्य ।।२५।।


विहरीमाजी रक्षियला ।
देवा तु गणू जवर्याला ।।२६।।


पिंताबरा करवी लीला ।
वठला आंबा पल्लविला ।।२७।।


सुबुद्धी देशी जोश्याला ।
माफ करी तो दंडाला ।।२८।।


सवडद येथील गंगाभारती ।
थुंकुनि वारली रक्तपिती ।।२९।।


पुंडलिकाचे गंडातर ।
निष्ठा जाणुनि केले दुर ।।३०।।


ओकांरेश्वरी फुटली नौका ।
तारी नर्मदा क्षणात एका ।।३१।।


माधवनाथा समवेत ।
केले भोजन अद्यष्ट ।।३२।।


लोकमान्य त्या टिळकांना ।
प्रसाद तूचि पाठविला ।।३३।।


कवरसुताची कांदा भाकर ।
भक्षिलीस त्या प्रेमाखातर ।।३४।।


नग्न बैसुनि गाडीत ।
लीला दाविली विपरीत ।।३५।।


बायजे चित्ती तव भक्ती ।
पुंडलिकावर विरक्त प्रिती ।।३६।।


बापूना मनी विठ्ठल भक्ती ।
स्वये होशी तु विठ्ठल मुर्ती ।।३७।।


कवठ्याच्या वारकर्याला ।
मरीपासुनी वाचविला ।।३८।।


वासुदेव यति तुज भेटे ।
प्रेमाची ती खूण पटे ।।३९।।


उद्धट झाला हवालदार ।
भस्मिभूत झाले घरदार ।।४०।।


देहांताच्या नंतरही ।
कितीजणा अनुभव येई ।।४१।।


पडत्या मजुरा झेलीयले ।
बघति जन आश्चर्य भले ।।४२।।


अंगावरती खांब पडे ।
स्त्री वाचे आश्चर्य घडे ।।४३।।


गजाननाच्या अद्भुत लिला ।
अनुभव येती आज मितीला ।।४४।।


शरण जाऊनी गजानना ।
दुःख तयाते करी कथना ।।४५।।


कृपा करी तो भक्तांसी ।
धावूनि येतो वेगेसी ।।४६।।


गजाननाची बावन्नी ।
नित्य असावी ध्यानीमनी ।।४७।।


बावन्न गुरवारी नेमे ।
करा पाठ बहुभक्तीने ।।४८।।


विघ्ने सारी पळती दुर ।
सर्व सुखांचा येई पूर ।।४९।।


चिंता सार्या दुर करी ।
संकटातूनि पार करी ।।५०।।


सदाचार रत् सदभक्ता ।
फळ लाभे बघता बघता ।।५१।।


सुरेश बोले जय बोला ।
गजाननाची जय बोला ।।५२।।


जय बोला हो जय बोला
गजाननाची जय बोला

अनंतकोटी ब्रम्ह़ांडनायक महाराजाधीराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतीपालक शेगांवनिवासी समर्थ सद्गुरु श्रीगजानन महाराज की जय
जय गजानन जय गजानन

श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह

🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...

Popular Blogs