Blog Views

दत्ताची पदे (श्रीगुरूचे चरणकंज)

श्रीगुरूचे चरणकंज हृदयीं स्मरावे ॥ध्रु०॥

 

निगमनिखिलसाधारण सुलभाहुनि सुलभ बहू । 

इतर योग योगविषयपंथिं कां शिरावें ॥१॥

 

नरतनुदृढनावेसी बुडवुनि अतिमूढपणें । 

दुष्ट नष्ट कुकर-सुकरतनु कां फिरावें ॥२॥

 

रामदास विनवी तुज अजुनि तरी समज उमज । 

विषयवीष पिउनियां फुकट कां मरावे ॥३॥

 

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs