Blog Views

॥ श्रीमद् भागवताची आरती ॥

॥ श्रीमद् भागवताची आरती ॥

आरती निगम वृक्ष सारा । भागवत संज्ञा भवतारा ।।धृ॥

नारद कथा साधु श्रवणी । परिक्षित लवला शुकचरणी ।
विरागे तनु त्याग करुनी। कथे अवतार कथा भरुणी ।
विदुर मैत्रेय संग घडला । विदुर मैत्रेय संग घडला ।
विधी अती कष्टी । निपजवी सृष्टी ।सुखाची वृष्टी ।
कपिल मुनी देवहुती तारा । पुरातन सुकर अवतारा ॥१॥

ब्रम्हसुत वंश"दक्ष"यागी । आला ध्रुव तपे अचल व्यापी।
पृथु प्राचिन बरी ही त्यागी।प्रीयव्रत वनवासा त्यागी ।
मही आकाश गोल वदला । मही आकाश गोल वदला ।
नरक भय हरुनी । अजामिळ तरुनी ।बोध बहु करुनी ।
चित्रकेतुने पैलपारा । काश्यप संतती सुखसारा ॥२॥

भक्त प्रल्हाद भये तटला । हरी-नरहरी रुप नटला ।
नक्रापासुन करी सुटला।समुद्रा मंथुनी बली विटला ।
कुर्म मोहिनी भिषक राजा। कुर्म मोहिनी भिषक राजा।
रवी शशी गात्र । राम युग गात्र ।आणिक नृपपात्र ।
कृष्णभक्तीने पैलपारा । नवम हा संपविला सारा ॥३॥

कंस चाणुर मुख्यविरा । दमया अवतरला हिरा ।
गोकुळी लिला करुनीशिनला।सहाय्य झाला अर्जुनविरा ।
उद्धवा ज्ञान करा बोधी।उद्धवा ज्ञान करा बोधी।
प्रलय युग विनय। मृकंडु तनय ।परिक्षिती सुनय ।
पावला हरि चरणी थारा। विठ्ठल वदे स्कंद बारा ॥४॥


श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs