श्रीदत्तराया गिरनार वासी ॥
अस्तित्व आहे गाणगापुरासी
औदुंबरीही तुझी नित्य फेरी ॥
तुजवीण दत्ता मज कोण तारी
कषाय वस्त्रे जटाभार झोळी ॥
पायी खडावा शुभ्र भस्म भाळी
शिरें तीन सहा हस्त शस्त्रधारी ॥
तुजवीण दत्ता मज कोण तारी
गोरूप भूमाय श्वारुप वेद ॥
दूर्लक्षी माझे सहस्त्र प्रमाद
शास्त्रे पुराणे तुझे भाट सारी ॥
तुजवीण दत्ता मज कोण तारी।।