विड्याची
पाने आणि त्याचे महत्व
१- या
पानाच्या टोकास-लक्ष्मीवास
२-
विडयाच्या पानाच्या उजव्या बा -जूस ब्रम्हदेवांचा वास..
३-
विडयाच्या पानाच्या मधोमध सरस्वती
देवीचा वास..
४-
विडयाच्या पानाच्या डाव्या बाजू स पार्वतीदेवीचा वास...
५-
विडयाच्या पानाच्या लहान देठा मधे महाविष्णूचा वास...
६-
विडयाच्या पानाच्या मागीलबाजू स चंद्रदेवता वास...
७-
विडयाच्या पानाच्या सर्व कोप ऱ्या मधे परमेश्वराचा वास...
८-
विडयाच्या पानाखाली मृत्युदेवते चा वास..(या कारणाने ताम्बूलसेव न करतांना बुडाचा
भागकाढून मग सेवन करण्याची पद्धत).
९-
विडयाच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात...(म्हणूनच
पान सेवन करतांना देठ काढून देतात..अहंकार
आणि दारिद्रय लक्ष्मी येऊ नये याअर्थी..)
१०-
विडयाच्या पानात मध्यभागा नंतर मन्मथाचा वास...यासर्व
देवतांचा विडयाच्या पाना मधे वास असल्यामुळे ताम्बूलास इतके
महत्त्व आहे.पूर्व
किंवा उत्तरदिशेस पानाचे टोक येईल असे ठेऊन देवास नैवेद्य दाखवावा.कोणा
कडेही तांबूल दिल्यास ते देवापुढे
ठेवून नमस्कार करून मगंच तो उपभोगावा...मंगळवारी,शुक्रवारी कोणत्याही कारणे
विडयाची पाने घरा बाहेर जाऊ
देऊ नयेत...हिरवीगार
आणि मस्त हस्ताकार असलेली
कोवळी पाने नैवेद्यास ठेवावीत
आणि तांबूल म्हणून द्यावीत...