स्वामी समर्थ १०८ नामावली
अनुभव
श्री स्वामी समर्थ १०८ नामावलीही नामावली स्वतः च्या हाताने एका को-या कागदावर लिहिण्यास सुरवात करावी.
ॐ दिगंबराय नमः
ॐ वैराग्यांबराय नम :
ॐ ज्ञानांबराय नमः
ॐ स्वानदांबराय नमः
ॐ अतिदिव्यतेजांबराय नमः
ॐ काव्यशक्तिप्रदायिनेनमः
ॐ अमृतमंत्रदायिने नमः
ॐ दिव्यज्ञानादत्ताय नमः
ॐ दिव्यचक्षुदायिने नमः
ॐ चित्ताकर्षणाय नमः
ॐ चित्तशांताय नमः
ॐ दिव्यानुसंधानप्रदायिने नमः
ॐ सद्गुणविवर्धनायनम :
ॐ अष्टसिध्दिदायकम नमः
ॐ भक्तिवैराग्यदत्ताय नमः
ॐ मुक्तिभुक्तिशक्तिप्रदायने नमः
ॐ गर्वदहनाय नम:
ॐ षङरिपुहरिताय नमः
ॐ आत्मविज्ञानप्रेरकाय नमः
ॐ अमृतानंददत्ताय नमः
ॐ चैतन्यतेजसे नमः
ॐ श्रीसमर्थयतये नमः
ॐ भक्तसंरक्षकाय नम :
ॐ अनंतकोटिब्रम्हांडप्रमुखाय नमः
ॐ अवधूतदत्तात्रैय नम :
ॐ चंचलेश्वराय नमः
ॐ आजानुबाहवे नमः
ॐ आदिगुरवे नम :
ॐ श्रीपादवल्ल्भाय नमः
ॐ नृसिंहभानुसरस्वत्ये नमः
ॐ कुरवपुरवासिने नमः
ॐ गंधर्वपुरवासिने नमः
ॐ गिरनारवासिने नमः
ॐ श्रीकौशल्यनिवासिने नम:
ॐ ओंकारवासिने नमः
ॐ आत्मसूर्याय नमः
ॐ प्रखरतेजा प्रचतिने नमः
ॐ अमोघतेजानंदाय नमः
ॐ तेजोधराय नमः
ॐ परमसिध्दयोगेश्वराय नमः
ॐ स्वनंदकंदस्वामिने नमः
ॐ स्मर्तृगामिने नम:
ॐ कृष्णानंद अतिप्रियाय नमः
ॐ योगिराजेश्वरया नम:
ॐ भक्तचिंतामणिश्वराय नमः
ॐ नित्यचिदानंदाय नमः
ॐ अकारणकारुण्यमूर्तये नमः
ॐ चिरंजीवचैत्यन्याय नमः
ॐ अचिंत्यनिरंजनाय नमः
ॐ दयानिधये नमः
ॐ भक्तचिंतामणीश्वराय नमः
ॐ शरणागतकवचाय नमः
ॐ वेदस्फूर्तिदायिने नमः
ॐ महामंत्रराजाय नमः
ॐ अनाहतनादप्रदानाय नमः
ॐ सुकोमलपादांबुजाय नमः
ॐ चित्शक्यात्मने नमः
ॐ अतिस्थिराय नमः
ॐ माध्यन्हभिक्षाप्रियाय नमः
ॐ प्रेमभिक्षांकिताय नमः
ॐ योगक्षेमवाहिने नमः
ॐ भक्तकल्पवृ़क्षाय नमः
ॐ अनंतशक्तीसूत्रधराय नमः
ॐ परब्रह्माय नमः
ॐ अनितृप्तपरमतृप्ताय नमः
ॐस्वावलंबनसूत्रदाये नमः
ॐ असमर्थसामर्थ्यदायिने नमः
ॐ योगसिध्ददायकम नमः
ॐ बाल्यभावप्रियांय नमः
ॐ भक्तिनिधनाय नमः
ॐऔदुंबरप्रियाय नमः
ॐ यजसुंकोमतलनुधारकाय नम:
ॐ त्रिमूर्तिध्वजधारकाय नमः
ॐ चिदाकाशव्याप्ताय नमः
ॐ केशरचंदनकस्तूरीसुगंधप्रियाय नमः
ॐ साधक संजीवन्यै नमः
ॐ कुंडलिनीस्फूर्तिदात्रे नमः
ॐ अक्षरवालाय नमः
ॐ आनंदवर्धनाय नमः
ॐ सुखनिधानाय नमः,
ॐ उपमातिते नमः,
ॐ भक्तिसंगीतप्रियाय नमः,
ॐ अकारणसिध्दिकृपाकारकाय नमः,
ॐ भवभयभंजनाय नमः ,
ॐस्मितहास्यानंदाय नमः,
ॐ संकल्पसिध्दाय नमः,
ॐ संकल्पसिध्दिदात्रे नमः,
ॐ सर्वबंधमोक्षदायकाय नमः,
ॐ ज्ञानातीतज्ञानभास्कराय नमः,
ॐ श्रीकिर्तीनाममंत्राभ्यों नमः,
ॐ अभयवरददायिने नमः,
ॐ गुरुलीलामृत धाराय नमः, ॐगुरुलीलामृतधारकाय नमः,
ॐ वज्रसुकोमलहृदयधारिणे नमः,
ॐ सुविकल्पातीतसहजसमाधिभ्यों नमः,
ॐ निर्विकल्पातीतसहजसमाधिभ्यों नमः,
ॐ त्रिकालातीतत्रिकालज्ञानिने नमः,
ॐ भावातीतभावसमाधिभ्यों नमः,
ॐ ब्रंह्मातीत - अणुरेणुव्यापकाय नमः,
ॐ त्रिगुणातीतसगुणसाकारसुलक्षणाय नमः,
ॐ बंधनातीतभक्तिकिरणबंधाय नमः,
ॐ देहातीतसदेहदर्शनदायकाय नमः,
ॐ चिंतनातीतसदेहदर्शनदायकाय नमः,
ॐ मौनातीत - उन्मनीभावप्रियाय नमः,
ॐ बुध्दयतीतसद् बुध्दिप्रेरकाय नमः,
ॐ मत् प्रिय - पितामहसद् गुरुभ्यों नमः,
ॐ पवित्रमात्यसाहेबचरणाविदभ्यो नमः
ॐ अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः!!
*स्वामी आवड…!!!!*
“स्वामीना तूळस, भगव्या रंगाची फुले आवडत असे स्वामी सूत सांगतात ;ते एके ठिकाणी म्हणतात ::
” परी हो स्वामीसी आवडे भगवे फूल !
भगव्या फुलाची माळ ती सगुन !करोनिया तुम्ही चरणी अर्पा !!
———————————————-
श्री स्वामी समर्थाना खाण्याच्या पदार्थात “बेसनाचे लाडू “,”पूरण पोळी” ,कड्बोळी व “कांद्याची भजी” त्याना विशेष आवडत असे.
स्वामी कुत्रा, गायीवर खुप प्रेम करत असत…!!
*स्वामी समर्थ तारक मंत्र*
॥ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा ॥
॥ गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ॥
॥ श्री गुरुदत्तात्रेयाय - स्वामी समर्थाय नमो नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थाय नमः ॥
स्वामी समर्थ महाराज की जय
हे मना रे, निर्भय हो । निःसंशयी हो ।असे पाठीशी रे । प्रचंड स्वामी बळ हे ।स्मृतगामी अतकर्य । अवधूत हे ।अशक्य ते शक्य । करतील स्वामी हे ॥१॥
जेथे स्वामी चरण । असे उणे काय तेथे ।भक्त प्रारब्ध । स्वये घडवी ही प्राय ।न नेई तयाला । आज्ञेविण काळ ।नसे भिती ही । परलोकी ही तयाला ॥२॥
भय हे पळेल । घेताच नाम स्वामींचे ।आहे जवळी ही उभी । स्वामीच शक्ती रे ।जन्म मृत्यू हा खेळ । असे जगी ज्यांचा ॥३॥
श्रद्धा ठेव रे । स्वामी मंत्रावरी ।त्या विणा कसारे । होशील त्यांचा भक्त ।देतात आपणा । सदैव तेच हात ।देतील स्वामीच साथ । नको उगा घाबरु ॥४॥
घे हेच स्वामी तीर्थ । होय भयभय मुक्त ।आहेत स्वामीच । या नाशीवंत देहात ॥आठवी रे प्रचिती । घेऊनी या हे तीर्थ ।न वंचिती तूला हे । स्वामी समर्थ ॥५॥
अनन्याश्चिंतयन्तो मां येजनः पर्युपासते ।तेषां नित्याभियुक्तनां योगक्षेम वहाम्यहं ।श्री स्वामी चरणारविदार्पणमस्तु ॥६॥
*'' भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ''*
🌹 *|| श्री स्वामी समर्थ मानस पूजा ||* 🌹
|| श्रीगणेशाय नम: ||नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति रूपम || ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||
हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा || मला ध्यान मूर्ती दिसूदेई डोळा || कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हा विण हो जीव तैसा || १ ||
स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी || हृदयासनी या बसा प्रार्थितो मी || पूजेचे यथासांग साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ ||
महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ ||
सुवर्ण ताटी महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षदा लावू मोती|| शुभारंभ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवूया मस्तकाला|| ४ ||
हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा प्रणिपात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५ ||
ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा || दहीदुध शुद्धोदकाने तयाला || पंचामृती स्नानघालू प्रभूला || ६ ||
वीणा तुतार्या किती वाजताती || शंखादि वाद्ये पहा गर्जताती म्हणती नगारे गुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्तस्वामी समर्थ || ७ ||
प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळता जगा या || ८ ||
मीं धन्य झालो हे तीर्थ घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता अजानबाहू भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज || ९ ||
प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशिमी वस्त्र साज || सुगंधित भाळी टीळा रेखियेला || शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० ||
वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा ||शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते|| ११ ||
गंधाक्षदा वाहूनीया पदाला || ही अर्पूया जीवन पुष्प माला|| चरणी करांनी मिठी मारू देई || म्हणे लेकरासी सांभाळ आई|| १२ ||
इथें लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधीत हा धूप नानाप्रतिचा || पुष्पाजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ ||
करूणावतारी अवधूत कीर्ति || दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती || प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी दिव्यता स्वामी योगेश्र्वरांची || १४ ||
हृदमंदिराची ही स्नेह ज्योती || मला दाखवी स्वामिची योगमुर्ति || करू आरती आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ ||
पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा वरून || निघेना पुढें शब्द बोलू मी तोही || मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ ||
हे स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला || पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें हीखव्याची || १७ ||
डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा || हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा || पुढें हात केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ ||
तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा करू द्यावी आता || प्रसन्नतेतून मागू मी काय || हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||
सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षणा मी तुम्हां काय देऊ || नको दूर लोटू आपुल्या मुलासी || कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||
धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू दे शीर शरणा गताला || हृदयी भाव यावें असे तळमळीचे || करी पुर्ण कल्याणजे या जिवाचे || २१ ||
तुझें बाळ पाही तुझी वाट देवा || नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा || मनी पूजनाची असे दिव्य ठेव || वसो माझीया अन्तरी स्वामी देव || २२ ||
|| श्री दत्ता श्री स्वामी समर्थांर्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त ||
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩