Blog Views

श्री सत्यदत्त आरती

श्री सत्यदत्त आरती

करितों प्रेमें तुज नीरांजन स्थिरावुनियां मन ॥
दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुन ॥धृ०॥


धरणीवर नर पीडित झालें भवरोगें सर्व ।
कामक्रोधादिक रिपुवर्गें व्यापुनि सगर्व ।
योग याग तप दान नेणती असतांहि अपूर्व ॥
सुलभपणे निजभजनें त्यासी उद्धारि जो शर्व ॥१॥


अत्रिमुनीच्या सदनीं तीन्हीं देव भुकें येतीं ।
भिक्षुक होऊनि अनसूयेप्रति बोलति त्रयमूर्तीं ।
नग्न होऊनी आम्हाप्रति द्या अन्न असें वदती ।
परिसुनि होउनि नग्न अन्न दे तंव ते शिशु होती ॥२॥


द्रर्वासाभिध मौनि जाहला शंभु प्रमथेंदु ।
ब्रह्मदेव तो झाला चंद्र झाला तो उपेंद्र ॥
दत्तात्रेय जो वीतनिद्र तो तारक योगींद्र ।
वासुदेव यच्चरण चिंतुनी हो नित्यातंद्र ॥३॥


समर्थ रामदास रचित || श्री नरसिंह पंचक ||

|| श्री नरसिंह पंचक || नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें। प्रगट रूप विशाळें दाविलें लोकपाळें। खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें। तट तट तट स्तंभि ...

Popular Blogs