Blog Views

श्री दत्ताची आरती

श्री दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा
नेती नेती शब्द नये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥
जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्त आरती
ओवाळीता हरली भवचिंता जयदेव जयदेव

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त
अभाग्यासी कैसी कळे न ही मात
पराही परतली तेथे कैचा हा हेत
जन्म मरणाचा पुरला से अंत  ॥२॥  जयदेव जयदेव....

दत्त येउनिया उभा ठाकला
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला
प्रसन्न होऊनी आशिर्वाद दिधला
जन्म मरणाचा फ़ेरा चुकविला ॥३॥ जयदेव जयदेव....

दत्त दत्त ऎसे लागले ध्यान
हरपले मन झाले उन्मन
मी तु पणाची झाली बोळवण

एका जनार्दनी श्री दत्त ध्यान  ॥४॥  जयदेव जयदेव....

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs