Blog Views

पुजा करताना लक्ष्यात ठेवा ह्या गोष्टी

-------------------------------------------------
*पुजा करताना लक्ष्यात ठेवा ह्या गोष्टी*
-------------------------------------------------

रोज सकाळी उठून देवाची आराधना केली जाते. जास्तकरून लोकांना पूजेशी निगडित गोष्टी आणि विधीची योग्य माहिती नसते. तसे धार्मिक मान्यतेनुसेार असे म्हटले जाते की देव फक्त भक्तीचा भुकेला असतो.
पण आपल्याला पूजेशी निगडित गोष्टींबद्दल माहिती असणे फारच गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहोत याबद्दल काही माहिती :     

* पूजेसाठी जर तुम्ही पाण्याचा वापर करत असाल तर ते पाणी स्वच्छ आणि ताजे असावे. 


* देवी-देवतांना तिलक करण्याअगोदर नेहमी लक्षात ठेवावे की त्यांना अनामिका बोटानेच तिलक करावे. बाकी कुठल्याही बोटाने तिलक करु नये.


* पूजेत जर शंख ठेवत असाल तर या गोष्टीचे ध्यान ठेवायला पाहिजे की शंखाला पाण्यात बुडवून नव्हे तर शंखात पाणी भरून ठेवावे आणि पूजेनंतर या पाण्याला घरात छिंपडावे. असे केल्याने वास्तू दोष दूर होण्यास मदत मिळेल.  

* पूजा करताना दिव्याचे तोंड नेहमी पूर्व दिशेत असायला पाहिजे. दक्षिण दिशेकडे दिव्याचे तोंड असल्यास धनहानी होते. 

* पूजेत जर नैवेद्य ठेवत असाल तर या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे की पाण्याचा चोकोर घेरा बनवून त्यावर नैवेद्य देवाच्या उजवीकडे ठेवायला पाहिजे.
------------------------------------------------------
*देवघरा संबधीत  काही खास गोष्टी*
------------------------------------------------

हिंदू घरांमध्ये देवघर अवश्य असते.जर हे देवघर वास्तुशास्त्राच्या नियमात असेल तर,याचा शुभ प्रभाव आपल्या कुटुंबावर पडतो.घरातील देवघराची मांडणी ही दोषपूर्ण असल्यास त्या घरातील व्यक्तींना अनेक प्रकारच्या आर्थिक,मानसिक अशांतीचा सामना करावा लागतो.येथे देवघराशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.
या छोट्या-छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास पूजेचे श्रेष्ठ फळ प्राप्त होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये धन-धान्याची कमतरता भासत नाही.

*1.पूजा करतना कोणत्या दिशेला असावे आपले मुख*

घरामध्ये पूजा करणार्‍या व्यक्तीचे तोंड पश्चिम दिशेकडे असेल तर अत्यंत शुभ राहते.यासाठी देवघराचे द्वार पूर्व दिशेला असणे आवश्यक आहे.हे शक्य नसेल तर पूजा करताना व्यक्तीचे मुख पूर्व दिशेला असल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात.

*२)देवघराच्या जवळपास बाथरूम किंवा शौचालय नसावे -*

घरातील मंदिराच्या जवळपास बाथरूम असणे अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा ठिकाणांपासून देवघर दूर ठेवावे. जर एखाद्या छोट्या खोलीत देवघर असेल तर तेथे थोडीशी एका व्यक्तीला बसत येईल एवढी तरी जागा मोकळी सोडावी.

*३) देवघरापर्यंत पोहोचावा सूर्यप्रकाश*

घरामध्ये देवघर अशाठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते.

*४)देवघरात घेऊन जाऊ नयेत या वस्तू*

घरामध्ये ज्या ठिकणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल-बूट घेऊन जाऊ नये. देवघरात मृतक आणि पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. देवघराच्या खोलीत पुजेशी संबंधित सामानच ठेवावे.

*५)पूजा झाल्यानंतर संपूर्ण घरात थोडावेळ घंटी अवश्य वाजवावी*

घरामध्ये देवघर असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे. पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी. तसेच संपूर्ण घरात फिरून घंटानाद करावा. असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते.
-------------------------------------------------
*पूजन सामग्रीशी संबंधित खास गोष्टी*
------------------------------------------------

१)पूजेमध्ये शिळे, सुकलेले फुल-पान अर्पण करू नये.
२)स्वच्छ आणि ताज्या पाण्याचा उपयोग करावा. या संदर्भात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी की तुळशीचे पान आणि गंगेचे पाणी कधीही शिळे मानले जात नाही. त्यामुळे यांचा उपयोग केव्हाही केला जाऊ शकतो.
३)इतर सामग्री ताजीच असावी. एखाद्या फुलाचा वास घेतला असेल किंवा ते खराब झाले असेल तर देवाला अर्पण करू नये.
------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोनी*
-------------------------------------------------

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs