बुधवार व्रताची कहाणी
ऎका ऎका महालक्ष्मी तुमची कहानी कौंडीन्यपुर नावाचं नगर होते तेथे एक गरीब
पण सात्वीक विचाराचे वेश्य कुटूंब परीस्थीतीशी झगडत कसेबसे दिवस काढत होते. घरात
आठरा विश्व दारिद्र्यअसुनही दारात येणार्या याचकाला यथाशक्ती दान करायला ते कधीही मागे
पुढे बघत नसत.दिवसेंदिवस त्यांचे दारिद्र्य वाढत गेले. तशातच मुरलीधर वैश्यांचा
आजार वाढत होता. त्याची पत्नी सत्यवती परीस्थितीने अतिशय दुखी होऊन पोट
भरण्याकरीता कामाचा शोध करीत असे. एकेदिवशी काम न मिळाल्यामुळे थकुन भागुन घरी आली,
तो घरात एक साधु भिक्षुक " माई भिक्षा घाल " म्हणुन दारात
उभा, घरात तर काही शिल्लक नव्ह्ते. बाईला आपल्या
दारीद्र्याचे अतिशय दुखः झाले व तीच्या डोळ्यातुन पाणी वाहु लागले तीच्या डोळ्यात
पाणी पाहुन भिक्षुकाला अतिशय आश्च्रर्य वाट्ले, व त्याने
तीला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा ती म्हणाली " साधु महाराज आपण दयाळु
म्हणुन माझी दुखः स्थिती तुम्हाला सांगते , मी या नगरात
राहण्यार्या मुरलीधर वैश्याची पत्नी असुन माझे नाव सत्यवती आहे . आजतागायत आम्ही
खाऊनपिऊन सुखी होतो, पण सहा महीने झाले माझे पतीदेव आजारी
आहेत त्यामुळे अन्नाला आम्ही महाग होऊन बसलो आहोत. आज तर काम शोधुनही काम न
मिळाल्यामुळे मी रिकाम्या हाताने घरी आले. आता तुम्हाला भिक्षा काय घालू ? असा प्रश्न मला पडल्यामुळे मला दुखः होत आहे
सत्यवतीबाईचा सात्वीक शांत स्वभाव पाहुन साधुला दया आली, तो सत्यवतीला म्हणाला " पोरी आम्हा गरींबांचा वाली परमेश्वर
! आज मी तुला दारिद्र्य नाशाचा आणी तुझा पती बरा होण्याचा उपाय तुला सांगतो. तु तो
करशील का ? तु धार्मिक दिसतेयस म्हणुन सांगत आहे "
आपल्या विषयाचा साधु महाराजांना दयाभाव पाहुन सत्यवती व्रत करण्यास उत्सुक झाली. व
अतिहर्षाने साधु महाराजांचे पाय धरुन म्हणाली " सांगा महाराज तुम्ही
सांगीतल्याप्रमाणे मी व्रत करेन पण ते कसे करायचं ? कोणतं
व्रत ? त्याचे उद्यापन कसे करायचे ? त्याचे
फ़ल काय ? वगैरे मला सविस्तर सांगा.
महाराज म्हणाले " ऎक मुली, हे व्रत केव्हाही करता येते कोणत्याही महीन्यातील एका शुभ
बुधवारी या व्रतास प्रारंभ करावा. बुधवारी सकाळी ऊठून डोक्यावरुन स्नान
करावे.स्नानानंतर पांढरी वस्त्रे परीधान करावीत दिवसभर तिखट-मीठ खाऊ नये. दुध व
केळी यांचा आहार एकच वेळी घ्यावा. संध्याकाळी आंघोळ करुन तांब्यात पाच विड्याची
पाने ठेऊन त्यावर एक नारळ ठेवावा तसेच तो तांब्यात अगर कुंकु मिश्रीत ताम्हणात
ठेवावा त्याला हळदी कुंकु वहावे पांढरी फ़ुले घालावीत, अकरा
मण्यांच्या कापसाचे वस्त्रमाळ घालावी. तीची यथासांग पुजा झाल्यानंतर लक्ष्मीला
आळणी भात व दुधाचाच नैवेद्य दाखवावा. देवीचा श्री महालक्ष्मी नमः असा पाच वेळा जप
करावा नंतर "मी आज तुझी यथाशक्ती पुजा केली तेव्हा हे देवी लक्ष्मी तु
प्रसन्न होऊन माझी इच्छा पुर्ण कर"
अशी प्रार्थना करावी नंतर देवीचा नैवेद्य आपण खाऊन टाकावा. जेवताना कोणाशी
बोलु नये असे अकरा बुधवार करावेत. आपण दुध घ्यावे की केळी हे ठरवुन घ्यावे त्या
प्रमाणे फ़क्त तसाच फ़राळ घ्यावा. जेवढा पहिल्या बुधवारी घ्याल तेवढाच ११ बुधवारी
घ्यावा त्यातील प्रमाणात बदल करु नये. बुधवारी जास्त कोणाशी बोलु नये. भांडणापासुन
अलीप्त रहावे म्हणजे या व्रताचे फ़ळ ताबडतोब मिळते. तसेच व्रत करणाया रमणीच्या
मासिक पाळीत बुधवारी आल्यास त्या बाईने आणखी एक बुधवार जास्त करुन व्रताचे उद्यापन
करावे.
उद्यापनाच्या म्हणजे बाराव्या दिवशी एक लेकुरवाळी शांत
स्वभावाची, सालस सुवासीनीला जेवायला बोलवावे तीला त्या
दिवशी उपवास करावयास सांगावा. गोड-धोड पक्वान्न करुन देवीला नैवेद्य दाखवावा आणी
तोच नैवेद्य सुवासीनीला खाउ घालावा तीचे भोजन यथेच्छ होईल याकडे लक्ष द्यावे. नंतर
तीची खणा नारळाने ओटी भरुन पानाचा विडा दक्षिणा देऊन प्रसन्न मनाने तीला पाठवावे.
अशा प्रकारे हे व्रत मनोभावे पुर्ण होते. दारिद्र्याचे दारिद्र्य जाते, एखाद्या रोग्याचा रोग बरा होतो युवकांच्या इच्छेप्रमाणे नोकरी लागते,
विवाह मनाप्रमाणे होतात, पुत्ररत्नाचा लाभ हवा
असल्यास पुत्र होतो, धन इच्छुकांना धन मिळते.अशा प्रकारे जो
हेतु मनात ठेऊन व्रत करतो त्याप्रमाणे त्यास तसे फ़ळ मिळते. मात्र त्यावर व्रत
करणार्याने विश्वास ठेऊनच व्रत करावे म्हणते लक्ष्मी लवकर प्रसन्न होते इतके
सांगुन साधु महाराज निघुन गेले. बाईने मनःपुर्वक व्रत ऎकुन घेऊन करण्यास प्रारंभ
केला. पाचव्या बुधवार पासुन तीच्या पतीला बरे वाटले थोड्याच दिवसात बाई
लक्ष्मीच्या कृपेने सुखी होऊन आनंदात दिवस घालवु लागली.
जशी सत्यवतीला लक्ष्मी प्रसन्न झाली तशी ती तुम्हा आम्हाला
होवो हि साठा उत्तराची कहानी पाचा उत्तरी सुफ़ल संपुर्ण.