Blog Views

||श्री गुरुपादुकाष्ट्क ||


||श्री गुरुपादुकाष्ट्क ||

ज्या संगतीनेच विराग झाला |
मनोदरीचा जडभास गेला ||
साक्षात परात्मा मज भेटविला |
विसरू कसा मी गुरुपादुकाला ||  ||

सद्योगपंथे घरि आणियेले |
अंगेची माते परब्रह्म केले ||
प्रचंड तो बोध रवी उदेला |
विसरू कसा मी गुरुपादुकाला || ||

चराचरी व्यापकता जयाची |
अखंड भेटी मजला तयाची ||
परम्पदी संगम पूर्ण झाला |
विसरू कसा मी गुरुपादुकाला || ||

जो सर्वदा गुप्त जनात वागे |
प्रसन्न भक्तां निजबोध सांगे ||
सद् भक्तीभावाकरीता भुकेला |
विसरू कसा मी गुरुपादुकाला || ||

अनंत माझे अपराध कोटी |
नाणी मनी घालुनि सर्व पोटी ||
प्रबोधीता तो श्रम फार झाला |
विसरू कसा मी गुरुपादुकाला ||||

काही मला सेवनही न झाले |
तथापि तेणे मज उद्धरिले ||
आता तरी अर्पिन प्राण त्याला |
विसरू कसा मी गुरुपादुकाला || ||

माझा अहंभाव असे शरीरी |
तथापि तो सदगुरु अंगिकारी ||
नाही मनी अल्पविकार ज्याला |
विसरू कसा मी गुरुपादुकांला || ||

आता कसा हा उपकार फेडू |
हा देह ओवाळूनि दूर सोडू ||
म्या एकभावे प्रणिपात केला |
विसरू कसा मी गुरुपादुकाला || ||

जया वानिता वनिता वेदवाणी |
म्हणे नेति नेती लाजे दुरुनी ||
नव्हे अंत ना पार ज्याच्या रुपाला |
विसरू कसा मी गुरुपादुकाला || ||

जो साधुचा अंकित जीव झाला॥
त्याचा असे भार निरंजनाला.॥
नारायणाचा भ्रम दूर केला ॥
विसरू कसा मी गुरुपादुकाला ॥१०॥

इति श्री नारायण विरचितं गुरुपादुकाष्टकम संपूर्णम॥

॥श्री दत्तात्रेयार्पणमस्तू॥


श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs