श्रीगुरुमहाराज गुरू जय जय परब्रह्म सद्गुरू ॥ध्रु०॥
चारी मुक्तीदायक दाता उदार कल्पतरू जय० ॥१॥
रूप जयाचें मन-बुद्धीपर वाचे अगोचरू जय० ॥२॥
अलक्ष्य अनाम अरूप अद्वय अक्षय परात्परू जय० ।।३।।
बद्ध मुमुक्षु साधक शरणागता वज्रपंजरू । गुरू० ।।४।।
आत्मारामी रामदास गोपाल करुणाकरू गुरूo ||५||