Blog Views

दत्ताची पदे (झाल्यें बाई! वेडी । दरबार गुरूचा झाडीं)

झाल्यें बाई! वेडी । दरबार गुरूचा झाडीं ॥ध्रु०॥

देहपीतांबर फाडिला । नवरत्नांचा हार काढिला ।

सद्गुरूचे गळां घातला। वासना सोडीं । दरबार० ॥१॥

कल्पनाकाचोळी काढिली । त्रिगुणांची वेणी सोडिली ।

चारि देहांची मुक्ति साधिली । परी ती थोडी ॥ दर० ॥२॥

वेडी झाल्ये सद्गुरुघरची । चिंता हरपली मनाची ।

सोय दाखविलि स्वसरूपाची । लागली गोडी । दर० ॥३॥

चिन्मयस्वरूप दाखवीलें । आपणामध्ये मेळवीलें ।

पूर्णानंद गुरुनें केलें । पाय न सोडीं । दरबार० ॥४॥

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs