देवघरात देव कसे मांडून पुजावे
देवघरात देव कसे मांडावे हे खूप
महत्वाचे आहे ,कारण क्रम जर चुकला तर त्याचा दोष आहे म्हणून
सर्वांनी हा निर्णय समजून घ्यावा व आचरणात आणावा माहिती देतो आहे सर्व देवता पंचांयत कसे मांडावे ?
नारायणं महादेवमादित्यं गणनायकं ।। शक्तींचैवाथ पंचैतान् प्रत्यहं
पूजयेन्नर:।। स्वस्थानवर्जिता देवा:शोकदुःख भयप्रदा:।। अतस्तेषां स्थापनं
प्रकारोवक्ष्यते।। अभीष्टदेवतां मध्ये स्थापयेत् भक्तिमान्नर:। ईशान्यादिक्रमेनैव
स्थाप्याश्चैवान्यदेवता :।। देवस्य मुख्यमारभ्य दिशं प्राचीप्रकल्पयेत् ।।
अर्थ :- प्रतिदिवशी विष्णू-महादेव-सूर्य -गणपती -देवी या पाच
देवांची विशेष करून पूजा करावी. हे देव शास्त्रात सांगितल्या प्रमाणे न ठेवता उलट
क्रमाने मांडून पूजा केली असता दुःख,शोक , भय हे प्राप्त होतात असे शास्त्र सांगते म्हणून यांच्या स्थापनेचा प्रकार
सांगतो , वरील देवांपैकी आपणास इष्ट जी देवता असेल ती मध्ये
मांडून ईशान्य आदी दिशांच्या क्रमाने बाकीच्या देवतांची स्थापना करावी .
विष्णू पंचायतन
।। यदातु मध्ये गोविंदमैशान्यां शंकरं यजेत् । आग्नेयां गणनाथंच
नैऋत्यां तपनं तथा। वायव्यामम्बिकांचैव यजेन्नित्यं समाहित:।।
अर्थ :- मध्ये विष्णूची स्थापना करावी ईशान्य दिशेला शंकर, आग्नेय दिशेला गणपती, नैऋत्य दिशेला सूर्य ,आणि वायव्य दिशेला देवी या प्रमाणे श्री विष्णू पंचायतन मांडावे.
शिव पंचायतन
।। यदातु शंकरो मध्ये ऐशान्यां श्रीपतिं यजेत् । आग्न्येयांच तथा
हंसं नैऋत्यां पर्वतीसुतं । वायव्यांचं सदा पूज्या भवानी भक्तवत्सला।।
अर्थ:-मध्ये शंकर ईशान्य दिशेस विष्णू , आग्नेय
दिशेस सूर्य ,नैऋत्य दिशेस गणपती, वायव्येस पार्वती या प्रमाणे शिव पंचायतन मांडावे
*
देवी पंचायतन
।। भवानी तू यदा मध्ये ऐशान्यां माधवं यजेत्।
आग्नेयाम् पार्वतीनाथं नैऋत्यां गणनायकम्।
प्रद्योतनंतु वायव्यां आचार्यस्तु प्रपूजयेत् ।
अर्थ:- मध्ये देवी, ईशान्येस विष्णू, आग्नेयेस शंकर ,नैऋत्येस गणपती ,वायव्येस सूर्य या प्रमाणे देवी पंचायतन मांडावे .
सूर्य पंचायतन
।। सहस्रांशुर्यदामध्ये ऐशांन्यां पार्वतीपतिं। आग्नेयामेकदंतं च
नैऋत्यामच्युतं तथा।वायव्या पूजयेद्देवीं भोगमोक्षैकभूमिकां।।
अर्थ:- मध्ये सूर्य , ईशान्येस शंकर ,आग्न्येयेस गणपती , नैऋत्येस विष्णू ,वायव्येस देवी या प्रमाणे सूर्य पंचायतन मांडावे.
गणेश पंचायतन
।। हेरंबंतुयदामध्ये ऐशान्यामच्युतं यजेत्
।आग्नेयांपंचवक्त्रंतुनैऋत्यांद्दुमणिंयजेत् ।
वायव्यामंबिकांचैवयजेन्नित्यमतंद्रित:।।
अर्थ:- मध्ये गणपती , ईशान्येस विष्णू,आग्न्येयेस महादेव ,नैऋत्येस सूर्य , वायव्येस जगदंबा या प्रमाणे गणेश पंचायतन मांडावे . (वरील जो मध्ये
स्थापित देव असेल त्याच्या मुखास पूर्व दिशा जाणावी व त्याच्या अनुरोधाने ईशान्य
आदी दिशा घ्याव्यात.
इति
धर्मशास्त्र निर्णय: