Blog Views

कमला-मंत्र


*कमला-मंत्र*

*" श्री "*
ह्या एकाक्षरी मंत्राने कमला ( लक्ष्मी ) ची उपासना करावी. या मंत्राचा बारा लक्ष जप झाला म्हणजे एक पुरश्चरण होते. नंतर घृत, मधु व शर्करायुक्त बारा हजार पद्म अथवा तिलद्वारा होम करावा.

*कमला - ध्यान*

*कान्त्या कांचनसन्निभां हिमगिरिप्रख्यैश्चतुर्भिर्गजैः।*
*हस्तोत्क्षिप्तहिरण्मयामृतघटौरासिच्यमानां श्रियम।*
*बिभ्राणां वरमब्जयुग्ममभयं हस्तैः किरीटोज्वलाम।*
*क्षौमाबद्धनितम्बबिंबललितां वंदेऽरविंदस्थिताम ॥१॥*

भावार्थः -
सुवर्णाप्रमाणे जिची कांति आहे ; हिमालयादि चार दिग्गज आपल्या सोंडेने सुवर्णमय अमृताने भरलेल्या घटांनी जिला सिंचन करतात ; एका हातांत वर व एका हातांत अभय आणि दुसर्या दोन हातांत दोन कमले जिने धारण केलेली आहेत , मस्तकी किरीट व रेशमी वस्त्र परिधान करुन कमलासनावर स्थित असलेली जी कमला तिला माझा नमस्कार असो .

*कमलास्तोत्र*

*इन्द्र उवाचः -*
*नमस्तेऽस्तु महामाये श्रीपाठे सुरपूजिते।*
*शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥*
*आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि।*
*योगजे योगसंभूते महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥१॥*
*स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्ति महोदरे।*
*महापापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥२॥*
*नमस्ते गरुडारुढे कोलासुरभयंकरि।*
*सर्वपापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥३॥*
*सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरि।*
*सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥४॥*
*सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनी।*
*मन्त्रमूर्ति सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥५॥*
*पद्मासनस्थिते देवि परब्रह्मरुपिणि।*
*परमेशि जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥६॥*
*श्वेतांबरधरे देवि नानालंकारभूषिते।*
*जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तुते ॥७॥*
*महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं यः पठेत भक्तिमान्नरः।*
*सर्व सिद्धिभवाप्नोति राज्यं प्राग्नोति सर्वदा ॥८॥*
*एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम।*
*द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः ॥९॥*
*त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम।*
*महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥१०॥*

तात्पर्यार्थः -
ह्या स्तवाचे नित्य एकवार पठण केले असतां महापाप नाश पावते .  नित्य दोनदां पठन केल्यास धनधान्य विपुल असते ; नित्य तीन वेळां पठन केल्याने बलाढ्य शत्रूचा देखील पराभव होऊन श्री महालक्ष्मीही नित्य प्रसन्न होते ; तशीच ती मंगलकारक होऊन वरप्रदान देते .

*कमला - कवच*

*र्हीँ बीजं मे सदा पातु कमला कमलालया।*
*हृदयं सततं पातु श्रींरुपा विष्णुरोहिनी।*
*मुखबिंब सदा पातु कर्णौ गंडौ च नासिकाम ॥*
*सर्वांग पातु मे देवी श्री लक्ष्मी प्रणवात्मिका।*
*दिग्विदिक्षु सदा पातु वाग्भवी सर्वसिद्धिदा ॥*
*कवचं धारयेद्यस्तु स भवेत्कमलासुतः।*
*इहलोके सुखं भुक्त्वा चांते निर्वाणमाप्नुयात ॥*

तात्पर्यार्थः -
जो मनुष्य हे कवच धारण करतो , तो श्रीलक्ष्मीस पुत्राप्रमाणे अत्यंत प्रिय होतो ; आणि इहलोकी सुख भोगून अंती मोक्षपदाप्रत प्राप्त होतो .

*श्रीलक्ष्मीचा अन्य मंत्र*

*ॐ र्हीँ श्रीं लक्ष्मीमहालक्ष्मी सर्वकामप्रदे सर्वसौभाग्यदायिनी अभीष्टार्थ प्रयच्छ सर्वे सर्वगते सुरुपे सर्वदुर्जयविमोचनि र्हीं सः स्वाहा .*

विधि -
जो मनुष्य शुद्धचित्त होऊन एकाग्रतेने ह्या मंत्राचे जपद्वारां अनुष्ठान करितो , त्यास यथाभिलषति लक्ष्मीची प्राप्ति होते .

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs