अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।श्री गुरूदेव दत्त ।
मचित्ता चिंती साची |तु वाडी नरसोबाची ||
वेणी सह कृष्णा जेथे | दक्षिणगा अष्ट सुतींर्थे |
तारक ती असती जेथे |पंचनदी संगम तेथे |
कल्पद्रुम आहे जेथे |प्रासाद प्राड्मुख तेथे |
त्यामध्ये सोज्वळ ज्योती |यत्तेजे भासती ज्योती |
ज्योतिर्मय तो हो ज्याची |दृक पाहे पद हे साची |
पुरुषार्थ राहती चार |स्तंभ रूपे तेथ समोर |
उत्तरेस विघ्नेश्वर |दक्षिणेस आसन रुचिर |
प्राड्मुख ते वामनद्वार |लखलखीत धातुविकार |
त्यामध्ये हरिपद आहे |त्याला जो प्रेमे पाहे |
भवसारा नच तो वाहे |मोहे नच जगी मती त्याची |
जे प्रात:काळी पाहती | पादुका अभिषेकीती |
जे महापूजा करिती | अभिषेक स्नपना करिती |
गुरुचरित्र ऐकती पठति |आश्रिता भोजन देती |
जे वस्त्रालंकृती देती | पालखी मिरविती गाती |
सर्वही ते संसृति तरती | भुक्ती मुक्ती दासी त्यांची |
पुजारी चारी फडांचे | सहकुटुंब पाळी वाचे |
पाळूनिया बिरूद तयाचे |वाहे योगक्षेम तयांचे |
करुणाकर दरदर त्याचे |गुण गाई मधुर सुवाचे |
जो औदुंबर तळवासी |अन्नपूर्णा योगिनी ज्यासी |
सेविती जानव्ही तैसी |आचरिता सेवा ज्यासी |
सेविती जान्हवी तैसी |आचरिता सेवा ज्याची |
गती होते ब्रह्मी त्याची |
।। श्री गुरूदेव दत्त ।।