II श्री गजानन महाराजांचे २१ नमस्कार (दुर्वांकुर) II
शेगाव ग्रामी वसले गजानन I स्मरने तयांच्या
हरतील विघ्न II
म्हणूनी स्मरा अंतरी सद्गुरूला I नमस्कार माझा श्री गजाननाला II १ II
येऊनी तेथे अकस्मात मूर्ती I करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती II
उच्छिष्ट पात्राप्रती सेवियेला I
नमस्कार माझा श्री गजाननाला II२ II
उन्हा तहानेची नसे त्यास खंत I दावियले सत्य असेची संत II
पाहुनी त्या चकित बॅंकटलाल झाला I
नमस्कार माझा श्री गजाननाला II ३ II
घेऊनी गेला आपुल्या गृहासी I मनोभावे तो करी पूजनासी II
कृपाप्रसादे बहु लाभ झाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II ४ II
मरणोंन्मुखी तो असे जाणराव I तयांच्या मुळे लाभला त्यास जीव II
पदतीर्थ घेता पुनर्जन्म झाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II ५ II
पहा शुष्कवापी भरली जलाने I चिलीम पेटविली तये अग्निविने II
चिंचवणे नशिले करी अमृताला I नमस्कार माझा श्री गजाननाला II ६ II
ब्रह्म
गिरिला असे गर्व मोठा I करी तो प्रचारा अर्थ लावुनी खोटा II
क्षणार्धात त्याचा परिहार झाला I नमस्कार माझा
श्री गजाननाला II ७ II
बागेतली जाती खाण्यास
कणस I धुरामुळे करिती मक्षिका त्यास दंश II
योगबळे काढिले कंटकाला I नमस्कार माझा श्री
गजाननाला II ८ II
भक्ताप्रती असे प्रीत अपार I धावूनी जाती तया
देती धीर II
पुंडलीकाचा ज्वर तो निमाला I नमस्कार माझा
श्री गजाननाला II ९ II
बुडताच नौका नर्मदेच्या जलात I धावा करिती
तुमचाच भक्त II
स्त्री वेष घेऊनी तिने धीर दिला I नमस्कार माझा श्री गजाननाला II १० II
संसार त्यागीयला बायजाने I गजानना सन्निध वही
जिणे II
सदा स्मरे ती गुरूच्या पदाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II ११ II
पितांबरा करी भरी उद्कात तुंबा I पाणी नसे
भरविण्या नाल्यास तुंबा II
गुरुकरपेने तो तुंबा बुडाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II १२ II
हरितपर्न फुटले शुष्क आम्रवृक्षा I पितांबराची
घेत गुरु परीक्षा II
गुरुकृपा लाभली पितांबरला I नमस्कार माझा श्री
गजाननाला II १३ II
चिलीम
पाजवी म्हणून श्रीसी I ईच्छा मनी जाहली भिक्षुकसी II
हेतू तयाचा अंतरी जाणियेला I नमस्कार माझा
श्री गजाननाला II १४ II
बाळकृष्णा घरी त्या बाळापुरासी I समर्थरूपे
दिले दर्शनासी II
सज्जनगडाहुनी धावूनी आला I नमस्कार माझा श्री
गजाननाला I I१५ II
नैवेद्य पक्वान्न बहू आणियेले I कांदा भाकरीसी
तुम्ही प्रिय केले II
कवरासी पाहुनी आनद झाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II १६ II
गाडी तुम्ही थंबिवली दयाळा I गार्डाप्रती
दावियेली तिला II
शरणांगती घेऊनी तोही आला I नमस्कार माझा श्री
गजाननाला II १७ II
जाती
धर्म नाही तुम्ही पाळीयेला I फकीरा सवे हो तुम्ही
जेवीयेला II
दावूनी ऐसे जाना बोध केला I नमस्कार माझा श्री
गजाननाला II १८ II
अग्रवालास सांगे म्हणे राममूर्ती I अकोल्यास
स्थापुनी करी दिव्यकीर्ती II
सांगता
क्षणी तो पहा मानिला I नमस्कार माझा श्री गजाननाला II १९ II
करंजपुरीचा
असे एक विप्र I उदरी तयाच्या असे की हो दु:ख II
दु:खातूनी
तो पहा मुक्त झाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II २० II
दुर्वांकूरा
वाहुनी एकवीस I नमस्काररुपी श्री गजाननास II
सख्यादास
वही श्रीगुरूच्या पदाला I नमस्कार माझा श्री गजाननाला II २१ II