Blog Views

आरती दशाअवताराची (आरती सप्रेम )


आरती दशाअवताराची

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रम्ह ।
भक्त संकटी नाना स्वरूपी स्थापिसी स्वधर्म।। १।।

अंनऋषिकारणे गर्भवास सोशीसी।
वेदनेले चोरूनि ब्रम्हा आणुनिया देसी।
मत्सरूपी नारायण सप्तही सागर धुंडीसी।।
हस्त लागता तुझा शंरवासुरा वर देसी आरती ।। २||

रसातळासी जाता पृथ्वी पाठीवर घेसी।
परोपकारासाठी देवा कासव झालासी ।
दाढे धरूनी पृथ्वी नेता वराहरूप होसी।
प्रल्हादा कारणे नरहरि स्तंभी गुरगुरसी आरती ।। ३॥

पाचवे अवतार बळीच्या व्दाराला जासी।
निक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळा नेसी ।
सर्व समर्पण केले म्हणुनी प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरूनी बळीच्या व्दारी तिष्ठसी ४||

सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला|
कष्टी ते रेणूका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधीला ।
नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ५||

मातला रावण सर्वा उपद्रव केला।
तेहतीस कोटी देव बंदी हरले सीतेला।
पितृवचनासाठी राने वनवास केला।
मिळोनी वानरसेना राजाराज प्रगटला आरती ६||

देवकी वसुदेव बंदी मोचन त्वा केले।
नंदाघरी जावूनी निजसुख गोकुळा दिधळे।
गोरस चोरी करता नवलक्ष गोपाळ मिळविळे।
गोपिकांचे प्रेम देखुनी श्रीकृष्ण भुलले ७ ।।

बौदध कलंकी कलयुग झाला अधर्म हा अवघा ।
सोडून दिधळा धर्म म्हणुनी न दिरासी देवा ।
ग्लेंच्छमर्दन करीसी म्हणूनी कलंकी केशवा ।
बहिरवी जान्हवी निज सुखनंदाची सेवा आरती ।।८।।


श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs