Blog Views

श्री शंकराची आरती

श्री शंकराची आरती

लवलवथी विक्राळा ब्रह्मांडी माळा
विषे कंठकाळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्यसुंदर मस्तकी बाळा
तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा ॥१॥
जयदेव जयदेव जय श्री शंकरा आरती
ओवाळू भावार्थी ओवाळू  तुज कर्पुरगौरा

कर्पुर्गौरा भोळा नयनी विशाळा
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा
विभूतीचे उधळण शतकंठ निळा
ऎसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥२॥  जयदेव जयदेव....

देवी दैत्यी सागर मंथन पै केले
त्यामाजी अवचित हलाहल  जे उठिले
ते त्वां असुरपणे प्राशन केले
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥३॥ जयदेव जयदेव....

व्याघ्रांबरफ़णिवरधर सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन मुनिजनसुखहारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी
रघुकुलटिळक रामदासा अंतरी ॥४॥ जयदेव जयदेव....


श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs