Blog Views

गजानन स्तुती


श्री गजानना श्री गजानना,
पार्वती सुकुमार रे|
तुला मोदक आवडे फार रे  ||धृ||
सुदंर दिसतो सिंहासनी बसतो,
मोदक भक्षितो फार रे ||१||
दुर्वा हरळी बहु प्रेमाची,
शिंदुर चर्चितो लाल रे ||२||
मी बालक रे तु पालक रे ,
करि विघ्नाचा संहार रे ||३||
अग्र पुजेचा तु अधिकारी ,
भक्ताना सांभाळ रे ||४||
एका जनार्दनी म्हणे रमापती ,
सेवक गुंफीतो हार रे ||५||
भाद्रपदाची गणेश चतुर्थी ,
दरवर्षी येणार रे ||६||
तुला मोदक आवडे फार रे

   

श्री गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा पूजाविधी अभिषेक सह

🟠🚩पुजा साहित्य यादी : हळद, कुंकु, गुलाल, शेंदूर, गूळ-खोबरे, समई, नीरंजन, अष्टगंध, अक्षदा, रांगोळी, फुलवात वात, तेलवात, काडे पेटी, पळी भांड...

Popular Blogs