तो मज आठवतो । गुरुराजा । प्राणविसांवा माझा ॥ध्रु॥
श्रवणीं पाजुनियां । अमृत । मस्तकं ठेवुनि हस्त ।।१।।
विवेकसिंधूचीं । चिद्रत्ने । लेवविलीं मज यत्नें ॥२॥
अखंड देउनियां । स्मरणासी । द्वैतभयातें नासी ।।३।।
अक्षयप्राप्तीचा । सुखदाता । केशवकवि म्हणे आतां ।।४।।