निशंक
हो ! निर्भय हो मना रे
प्रचंड
स्वामीबळ पाठीशी रे l
अतर्क्य
अवधूत हे स्मरणगामी l
अशक्यही
शक्य करतील स्वामी ll१ll
जिथे
स्वामी पाय तिथे न्यून काय !
स्वंय
भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविना
काळही ना नेई त्याला
परलोकही
ना भीती तयाला ll२ll
उगाची
भितोसी, भय हे पळू दे
जवळी
उभा स्वामी शक्ती कळू दे
जगी
जन्म-मृत्यू असे खेळ ज्यांचा
नको
घाबरू तू बाळ असे त्यांचा ll३ll
खरा
होई जागा श्रद्धेसहीत
कसा
होसी तयावीण तू स्वामीभक्त?
कितीदा
दिला बोल ! त्यांनीच हात !
नको
डगमगू स्वामी देतील हात ll४ll
विभूती
नमननाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच
या पंच प्राणामृतांत
हे
तीर्थ घेई, आठवी रे प्रचीती
न
सोडवी तया, जया स्वामी हाती घेती ll५ll
ll जय शंकर ll
ll श्री स्वामी समर्थ ll