श्री विठ्ठलाची आरती
युगे अठ्ठावीस विटेवरी
उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म
आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी
जगा ॥१॥
जयदेव जयदेव हरी
पांडुरंगा रखुमाई वल्लभा
राही च्या वल्लभा पावे
जिवलगा जयदेव जयदेव
तुलसीमाळा गळा कर ठेवुनी
कटी | कांसे पितांबर कस्तुरी
लल्लाटी
देव सुरवर नित्य येती
भेटी | गरुड हनुमंत पुढे उभे
राहती ॥२॥
जयदेव जयदेव....
धन्य वेणूनाद अनुक्षेत्र
पाळा | सुवर्णाची कमळे वनमाळा
गळा
राही रखुमाई राणीया सकळा | ओवाळिती राजा विठोबा
सांवळा ॥३॥ जयदेव जयदेव....
ओवाळू आरत्या कुर्वंडया
येती | चंद्रभागेमाजी सोडुनिया
देती
दिंड्या पताका वैष्णव
नाचती | पंढरीचा महीमा वर्णावा
किती ॥४॥ जयदेव जयदेव....
आषाढी कार्तिकी भक्त जन
येती | चंद्रभागे मधे स्नान जे
करिती
दर्शन हेळामात्रे तया होय
मुक्ती | केशवासी नामदेव भावे
ओवाळिती ॥५॥ जयदेव जयदेव....