Blog Views

*पारायण केल्याने काय होत ?

*पारायण केल्याने काय होत ?

*सर्वांनी पारायण हा शब्द ऐकला असेल व अनेकदा कानावरही पडला असेल..*
* खास करून दत्तजयंती , स्वामी समर्थ प्रकट दिन , गजानन महाराज प्रकट दिन या वेळी पारायण हमखास केले जातेचं.......*
*काय असते बरं पारायण ?*
*ते का करावे ?*
*काय मिळत ?*
*आणि विशिष्ट संत चरीत्रांचेच का करावे?*

*परायण रहाणे म्हणजे पारायण करणे होय....*

*पारायण सात दिवसांचे केले जाते . यावेळी या सात दिवसांत , एकवेळ ठेवून वाचन करणे म्हणजे आज सकाळी सातला पारायणास बसलो तर उद्याही त्याच वेळी सुरूवात करणे होय...* *नंतर येते एकभुक्त रहाणे व एकधान्य खाणे , म्हणजे आज सायंकाळी उपवास सोडताना जर मुगाच्या डाळीचे वरण व पोळी असेल तर सातही दिवस तेच खावे........*
*या नंतर पायात चप्पल न घालणे , सातही दिवस काया , वाचा , मने ब्रह्मचर्याचे पालन , साध्या चटईवर वा कांबळ्यावर , सतरंजीवर झोपणे.....*
*खोटे न बोलणे . संपूर्ण लक्ष फक्त ईश्वरावर केंद्रीत करणे . दुसऱ्यांच्या अंथरूणावर , पलंगावर न बसणे....*
*ह्या नियमांचे पालन करणे , यात परायण म्हणजे दक्ष रहाणे म्हणजेचं पारायण होय.....*

*काय मिळत ?*
*तर याचं उत्तर पारायण काही मागण्यासाठी नाही तर केवळ आपणांस काय हवे होते ते आईकडे सांगणे म्हणजे त्या ईश्वरास प्रार्थना करणे होय.…..*
*बाळाने कितीही हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईलाच समजते तसे भक्तासाठी काय योग्य ते तो ईश्वरच ठरवतो....* *आपण केवळ ते संकल्प रूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे.……*
*पण तेही नियमात राहून , कासवा प्रमाणे सर्व अहंकार , गर्व , या सर्वांचा त्याग करून चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजे पारायण.....*
*मग जेव्हा लहान मुल पोळी लाटत पण आई कौतूकाने तो नकाशाही सुंदर म्हणते व त्या मुलास शाबासकी देते तसा ईश्वरही आपली दखल घेतोच......*
*म्हणून करावे पारायण.....!!!!!

*☘☘☘🌹श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती....*

★अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.
★अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.
★अध्याय३:- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.
★अध्याय ४:- स्त्री छळणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.
★अध्याय ५:- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.
★अध्याय ६:- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.
★अध्याय ७:- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.
★अध्याय ८:- बुध्दिमांद्य नाहिसे होतात. विवाह कार्य सुलभ होते.
★अध्याय ९:- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.
★अध्याय १०:- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.
★अध्याय ११:- वाचादोष तसेच,वेड नाहीसे होते.
★अध्याय १२:- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.
★अध्याय १३:- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
★अध्याय १४:- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.
★अध्याय १५:- तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.
★अध्याय १६:- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.
★अध्याय १७:- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.
★अध्याय १८:- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
★अध्याय १९:- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.
★अध्याय २०:- गुरूस्मरण करुनी मनी , पूजा करी वो गुरुचरणी , तुझे पाप होईल धुनी , ब्रह्मासमंध परिहरेल!!
★अध्याय २१:- मृत्यूभयापासून मुक्तता .
★अध्याय २२:- वांझपण दूर होते . बाळणतिनिला चांगले दूध येते.
★अध्याय २३:- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.
★अध्याय २४:- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.
★अध्याय २५:- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.
★अध्याय २६:- शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.
★अध्याय २७ :- गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्दानाचा छळ दोषांची निवृत्ती.
★अध्याय २८:- वाईट कर्माचे दोष दूत होतात , सप्तथ सापडतो.
★अध्याय २९:- स्त्रीछलदोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.
★अध्याय ३०:- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.
★अध्याय ३१:- पतीवर येणारे विघ्ने टळतात.
★अध्याय ३२:- वैधव्याचे दुःख टळते. अथवा सुसह्य होते.
★अध्याय ३३:- वचनभँग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.
★अध्याय ३४ :- प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
★अध्याय ३५ :- हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.
★अध्याय ३६:- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.
★अध्याय ३७:- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.
★अध्याय ३८:- निदा करणारे शरण येतात , अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
★अध्याय ३९:- सद्गुगुरु ची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .
★अध्याय ४०:-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
★अध्याय ४१:- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
★अध्याय ४२:- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.
★अध्याय ४३:- गर्व व क्रोध नाहीसा होऊन एशवर्या ची प्राप्ती होते.
★अध्याय ४४:- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.
★अध्याय ४५:- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.
★अध्याय ४६:- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.
★अध्याय ४७:- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.
★अध्याय ४८:- गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.
★अध्याय ४९:- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो . सर्व पापांचे समान होते.
★अध्याय ५०:- ग्रँथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.
★अध्याय ५१:- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.
★अध्याय ५२ :- श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रँथ वाचनाचे फळ मिळते,

*श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त,,,,,
-------------------------------
*पारायण म्हणजे काय?*
-------------------------------

आपले गुरु, संत किंवा देव ह्यांच्या अधिकृत चरित्राचे, स्वेच्छेने, शुद्ध अंतःकरणाने, शांत चित्ताने, शुचिर्भूत राहून शक्यतो एका आसनांवर बसून,
पूर्णपणे रममाण होऊन केलेले वाचन-पठन करणे, संताची खरी ओळख करून घेणे, त्यांचे चरित्र, त्यांची शिकवण समजून घेणे आणि त्यांनी सांगितलेल्या / दाखवलेल्या नीतीच्या मार्गावर चालण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे म्हणजेच पारायण.
--------------------------------------
*पारायणाचे विविध प्रकार*
---------------------------------------

*१) एकआसनी पारायण-*
एका दिवसात एकाच बैठकीत (न उठता) संपूर्ण २१ अध्यायाचे पारायण करणे. ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे. वाचणाऱ्याच्या वाचन गतीनुसार पारायणासाठी ४ ते ५ तास लागतात. गुरुपुष्यामृत योगावर केलेल्या एक आसनी पारायणाचे विशेष महत्व संतकवी दासगणूनी सांगितले आहे.

*२) एकदिवसीय पारायण-*
एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार २१ अध्यायाचे पारायण करणे. आजच्या धकाधकीच्या काळात बर्याच जणांना आरोग्याच्या समस्या असतात व त्यामुळे एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही. म्हणून एक दोन ब्रेक घेऊन बरीच भक्तमंडळी पारायण करतात ते एकदिवसीय पारायण.  वेळेचे बंधन व व्यस्त जीवनप्रणाली ह्या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धतीचा वापर आपण करतो.
*३) सप्ताह पारायण-*
सात दिवस दररोज ३ अध्याय वाचून हे पारायण केल्या जाते. महाराजांचा प्रकटदिन सप्ताह व संजीवन समाधीदिन सप्ताह च्या निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरांमध्ये व घरी देखील सप्ताहाचे आयोजन करून असे पारायण आपण करू शकतो.
*४) तिन दिवसिय पारायण-*
तिन दिवस दररोज ७ अध्याय ( किंवा ९, ७ व ५ अध्याय) वाचून हे पारायण केल्या जाते. दशमी, एकादशी व द्वादशी च्या निमित्ताने केलेल्या तिन दिवसीय पारायणाचे विशेष महत्व संतकवी दासगणूनी सांगितले आहे.
मंदिरांमध्ये अथवा घरी देखील असे पारायण आपण करू शकतो.
*५) गुरुवारचे पारायण-*
गुरुवार हा महाराजांचा शुभदिन व २१ हा महाराजांचा शुभ अंक. २१ भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचावयाचा व सगळे मिळून २१ अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे. यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व २१ गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते असा द्विगुणीत लाभ मिळतो.
एका ग्रुप मध्ये एकविस भक्तच भाग घेऊ शकतात हे ग्रुप पारायण असल्यामुळे पारायणाचे ठरवून दिलेले नियम पाळणे अतिशय महत्वाचे आहे.
जे भक्त किंवा ग्रुप नियमांचे पालन करीत नाही ते पारायण पूर्ण होत नाही.
*६) चक्री पारायण किंवा २१ दिवसीय पारायण-*
खूप जास्त भक्तांनी मिळून आणि ठरवून दररोज एक अध्याय (पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला, दुसर्या दिवशी सर्वांनी दुसरा, एकविसाव्या दिवशी सर्वांनी २१ वा अध्याय वाचणे) वाचन करून २१ दिवसात हे पारायण करावे. साधारण प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त एकत्र येऊन हि सेवा उपासना करतात. ह्यामधे भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते. येथे देखील प्रत्येकाने दररोज अध्याय वाचणे व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
*७) संकीर्तन पारायण-*
एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे असे ह्या संकीर्तनाचे स्वरूप असावे. हि एक श्रवण भक्ति आहे.
गजानन महाराजांचे बरेच भक्त असे आहेत की त्यांनी संपूर्ण श्री गजानन विजय ग्रंथ कंठस्थ केला आहे. हि सोपी गोष्ट नाही. व्यासपीठावर बसून जेंव्हा ते मुखोद्गत पारायण करतात त्यावेळी बरेचदा ते काही प्रसंगांचे निरुपण करतात, काही अनुभव सांगतात. हे पारायण ऐकणे म्हणजे एक आगळीवेगळी पर्वणीच असते. असे पारायण म्हणजे संकीर्तन पारायण.
*८) सामुहिक पारायण-*
एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे. येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ (२१ अध्याय ) वाचन करणे अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या वाचन गतीनुसार वेगवेगळ्या वेळी पारायणाची सांगता होईल. हरकत नाही.

*खाली दिलेल्या गोष्टीसारखा हेतू मनात ठेऊन केलेले संतचरित्राचे वाचन पारायण होत नाही*

• केवळ दुसरा करतो म्हणून केलेले वाचन
• दुसऱ्याची वाहवा मिळवण्यासाठी केलेले वाचन
• दुसर्या पेक्षा लवकर वाचतो हे दाखवण्यासाठी स्पर्धात्मक वाचन. भक्तिमार्गात स्पर्धेला जागा नाही
• केवळ प्रसिद्धीसाठी केलेले वाचन
• मानधन व पैसा घेऊन केलेले वाचन
• बोध किंवा शिकवण न घेता केलेले वाचन

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs