Blog Views

श्रीगुरूद-तात्रेय

*॥ श्रीगुरूद-तात्रेय श्रीपादश्रीवल्लभ श्रीमन् नरसिंहसरस्वती स्वामी महाराज ॥* ?

लौकिकमतें आम्ही जातों । ऐसें दृष्टा।न्तीं दिसतों । भक्तजनां घरीं वसतों । निर्धार धरा मानसीं ॥

ऐसें भक्तां संबोखोनि । उठले श्रीगुरु तेथोनि । पुष्पासनीं बैसोनि । निरोप देती भक्तांसी ॥

कन्यागतीं बृहस्पति । बहुधान्य संवत्सरी ख्याति । सूर्य चाले उत्तर दिगंतीं । संक्रांति कुंभ परियेसा ॥

शिशिर ऋतु माघमासीं । असितपक्ष प्रतिपदेसी । शुक्रवारीं पुण्यदिवसीं । श्रीगुरु बैसले निजानंदीं ॥

श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । जातों आम्ही निज मठासी । पावतां खूण तुम्हांसी । प्रसादपुष्पें पाठवितों ॥

येतील पुष्पें जाती शेवंती । घ्यावा प्रसाद तुम्हीं भक्तीं । पूजा करावी अखंड रीतीं । लक्ष्मी वसों तुम्हां घरीं ॥

आणिक सांगेन एक खूण । गायनीं करी जो माझे स्मरण । त्याचे घरीं असे जाण । गायनप्रीति आम्हांसी ॥

नित्य जें जन गायन करिती । त्यांवरी माझी अतिप्रीति । तयांचे घरी अखंडिती । आपण असों अवधारा ॥

व्याधि न होय त्यांचे घरीं । दरिद्र जाय त्वरित दुरी । पुत्रपौत्र श्रियाकरीं । शतायुषी नांदतील ॥

ऐकतील चरित्र माझें जरी । वाचतील नर निरंतरी । लक्ष्मी राहे त्यांचे घरीं । संदेह न धरावा मनांत ॥

ऐसें सांगोनि भक्तांसी । श्रीगुरु जहाले अदृशी । चिंता करिती बहुवशी । अवलोकिती गंगेंत ॥

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs