Blog Views

Showing posts with label श्री विठ्ठल. Show all posts
Showing posts with label श्री विठ्ठल. Show all posts

॥ श्रीमद् भागवताची आरती ॥

॥ श्रीमद् भागवताची आरती ॥

आरती निगम वृक्ष सारा । भागवत संज्ञा भवतारा ।।धृ॥

नारद कथा साधु श्रवणी । परिक्षित लवला शुकचरणी ।
विरागे तनु त्याग करुनी। कथे अवतार कथा भरुणी ।
विदुर मैत्रेय संग घडला । विदुर मैत्रेय संग घडला ।
विधी अती कष्टी । निपजवी सृष्टी ।सुखाची वृष्टी ।
कपिल मुनी देवहुती तारा । पुरातन सुकर अवतारा ॥१॥

ब्रम्हसुत वंश"दक्ष"यागी । आला ध्रुव तपे अचल व्यापी।
पृथु प्राचिन बरी ही त्यागी।प्रीयव्रत वनवासा त्यागी ।
मही आकाश गोल वदला । मही आकाश गोल वदला ।
नरक भय हरुनी । अजामिळ तरुनी ।बोध बहु करुनी ।
चित्रकेतुने पैलपारा । काश्यप संतती सुखसारा ॥२॥

भक्त प्रल्हाद भये तटला । हरी-नरहरी रुप नटला ।
नक्रापासुन करी सुटला।समुद्रा मंथुनी बली विटला ।
कुर्म मोहिनी भिषक राजा। कुर्म मोहिनी भिषक राजा।
रवी शशी गात्र । राम युग गात्र ।आणिक नृपपात्र ।
कृष्णभक्तीने पैलपारा । नवम हा संपविला सारा ॥३॥

कंस चाणुर मुख्यविरा । दमया अवतरला हिरा ।
गोकुळी लिला करुनीशिनला।सहाय्य झाला अर्जुनविरा ।
उद्धवा ज्ञान करा बोधी।उद्धवा ज्ञान करा बोधी।
प्रलय युग विनय। मृकंडु तनय ।परिक्षिती सुनय ।
पावला हरि चरणी थारा। विठ्ठल वदे स्कंद बारा ॥४॥


श्री विठ्ठलाची आरती

श्री विठ्ठलाची आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जयदेव जयदेव हरी पांडुरंगा रखुमाई वल्लभा
राही च्या वल्लभा पावे जिवलगा जयदेव जयदेव

तुलसीमाळा गळा कर ठेवुनी कटी | कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी
देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥२॥
जयदेव जयदेव....

धन्य वेणूनाद अनुक्षेत्र पाळा | सुवर्णाची कमळे वनमाळा गळा
राही रखुमाई राणीया सकळा | ओवाळिती राजा विठोबा सांवळा ॥३॥ जयदेव जयदेव....

ओवाळू आरत्या कुर्वंडया येती | चंद्रभागेमाजी सोडुनिया देती
दिंड्या पताका वैष्णव नाचती | पंढरीचा महीमा वर्णावा किती ॥४॥ जयदेव जयदेव....

आषाढी कार्तिकी भक्त जन येती | चंद्रभागे मधे स्नान जे करिती

दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती | केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥  जयदेव जयदेव....

आरती दशाअवताराची (आरती सप्रेम )


आरती दशाअवताराची

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रम्ह ।
भक्त संकटी नाना स्वरूपी स्थापिसी स्वधर्म।। १।।

अंनऋषिकारणे गर्भवास सोशीसी।
वेदनेले चोरूनि ब्रम्हा आणुनिया देसी।
मत्सरूपी नारायण सप्तही सागर धुंडीसी।।
हस्त लागता तुझा शंरवासुरा वर देसी आरती ।। २||

रसातळासी जाता पृथ्वी पाठीवर घेसी।
परोपकारासाठी देवा कासव झालासी ।
दाढे धरूनी पृथ्वी नेता वराहरूप होसी।
प्रल्हादा कारणे नरहरि स्तंभी गुरगुरसी आरती ।। ३॥

पाचवे अवतार बळीच्या व्दाराला जासी।
निक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळा नेसी ।
सर्व समर्पण केले म्हणुनी प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरूनी बळीच्या व्दारी तिष्ठसी ४||

सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला|
कष्टी ते रेणूका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधीला ।
नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ५||

मातला रावण सर्वा उपद्रव केला।
तेहतीस कोटी देव बंदी हरले सीतेला।
पितृवचनासाठी राने वनवास केला।
मिळोनी वानरसेना राजाराज प्रगटला आरती ६||

देवकी वसुदेव बंदी मोचन त्वा केले।
नंदाघरी जावूनी निजसुख गोकुळा दिधळे।
गोरस चोरी करता नवलक्ष गोपाळ मिळविळे।
गोपिकांचे प्रेम देखुनी श्रीकृष्ण भुलले ७ ।।

बौदध कलंकी कलयुग झाला अधर्म हा अवघा ।
सोडून दिधळा धर्म म्हणुनी न दिरासी देवा ।
ग्लेंच्छमर्दन करीसी म्हणूनी कलंकी केशवा ।
बहिरवी जान्हवी निज सुखनंदाची सेवा आरती ।।८।।


विठ्ठलाची आरती २


विठ्ठलाची आरती २

येई हो विठ्ठले माझे माउली थे।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे ।। ध।।

आलिया गेलिया हातीं धाड निरोप
पंढरपुरी आहे माझा मायबाप|| येई ॥ १॥

पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला।
गरूडावरी बैसोनि माझा कैवारी आला येई| २||

विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णुदास नाना जीवेंभावें ओवाळी|| येई॥ ३॥

असो नसो भाव आम्हां तुझीया ठाया।
कृपा दृष्टी पाहे माझ्या पंढरीराया येई॥ ४॥


श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह

🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...

Popular Blogs