Blog Views

Showing posts with label श्री दत्तात्रय. Show all posts
Showing posts with label श्री दत्तात्रय. Show all posts

दत्ताची पदे (श्रीगुरूचे चरणकंज)

श्रीगुरूचे चरणकंज हृदयीं स्मरावे ॥ध्रु०॥

 

निगमनिखिलसाधारण सुलभाहुनि सुलभ बहू । 

इतर योग योगविषयपंथिं कां शिरावें ॥१॥

 

नरतनुदृढनावेसी बुडवुनि अतिमूढपणें । 

दुष्ट नष्ट कुकर-सुकरतनु कां फिरावें ॥२॥

 

रामदास विनवी तुज अजुनि तरी समज उमज । 

विषयवीष पिउनियां फुकट कां मरावे ॥३॥

 

दत्ताची पदे (श्रीगुरुमहाराज गुरू )

श्रीगुरुमहाराज गुरू जय जय परब्रह्म सद्गुरू ॥ध्रु०॥

चारी मुक्तीदायक दाता उदार कल्पतरू जय० ॥१॥

रूप जयाचें मन-बुद्धीपर वाचे अगोचरू जय० ॥२॥

अलक्ष्य अनाम अरूप अद्वय अक्षय परात्परू जय० ।।३।।

बद्ध मुमुक्षु साधक शरणागता वज्रपंजरू । गुरू० ।।४।।

आत्मारामी रामदास गोपाल करुणाकरू गुरूo ||५||

 


दत्ताची पदे (झाल्यें बाई! वेडी । दरबार गुरूचा झाडीं)

झाल्यें बाई! वेडी । दरबार गुरूचा झाडीं ॥ध्रु०॥

देहपीतांबर फाडिला । नवरत्नांचा हार काढिला ।

सद्गुरूचे गळां घातला। वासना सोडीं । दरबार० ॥१॥

कल्पनाकाचोळी काढिली । त्रिगुणांची वेणी सोडिली ।

चारि देहांची मुक्ति साधिली । परी ती थोडी ॥ दर० ॥२॥

वेडी झाल्ये सद्गुरुघरची । चिंता हरपली मनाची ।

सोय दाखविलि स्वसरूपाची । लागली गोडी । दर० ॥३॥

चिन्मयस्वरूप दाखवीलें । आपणामध्ये मेळवीलें ।

पूर्णानंद गुरुनें केलें । पाय न सोडीं । दरबार० ॥४॥

दत्ताची पदे (तो मज आठवतो)

तो मज आठवतो । गुरुराजा । प्राणविसांवा माझा ॥ध्रु॥

श्रवणीं पाजुनियां । अमृत । मस्तकं ठेवुनि हस्त ।।१।।

विवेकसिंधूचीं । चिद्रत्ने । लेवविलीं मज यत्नें ॥२॥

अखंड देउनियां । स्मरणासी । द्वैतभयातें नासी ।।३।।

अक्षयप्राप्तीचा । सुखदाता । केशवकवि म्हणे आतां ।।४।।

 

 


दत्ताची पदे

भवतारक या तुझ्या पादुका वंदिन मी माथां । करावी कृपा गुरूनाथा ।।

बहु अनिवार मन माझे चरणी स्थिर व्हावें । तव पदभजनी लागावें ॥ध्रु०॥

कामक्रोधादिक हे षड्रिपु समूळ छेदावे । हेंचि मागणे मला द्यावें ॥ चला

अघहरणा करिं करुणा दत्ता धांव पाव आतां । करावी कृपा गुरूनाथा ॥१॥

तूंचि ब्रह्मा तूंचि विष्णु तूंचि उमाकांत । तूची समग्र दैवत ।।

माता पिता इष्ट बंधू तूंचि गणगोत । तूंचि माझे सकळ तीर्थ ॥ चाल ॥

तुजविण मी गा कांहिंच नेणें तूंची कर्ता हर्ता । करावी कृपा गुरूनाथा ॥२॥

तनमनधन हे सर्व अर्पनी कुरवंडिन काया । उपेक्षू नको गुरूराया ।।

कर्महीन मी, मतीहीन मी, सकळ श्रम वायां ।। लज्जा राखी गुरु सदया चाल ॥

मातृबालकापरि सांभाळीं तूंचि मुक्तिदाता । करावी कृपा गुरूनाथा ॥३॥

शेषा ब्रह्मया वेदां न कळे महिमा तव थोर । तेथे मी काय पामर ।

वियोगनसुं दे तव चरणांचा हाचि देई वर ।शिरीं या ठेवीं अभकर चाल ॥

हीच विनंती दर्शन द्यावें दासा रघुनाथा करावी कृपा गुरूनाथा ॥४॥

 

 

 


कृपाप्रसादात्मक सिध्दस्त्रोत जगतवंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना।

श्री सद्गुरु शंकर महाराज यांच्या अत्यंत आवडीचे कृपाप्रसादात्मक सिध्दस्त्रोत जगतवंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना।

 

॥ ॐ दिनानाथ गुरु माऊली ॥ जगतवंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना। 

अनन्यभावें शरणागंत मी, भवभय वारण तुम्हीच ना ॥धृ.॥ 


कार्तवीर्य यदु परशुराम, प्रबोधले गुरु तुम्हीच ना। 

स्वामी जनार्दन एकनाथ तरि, कृतार्थ केलें तुम्हीच ना। 

नव नारायण सनाथ करुनी, पाय निर्मल तुम्हीच ना।

मछिंद्रादि जति प्रवृत्त केले, जन उध्दारा तुम्हीच ना। 

दासोपंता घरी रंगले, परमानंदें तुम्हीच ना।। 

नाथ सदनिचे चोपदार तरि, श्री गुरु दत्ता तुम्हीच ना ।

युगायुगी निजभक्त रक्षणा, अवतरतां गुरुं तुम्हीच ना। 

बालोन्मत्त पिशाच्च वृत्ती, धारण करतां तुम्हीच ना ॥१॥ 


स्नान काशीपुरी चंदन पंढरिं, संध्या सागरिं तुम्हीच ना। 

करुनी भिक्षा करवीर भोजन पांचाळेश्वर तुम्हीच ना। 

तुळजापुरिं करशुध्दि तांबुल, निद्रा माहूर तुम्हीच ना।। 

करुनि समाधि मग्न निरंतर, गिरिनारी गुरु तुम्हीच ना। 

विप्र स्त्रियेच्या वचनि गुंतले, पिठापूरी गुरु तुम्हीच ना। 

श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती, करंजनगरिं तुम्हीच नां। 

जन्मतांच ओंकार जपोनी, मौन धरियलें तुम्हीच ना। 

मौजी बंधन वेद वाणी, जननि सुखविली तुम्हीच ना ॥२॥ 


चातुर्थाश्रम जीर्णोद्धार, आश्रम घेऊनि तुम्हीच ना। 

कृष्ण सरस्वती सद्गुरु वंदना, तीर्था गमले तुम्हीच ना। 

माधवारण्य कृतार्थ केला, आश्रम देऊनि तुम्हीच ना। 

पोटशुळाची व्यथा हरोनि, विप्र सुखविला तुम्हीच ना।

वेल उपटुनि विप्रा दिधला, है कुंभ गुरु तुम्हीच ना। 

तस्कर वधुनि विप्र रक्षिला, भक्त वत्सला तुम्हीच ना। 

विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला, निष्ठा देखुनि तुम्हीच ना। 

हीन जिब वेदपाठि केला, सजिव करुनी तुम्हीच ना ॥३॥ 


वाडी नरसिंह औदुंबरी, वास्तव्य करुनी तुम्हीच ना।

भीमा अमरजा संगमिं आले, गाणगापुरिं गुरु तुम्हीच ना । 

ब्राम्हमुहूर्त संगमस्थानी अनुष्ठान रत तुम्हीच ना। 

भिक्षा ग्रामीं करुनी, राहतां माध्यान्हीं मठिं तुम्हीच ना। 

ब्रह्मराक्षसां मोक्ष देऊनी, उध्दरिलें मठिं तुम्हीच ना। 

वांझ महिषे दुभविली फुलविले, शुष्क काष्ठ गुरु तुम्हीच ना। 

नंदीनामा कुष्ठी केला, दिव्य देहि गुरु तुम्हीच ना। 

त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनी, कुमशी ग्रामीं तुम्हीच ना  ॥४॥


अगणित दिधलें धान्य कापुनी, शुद्र शेत गुरु तुम्हीच ना। 

रत्नाईचे कुष्ठ दवडिलें, तीर्थ वर्णित तुम्हीच ना। 

आठहि ग्रामी भिक्षा केली, दिवाळी दिनिं तुम्हीच ना। 

भास्कर हस्तें चार सहस्त्रा, भोजन दिधलें तुम्हीच ना। 

निमिषमात्र तंतुक नेला, श्री शैल्यासी तुम्हीच ना। 

सायंदेवा काशीयात्रा, दाखविली गुरु तुम्हीच ना। 

चांडाल मुखी वेद वदविलें, गर्वं हराया तुम्हीच ना। 

साठ वर्षे., वांझेसी दिधले, कन्या पुत्रहि तुम्हीच ना ॥५॥


कृतार्थ केला मानस पूजा, नर केसरि गुरु तुम्हीच ना। 

माहुर चा सतिपति ऊठवोनी, धर्म कथियला तुम्हीच ना। 

रजकाचा यवनराज बनवुनि, उध्दारिला गुरु तुम्हीच ना। 

अनन्यभावें भजता सेवक, तरतिल वदले तुम्हीच ना। 

कर्दळिवनिचा बहाणा करुनी, गाणगापुरी स्थित तुम्हीच ना। 

निर्गुण पादुका दृश्य ठेऊनी, गुप्त स्वामी मैं तुम्हीच ना। 

स्वामी समर्थ दास मुढ परिं, अंगिकारिला गुरु तुम्हीच ना। 

आत्मचिंतनी रमवा निशिदिनी, ज्ञानेश्वर गुरु तुम्हीच ना ॥६॥

 

।। ॐ तत्सत् ॥

 


अपराधक्षमा प्रार्थना

अपराधक्षमा प्रार्थना

अपराध क्षमा आता केला पाहिजे
गुरू हा केला पाहिजे ।
अबध्द सुबध्द गुण वर्णियले तुझे ।।ध्रु।।

नकळेची टाळविणा वाजला कैसा
गुरू हा वाजला कैसा ।
अस्ताव्यस्त पडे नाद झाला भल तैसा ।। १ ।।

नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर
गुरू हा कंठ सुस्वर ।
बरा नाही झाला वाचे वर्ण उच्चार ।। २ ।।

निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे
गुरू हे वेडे वाकुडे
गुण दोष नसावा हा सेवका कडे ।। ३।।

अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरू हा केला पाहिजे । 
अबध्द सुबध्द गुण वर्णियले तुझे ।।४ ।।

 


!! श्रीगुरूस्तवन !!

!! श्रीगुरूस्तवन !!


ॐ नमोजी श्रीगुरूनाथा। भक्तवत्सल समर्था। तव पदी ठेऊनि माथा। स्तवितो ताता तुजलागी ।।१।। तू नित्य निरंजन। तुज म्हणती निर्गुण। तूच जगाचे कारण। अहंभावे प्रगटलासी ।।२।। तुझी स्तुती करावया। शक्ती नसे हरी हर ब्रह्मया। परि अघटित तुझी माया। जी संशयभया निवारीत ।।३।। मुळ मुळीचा आकारू। तुज म्हणती श्रीगुरू। सच्चित शक्तीचा आधारू। पूर्णाधारू ॐकारासी।।४।। ऐसा तू देवाधिदेव। हे विश्व तुझेची लाघव। इच्छेचे वैभव। मुळब्रह्मी नटविले ।।५।। ऐसा तू बा अपरंपारु। या अनंत ब्रह्माचा आधारू। चराचरीचा आकारू। पूर्णाधारु म्हणविले ।।६।। ऐशा तुजप्रती । स्तवावया अल्प माझी मती। तू जाणसी हे चित्ती। विश्वव्यापक म्हणवुनी ।।७।। तरी देवा मतिदान। देणे तुजची कारण। जरी करणे समाधान। तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिलें।।८।। अहा जी निर्गुणा। विश्वव्यापक सगुणा। सत्य निराकार निरंजना। भक्तांकारणे प्रगटलासी ।।९।। रूप पाहता मनोहर। मूर्ती केवळ दिगंबर। कोटी मदन तेज निर्धार। ज्याच्या स्वरूपी नटले ।।१०।। कर्ण कुंडलाकृती। वदन पाहता सुहास्य मूर्ती। भ्रुकुटी पाहाता मना वेधती। भक्त भाविकांचे ।।११।। भोवयांचा आकारू। जेथे भुले धनुर्धरु । ऐसें रूप निर्धारु। नाही नाही जगत्रयी ।।१२।। सरळ दंड जानु प्रमाण। आजानुबाहु कर जाण। जो भक्तां वरद पूर्ण। ज्याचे स्मरणॆ भव नाश ।।१३।। ऐसा तू परात्परु । परमहंस स्वरूप सद्गुरु। मज दावुनि ब्रह्म चराचरु। बोलविला आधारू जगतासी ।।१४।। ऐशा तुज स्तवुनी । मौन्य पावले सहस्त्रफणी। वेद श्वान होऊनी। सदा द्वारी तिष्ठती ।।१५।। तेथे मी लडिवाळ। खरे जाणिजे तुझे बाळ। म्हणवोनी पुरवी माझी आळ। माय कनवाळ म्हणविसी ।।१६।। मी अन्यायी नानापरी। कर्मे केली दुर्विचारी। ती क्षमा करोनि निर्धारी। मज तारी गुरुराया ।।१७।। मनाचिया वारे। जे उठवी पापांचे फवारे। तेणे भ्रमे भ्रमलो बारे। चुकवी फेरे भवाचे ।।१८।। कायिक, वाचिक, मानसिक। सर्व पापे झाली जी अनेक। ती क्षमा करुनी देख। मज तारी गुरुराया ।।१९।। माता उदरी तुम्ही तारिले। ते विस्मरण पडिले। हे क्षमा करुनी वहिले। मज तारी गुरुराया ।।२०।। पर उपकार विस्मरण। पापे केली अघटित कर्म। अहंभाव क्रोधा लागून। सदाचि गृही ठेवियले ।।२१।। हे क्षमा करोनि दातारा। मज तारावे लेकरा। तुजविण आसरा। नाही नाही जग त्रयी ।।२२।। मज न घडे नेम धर्म। न घडे उपासना कर्म। नाही अंतरी प्रेम। परि ब्रिदाकारण तारणे ।।२३।। नाम तुझे पाही। कदा वृथा गेले नाही। ऐसें देती ग्वाही। संत सज्जन पुराणे ।।२४।। मागे बहुत तारिले। हे त्यांही अनुभविले। मज का अव्हेरिले। निष्ठुर केले मन किंनिमित्त ।।२५।। तु विश्वाकारू विश्वाधारू। त्वांचि रचिले चराचरू। तूचि बीज आधारू। व्यापक निर्धारु जगत्रयी ।।२६।। चार देहाच्या सुक्ष्मी। तुचि झुलविसी निजलगामी। हे ठेवुनी कारणी। अहंभाव तोडावया ।।२७।। जन्म-मरणाच्या व्यापारी। जे भ्रमुनी पडले माया भरारी। ते सोडवीशी जरी। निजनामे करुनिया ।।२८।। ऐसा तू अनादि आधारू। तुज म्हणती वेद गुरू। परि हे व्यापुनी अंतरू। स्थिरचरी व्यापिले ।।२९।। भावभक्ती चोखट। करणे नेणे बिकट। नाम तुझे सुभट। तोडी घाट भवाचा ।।३०।। हे जाणुनी अंतरी। पिंड ब्रह्मांड शोधिले जरी। तरी सूक्ष्मीच्या आधारी। व्यापक निर्धारी तूंचि एक ।।३१।। म्हणोनि मौन्य गती। तुज निजानंदी स्तविती। जरी बोलविसी वाचाशक्ती। तरी हाती तुझ्या दयाळा ।।३२।। म्हणोनि स्तवने स्तवनी। तुज सांगणे एक जनी। वश व्हावे भक्ती लागूनी। अवतार करणी जाणोनीया ।।३३।। अहंभाव तुटोनि गेला। प्रेमभाव प्रगटला। देव तेथेची राहिला। अनुभव शुद्धी खेळवी ।।३४।। यज्ञ कोटी करू जाता। जे फळ न ये हाता। ते प्रेमभावे स्तविता। हरिते व्यथा भवाची ।।३५।। म्हणोनी सांगणे खूण। हा स्तव नित्य प्रेमे जाण। जो वाचील अनुप्रमाण। अकरा वेळा निर्धारे ।।३६।। शुचिस्मित करुनि चित्ता। जो जपे प्रेमभरिता। पुरवी तयांच्या मनोरथा। सत्य सत्य त्रिवाचा ।।३७।। हे लघु स्तव स्तवन। तारक जगाच्या कारण। भक्तिभावे पूर्ण। चुके चुके भव फेरा ।।३८।। जो हा स्तव करील पठण। त्या घरी आनंद प्रगटेल जाण। देवोनी भक्ता वरदान। तारक त्रिभुवनी करील ।।३९।। हा स्तव नित्य वाचा। भाव धरुनी जीवाचा। फेरा चुकवा चौऱ्यांशीचा। गर्भवास पुन्हा नाही ।।४०।। हे जगा हितकारी। चुकवी चुकवी भ्रमफेरी। मृगजळ दाऊनी संसारी। मग तारी जीवा ते ।।४१।। ही आनंदनाथाची वाणी। जग तारक निशाणी। स्मरता झुलवी निरंजनी। योगी ध्यानी डुलविले ।।४२।। ऐसे ऐकता गुरुस्तवन। जागे केले सच्चित गुरू कारण। केवळ तो हरी, हर, ब्रह्म। मुखयंत्रीचा गोळा पूर्ण। गुरू हृदयभुवन व्यापिले ।।४३।। तेणे होउनी स्मरती। स्वये प्रगटली स्फूर्ती। नाभी नाभी आवरती। अवतार स्थिती बोलतो ।। ४४।। अयोनिसंभव अवतार। हिमालय उत्तरभागी निर्धार। होउनी पूर्ण हंस दिगंबर। व्यापू चराचर निजलीले ।। ४५।। तेथून प्रगट भुवन। मग उध्दरु धरा जाण। धर्मा ते वाढवून। तोडू बंधन कलीचे।।४६।। ऐशी ध्वनी निर्धार। गर्जला गुरू दिगंबर। सर्व देवी केला नमस्कार। आनंद थोर प्रगटला ।। ४७।। शालिवाहन शके तीनशे चाळीस। शुद्ध पक्ष पूर्ण चैत्र मास। अवतार घेतला द्वितीयेस। वटछायेसी दिगंबरू ।। ४८।। ते धरा आनंदली थोर। मज दावा रूप सुकुमार। सेवा करीन निर्धार। पादकिंकरी होउनिया ।।४९।। ऐसी गर्जना प्रकट। आनंद बोधवी हितार्थ। गुह्य हे निजबोधार्थ। न बोलवे दांभिका ।। ५०।।

llश्रीस्वामी समर्थार्पणमस्तुll


कांकडआरती श्रीदत्तप्रभूची

कांकडआरती श्रीदत्तप्रभूची

पंचप्राण काकड आरती तत्त्वात्मक ज्योती । लावुनि तत्त्वात्मक ज्योती ।
ओवाळिला श्री त्रयमूर्तिं परमात्मा प्रीती ॥ध्रु०॥


ओवाळूं आरती माझ्या सद्‌गुरुनाथा । स्वामी श्रीगुरुनाथा ।
शरण मी आलो तुज । शरण मी आलो तुज ।
श्री पदीं ठेवियला माथा ॥१॥


कृष्णा सुपंचगंगा अनादि संगमीं । राहे यतिवर तरुतळीं ।
तो हा माझा कुलस्वामी । ओवाळूं०॥२॥


द्वारीं चौघडा वाजे वाजंत्री वाजती । कर्णे वाजंत्री वाजती।
नाना घोषें गर्जत । नाना वाद्यें गर्जत ।
भक्त स्वानंदें स्तविती ॥ओवाळूं ॥३॥


इंद्रादि सुरवर पन्नग दर्शनास येती। श्रीचे दर्शनास येती ।
नारद मुनिवर किंन्नर तुंबर आळविती ॥ओवाळूं॥४॥


पाहुनि सिंहासनीं आदि मूर्ति सांवळी । चिन्मय मूर्ति सांवळी ।
श्रीगुरुभक्त तन्मय । श्रीगुरुभक्त निर्भय श्रीपदीं ओवाळी ॥ओवाळूं॥५॥

 

 


नृसिंहसरस्वती अष्टक

नृसिंहसरस्वती अष्टक

इन्दुकोटीतेज करूणासिंधु भक्तवत्सलम नंदनात्रिसुनूदत्तमिन्दिराक्षश्रीगुरूम
गंधमाल्याक्षतादिवृंददेववंदितम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||१||


मायापाशंधकारछायादूर भास्करम आयताक्ष पाहि श्रियावल्लभेशनायकम|
सेव्यभक्तवृंद वरद भूयो भूयो नमाम्यहम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||२||


चित्तजादिवर्गषटकमत्तवारणांकुशम तत्वसार शोभितात्म दत्त श्रियावल्लभम|
....................................... वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||३||


व्योमतेजवायूआपभूमीकर्तुमिश्वरम काम क्रोध मोहरहित सोमसूर्यलोचनम|
कामितार्थदातृभक्त कामधेनूश्रीगुरुम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||४||


पुन्डरीकाअयताक्ष कुंदलेंदुतेजसम चंड दुरितखंदनार्थ दंडधारिश्रीगुरुम|
मण्डलीक मौली मार्तंडभासिताननम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||५||


वेदशास्त्रस्तुत्यपाद आदिमूर्तीश्रीगुरुम नादबिंदूकलातीत-कल्पपादसेव्ययम|
सेव्यभक्तवृंदवरद भूयो भूयो नमाम्यहम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||६||


अष्टयोगतत्वनिष्ठ तुष्टज्ञानवारिधीम कृष्णावेणीतीरवासपंचनदी सेवनम|
कष्टदैन्यदूरीभक्ततुष्ट काम्यदायकम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||७||


नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तीकम हारकृत शारदेन गंगाधराआत्मजम|
धारणीक देवदीक्ष गुरुमूर्ती तोषितम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||८||


परमात्मानंदश्रिया पुत्रपौत्रदायकम नारसिंहसरस्वतीय अष्टकं च यः पठेत|
घोर संसारसिंधू तारणाख्य साधनम सारज्ञानदीर्घाअयुरारोग्यादिसंपदम
||


चारुवर्ग काम्यलाभ वारंवारयज्जपेत|
इति श्री गुरुचरित्रांतर्गत श्रीनरसिंहसरस्वतीअष्टकसंपूर्णम|

 

 

 


श्री सत्यदत्त आरती

श्री सत्यदत्त आरती

करितों प्रेमें तुज नीरांजन स्थिरावुनियां मन ॥
दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुन ॥धृ०॥


धरणीवर नर पीडित झालें भवरोगें सर्व ।
कामक्रोधादिक रिपुवर्गें व्यापुनि सगर्व ।
योग याग तप दान नेणती असतांहि अपूर्व ॥
सुलभपणे निजभजनें त्यासी उद्धारि जो शर्व ॥१॥


अत्रिमुनीच्या सदनीं तीन्हीं देव भुकें येतीं ।
भिक्षुक होऊनि अनसूयेप्रति बोलति त्रयमूर्तीं ।
नग्न होऊनी आम्हाप्रति द्या अन्न असें वदती ।
परिसुनि होउनि नग्न अन्न दे तंव ते शिशु होती ॥२॥


द्रर्वासाभिध मौनि जाहला शंभु प्रमथेंदु ।
ब्रह्मदेव तो झाला चंद्र झाला तो उपेंद्र ॥
दत्तात्रेय जो वीतनिद्र तो तारक योगींद्र ।
वासुदेव यच्चरण चिंतुनी हो नित्यातंद्र ॥३॥


दत्ताची आरती ४

दत्ताची आरती

आरती दत्तात्रयप्रभूची ।
करावी सद्‌भावें त्याची ॥ धृ. ॥

श्रीपदकमला लाजविती ।
वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥
कटिस्थित कौपिन ती वरती ।
छोटी अरुणोदय वरि ती ॥ चाल ॥
वर्णूं काय तिची लीला ।
हीच प्रसवली, मिष्टान्न बहु, तुष्टचि झाले,
ब्रह्मक्षेत्र आणि वैष्य शुद्रही सेवुनियां जीची ॥
अभिरूची सेवुनियां ॥ १ ॥

गुरुवर सुंदर जगजेठी ।
ज्याचें ब्रह्मांडे पोटीं ।
माळा सुविलंबित कंठी ।
बिंबफळ रम्य वर्णूं ओष्ठी ॥ चाल ॥
अहा ती कुंदरदनशोभा ।
दंडकमंडलू, शंखचक्र करिं, गदापद्म धरि,
जटामुकुट परि, शोभतसे ज्याची ॥
मनोहर शोभतसे. ॥ २ ॥

रुचिरा सौम्य युग्मह्रष्टी ।
जिनें द्विज तारियला कुष्टी ॥
दरिद्रे ब्राह्मण बहु कष्टी ।
केला तिनेंच संतुष्टी ॥ चाल. ॥
दयाळा किती म्हणूनि वर्णू ।
वंध्या वृंदा, तिची सुश्रद्धा, पाडुनि बिबुधची,
पुत्ररत्न जिस देउनिया सतिची ॥
इच्छा पुरविली मनिंची ॥ ३ ॥

देवा अघटित तव लीला ॥
रजकही चक्रवर्ती केला ॥
दावुन विश्वरुप मुनिला ।
द्विजादरशूल पळें हरिंला ॥ चाल. ॥
दुभविला वांझ महिषी एक ।
निमिषामाजी, श्रीशैल्याला तंतुक नेला,
पतिताकरवी, वेद वदविला, महिमा अशी ज्याची ॥
स्मराही महिमा. ॥ ४ ॥

ओळखुनि क्षुद्रभाव चित्ती ।
दिधलें पीक अमित शेती ॥
भूसर एक शुष्क वृत्ती ॥
क्षणार्धे धनद तया करिती ॥ चाल. ॥
ज्याची अतुल असे करणी ।
नयन झांकुनी, सर्वे उघडितां नेला काशिस,
भक्त पाहातां वार्ता अशि ज्याची ॥
स्मरा हो वार्ता अशि ज्याची ॥ ५ ॥

दयाकुल औदुंबरि मुर्ती ।
नमितां होय शांतवृत्ती ॥
न देती जननमरण पुढती ।
सत्य हे न धर मनि भ्रांति ॥ चाल ॥
सनातन सर्वसाक्षी ऎसा ।
दुस्तर हा भव, निस्तरावया, जाउनि स्त्वर,
आम्ही सविस्तर, पूजा करुं त्याची ॥
चला हो पूजा करुं त्याची ॥ ६ ॥

तल्लिन होउनि गुरुचरणीं ।
जोडुनि भक्तराजपाणी ॥
मागे हेंचि जनकजननी ।
अंती ठाव देऊ चरणीं ॥ चाल. ॥
नको मज दुजे आणिक कांही ।
भक्तवत्सला, दीनदयाळा, परम कृपाळा, दास नित्य याची ॥
उपेक्षा करूं नको साची ॥ ७ ॥



श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह

🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...

Popular Blogs