*🌹संज्ञान सूक्त🌹*
ऋग्वेद दशम मण्डल च्या 191व्या सूक्तास संज्ञान सूक्त असे म्हणतात. ऋग्वेदातील हे अंतिम सुक्त असून उदात्त विचार व सांमंजस्याचा संदेश यात दिला आहे.
*ऋग्वेद - मंडल १० सूक्त १९१ (संज्ञानसूक्त)*
ऋषी - संवनन आंगिरस : देवता - १ अग्नि; अवशिष्ट स्ज्ञान : छंद - ३ - त्रिष्टुभ् ; अवशिष्ट - अनुष्टुभ्
*सं-सं॒ इद्यु॑वसे वृष॒न्न् अग्ने॒ विश्वा॑न्य॒र्य आ ।*
*इ॒ळस्प॒दे सं इ॑ध्यसे॒ स नो॒ वसू॒न्या भ॑र ॥ १॥*
*सम्-सं इत् युवसे वृषन् अग्ने विश्वानि अर्यः आ*
*इळः पदे सं इध्यसे सः नः वसूनि आ भर ॥ १ ॥*
हे वीरपुंगवा अग्निदेवा, तूं जो आमचा पूज्य प्रभु, तो तूं यच्चयावत् वस्तूंना एके ठिकाणी जुळवून एकत्र करतोस आणि इळेच्या स्थानी प्रज्वलित होतोस; तर ज्या ज्या वस्तु सर्वोत्कृष्ट असतील, त्या आम्हांस देण्यासाठी घेऊन ये १.
*सं ग॑च्छध्वं॒ सं व॑दध्वं॒ सं वो॒ मनां॑सि जानताम् ।*
*दे॒वा भा॒गं यथा॒ पूर्वे॑ संजाना॒ना उ॒पास॑ते ॥ २ ॥*
*सं गच्चध्वं सं वदध्वं सं वः मनांसि जानतां*
*देवाः भागं यथा पूर्वे सम्-जानानाः उप-आसते ॥ २ ॥*
ही गोष्ट अग्नीने करावी म्हणून मित्रांनो तुम्ही देखील एकत्र होऊनच कार्य करा; आणि परस्पर विचारविनिमय करण्यासाठी संवाद करीत जा; आणि पूर्वकाळी देव ज्याप्रमाणे यज्ञमंदिरांत एकत्र येऊनच हविर्भागाचा स्वीकार करीत असत, त्याप्रमाणे तुम्हीहि एकत्र बसून एकमेकांचे विचार समजावून घ्या २.
*स॒मा॒नो मन्त्रः॒ समि॑तिः समा॒नी स॑मा॒नं मनः॑ स॒ह चि॒त्तं ए॑षाम् ।*
*स॒मा॒नं मन्त्रं॑ अ॒भि म॑न्त्रये वः समा॒नेन॑ वो ह॒विषा॑ जुहोमि ॥ ३ ॥*
*समानः मन्त्रः सम्-इतिः समानी समानं मनः सह चित्तं एषां*
*समानं मन्त्रं अभि मन्त्रये वः समानेन वो ह॒विषा जुहोमि ॥ ३ ॥*
हे जे तुम्ही आर्यजन त्यांचा सर्वांचा मन्त्र, म्हणजे मनांतील उद्देश एकसारखाच असू द्या; तुमचे समिति म्हणजे सभा ही सर्वांची एकाच जागी करीत जा. त्या योगाने तुमचे मन आणि तुमचे चित्त (म्हणजे विचाराने ठरविलेली गोष्ट) हेही एकसारखेच राहतील; म्हणून तुम्हां सर्वांसाठी मी आता एकच मन्त्र, गुरुकिल्ली सांगतो, आणि सर्वांचा मिळून एकच हविर्भाग अग्नीला अर्पण करितो ३.
*स॒मा॒नी व॒ आकू॑तिः समा॒ना हृद॑यानि वः ।*
*स॒मा॒नं अ॑स्तु वो॒ मनो॒ यथा॑ वः॒ सुस॒हास॑ति ॥ ४ ॥*
*समानी वः आकूतिः समाना हृदयानि वः*
*समानं अस्तु वः मनः यथा वः सु-सह असति ॥ ४ ॥*
ती तत्वाची गोष्ट ही की तुमचा विचार आणि योजना एकच असूं द्या; तुमची अन्त:करणे एकसारखी-एकाच भावनेने परिपूर्ण असू द्या. तसेंच तुमचे मनहि सारखे-एकाच धेयायाकडे लागलेले असू द्या, म्हणजे तुम्हांला पाहिजे असेल ती गोष्ट सहज साध्य होईल ४.
*इति दशमं मण्डलं समाप्तम् ॥*
*॥ समाप्तोयं ऋग्वेदसंहिता ॥*
*ॐ तत् सत्*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*संकलन: अनंत देशमुख*