Blog Views

अपराधक्षमा प्रार्थना

अपराधक्षमा प्रार्थना

अपराध क्षमा आता केला पाहिजे
गुरू हा केला पाहिजे ।
अबध्द सुबध्द गुण वर्णियले तुझे ।।ध्रु।।

नकळेची टाळविणा वाजला कैसा
गुरू हा वाजला कैसा ।
अस्ताव्यस्त पडे नाद झाला भल तैसा ।। १ ।।

नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर
गुरू हा कंठ सुस्वर ।
बरा नाही झाला वाचे वर्ण उच्चार ।। २ ।।

निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे
गुरू हे वेडे वाकुडे
गुण दोष नसावा हा सेवका कडे ।। ३।।

अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरू हा केला पाहिजे । 
अबध्द सुबध्द गुण वर्णियले तुझे ।।४ ।।

 


श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह

🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...

Popular Blogs