Blog Views

स्वामीसुत आणि काकड आरती



काकड आरती

ओवाळीतो काकड आरती !
स्वमिसमार्था तुज प्रती !!
ओवाळीतो काकड आरती !
स्वमिसमार्था तुज प्रती !!
चरण दावे जगत्पते !
स्तवितो तुझी आदिमुर्ती !!
ओवाळीतो काकड आरती !
स्वमिसमार्था तुज प्रती !!
चरण दावे जगत्पते !
स्तवितो तुझी आदिमुर्ती !!
भक्तजन येउनिया !द्वारी उभे स्वामीराया !
चरण तुझे पहावया !तिष्ठती अतिप्रती !!१!!

ओवाळीतो काकड आरती !
स्वमिसमार्था तुज प्रती !!
चरण दावे जगत्पते !
स्तवितो तुझी आदिमुर्ती !!
भक्तांच्या कैवारे समर्थ निर्धारे
हात ठेउनिया चरणावरी !!
गातो आम्ही तुझी स्तुती !!२!!

ओवाळीतो काकड आरती !
स्वमिसमार्था तुज प्रती !!
चरण दावे जगत्पते !
स्तवितो तुझी आदिमुर्ती !!
पूर्णब्रम्ह देवाधिदेव !निरंजना तुझा
ठाव !!भक्तांसाठी देहभाव !धरिसी तू विश्वपती!!३!!

ओवाळीतो काकड आरती !
स्वमिसमार्था तुज प्रती !!
चरण दावे जगत्पते !
स्तवितो तुझी आदिमुर्ती !!
स्वामी तूची कृपाधन !उठोनी देई दर्शन !!
स्वमिदास चरण वंदून !!मागतसे भावभक्ती!!४!!

ओवाळीतो काकड आरती !
स्वमिसमार्था तुज प्रती !!
चरण दावे जगत्पते !
स्तवितो तुझी आदिमुर्ती !!
चरण दावे जगत्पते !
स्तवितो तुझी आदिमुर्ती !!५!!


!!श्री स्वामी समर्थ !!
स्वामीसुत
उठा उठा सकळ जन ! पाहूचला स्वामी चरण !!
तुटोनि जाईल भवबंधन ! भावेचरण पाहतांची !!धृ!!
त्यांचे होतांचि दर्शन ! तृप्त होतीन नयन !!
भावे घालोनि लोटांगण ! चरण तुम्ही वंदाते !!१!!
कोटि तीर्थ चरणापाशी ! त्या चरणी सदभावेसी !!
विनदुनि तुम्ही अहर्निशीं ! जन्म मरण चुकवा कीं !!२!!
रुप पाहाताचि लोचनी ! सुख होईल साजण !!
अज्ञान जाऊनि तत्क्षणीं ! ज्ञानज्योती प्रगटेल !!३!!
जपा नाम निर्धारी ! पावन ते पंचदशाक्षरी !!
तेणे चुकूनि तुमची फेरी ! मोक्षपद मिळेल कीं !!४!!
परब्रम्ह हे अवतरले ! म्हणुनी नाम ते पावलें !!
आता जपा तोंचि वाहिले ! तुम्हा सुख व्हावया !!५!!
स्वामी नाम हाचि वन्ही ! महापापें ती तत्क्षणीं !!
तृणवत टाकील जाळुनी ! प्रातःकाळी स्मरतांची !!
धर्मलोप बहु झाला ! तेणे भूभार वाढला !!
म्हणुनी समर्थ अवतरला ! जड मूढा ताराया !!७!!
प्रातःकाळी दर्शन घेता ! मुक्ती मिळेल सायुज्यता !!
तेणे चुकेल जन्म व्यथा ! भावे दर्शन घेताचि !!८!!
रुप सुंदर सुकुमार ! दिसे आति मनोहर !!
पाहुनि तेंचि सत्वर ! कृतार्थ तुम्ही व्हाल कीं !!९!!
कोटी सुर्याची ही प्रभा ! चला दर्शन घ्यावया !!१०!!
सत्य सांगे स्वामीसुत ! स्वामी पहा हो प्रेमयुक्त !!
तेणे व्हाल जन्ममुक्त ! संदेह काही असेना !!११!!


श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs