भवतारक या तुझ्या
पादुका वंदिन मी माथां । करावी कृपा गुरूनाथा ।।
बहु अनिवार मन माझे
चरणी स्थिर व्हावें । तव पदभजनी लागावें ॥ध्रु०॥
कामक्रोधादिक हे
षड्रिपु समूळ छेदावे । हेंचि मागणे मला द्यावें ॥ चला
अघहरणा करिं करुणा
दत्ता धांव पाव आतां । करावी कृपा गुरूनाथा ॥१॥
तूंचि ब्रह्मा
तूंचि विष्णु तूंचि उमाकांत । तूची समग्र दैवत ।।
माता पिता इष्ट
बंधू तूंचि गणगोत । तूंचि माझे सकळ तीर्थ ॥ चाल ॥
तुजविण मी गा
कांहिंच नेणें तूंची कर्ता हर्ता । करावी कृपा गुरूनाथा ॥२॥
तनमनधन हे सर्व
अर्पनी कुरवंडिन काया । उपेक्षू नको गुरूराया ।।
कर्महीन मी, मतीहीन मी, सकळ श्रम वायां ।। लज्जा राखी गुरु सदया चाल ॥
मातृबालकापरि
सांभाळीं तूंचि मुक्तिदाता । करावी कृपा गुरूनाथा ॥३॥
शेषा ब्रह्मया
वेदां न कळे महिमा तव थोर । तेथे मी काय पामर ।
वियोगनसुं दे तव
चरणांचा हाचि देई वर ।शिरीं या ठेवीं अभकर चाल ॥
हीच विनंती दर्शन
द्यावें दासा रघुनाथा करावी कृपा गुरूनाथा ॥४॥