Blog Views

कृपाप्रसादात्मक सिध्दस्त्रोत जगतवंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना।

श्री सद्गुरु शंकर महाराज यांच्या अत्यंत आवडीचे कृपाप्रसादात्मक सिध्दस्त्रोत जगतवंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना।

 

॥ ॐ दिनानाथ गुरु माऊली ॥ जगतवंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना। 

अनन्यभावें शरणागंत मी, भवभय वारण तुम्हीच ना ॥धृ.॥ 


कार्तवीर्य यदु परशुराम, प्रबोधले गुरु तुम्हीच ना। 

स्वामी जनार्दन एकनाथ तरि, कृतार्थ केलें तुम्हीच ना। 

नव नारायण सनाथ करुनी, पाय निर्मल तुम्हीच ना

मछिंद्रादि जति प्रवृत्त केले, जन उध्दारा तुम्हीच ना। 

दासोपंता घरी रंगले, परमानंदें तुम्हीच ना।। 

नाथ सदनिचे चोपदार तरि, श्री गुरु दत्ता तुम्हीच ना ।

युगायुगी निजभक्त रक्षणा, अवतरतां गुरुं तुम्हीच ना। 

बालोन्मत्त पिशाच्च वृत्ती, धारण करतां तुम्हीच ना ॥१॥ 


स्नान काशीपुरी चंदन पंढरिं, संध्या सागरिं तुम्हीच ना। 

करुनी भिक्षा करवीर भोजन पांचाळेश्वर तुम्हीच ना। 

तुळजापुरिं करशुध्दि तांबुल, निद्रा माहूर तुम्हीच ना।। 

करुनि समाधि मग्न निरंतर, गिरिनारी गुरु तुम्हीच ना। 

विप्र स्त्रियेच्या वचनि गुंतले, पिठापूरी गुरु तुम्हीच ना। 

श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती, करंजनगरिं तुम्हीच नां। 

जन्मतांच ओंकार जपोनी, मौन धरियलें तुम्हीच ना। 

मौजी बंधन वेद वाणी, जननि सुखविली तुम्हीच ना ॥२॥ 


चातुर्थाश्रम जीर्णोद्धार, आश्रम घेऊनि तुम्हीच ना। 

कृष्ण सरस्वती सद्गुरु वंदना, तीर्था गमले तुम्हीच ना। 

माधवारण्य कृतार्थ केला, आश्रम देऊनि तुम्हीच ना। 

पोटशुळाची व्यथा हरोनि, विप्र सुखविला तुम्हीच ना।

वेल उपटुनि विप्रा दिधला, है कुंभ गुरु तुम्हीच ना। 

तस्कर वधुनि विप्र रक्षिला, भक्त वत्सला तुम्हीच ना। 

विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला, निष्ठा देखुनि तुम्हीच ना। 

हीन जिब वेदपाठि केला, सजिव करुनी तुम्हीच ना ॥३॥ 


वाडी नरसिंह औदुंबरी, वास्तव्य करुनी तुम्हीच ना।

भीमा अमरजा संगमिं आले, गाणगापुरिं गुरु तुम्हीच ना । 

ब्राम्हमुहूर्त संगमस्थानी अनुष्ठान रत तुम्हीच ना। 

भिक्षा ग्रामीं करुनी, राहतां माध्यान्हीं मठिं तुम्हीच ना। 

ब्रह्मराक्षसां मोक्ष देऊनी, उध्दरिलें मठिं तुम्हीच ना। 

वांझ महिषे दुभविली फुलविले, शुष्क काष्ठ गुरु तुम्हीच ना। 

नंदीनामा कुष्ठी केला, दिव्य देहि गुरु तुम्हीच ना। 

त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनी, कुमशी ग्रामीं तुम्हीच ना  ॥४॥


अगणित दिधलें धान्य कापुनी, शुद्र शेत गुरु तुम्हीच ना। 

रत्नाईचे कुष्ठ दवडिलें, तीर्थ वर्णित तुम्हीच ना। 

आठहि ग्रामी भिक्षा केली, दिवाळी दिनिं तुम्हीच ना। 

भास्कर हस्तें चार सहस्त्रा, भोजन दिधलें तुम्हीच ना। 

निमिषमात्र तंतुक नेला, श्री शैल्यासी तुम्हीच ना। 

सायंदेवा काशीयात्रा, दाखविली गुरु तुम्हीच ना। 

चांडाल मुखी वेद वदविलें, गर्वं हराया तुम्हीच ना। 

साठ वर्षे., वांझेसी दिधले, कन्या पुत्रहि तुम्हीच ना ॥५॥


कृतार्थ केला मानस पूजा, नर केसरि गुरु तुम्हीच ना। 

माहुर चा सतिपति ऊठवोनी, धर्म कथियला तुम्हीच ना। 

रजकाचा यवनराज बनवुनि, उध्दारिला गुरु तुम्हीच ना। 

अनन्यभावें भजता सेवक, तरतिल वदले तुम्हीच ना। 

कर्दळिवनिचा बहाणा करुनी, गाणगापुरी स्थित तुम्हीच ना। 

निर्गुण पादुका दृश्य ठेऊनी, गुप्त स्वामी मैं तुम्हीच ना। 

स्वामी समर्थ दास मुढ परिं, अंगिकारिला गुरु तुम्हीच ना। 

आत्मचिंतनी रमवा निशिदिनी, ज्ञानेश्वर गुरु तुम्हीच ना ॥६॥

 

।। ॐ तत्सत् ॥

 


श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs