|| लक्ष्मी तंत्र ||
घरात लक्ष्मी टिकत नसेल,सतत वादविवाद होत
असतील तर, पैसा येतो पण पाण्या सारखा खर्च होत असेल,घरातील मानसिक शांतता भंग पावली असेल तर प्रभावी उपाय .
आंघोळीनंतर १ चिमूट साखर घराबाहेर टाकावी.याच्यामुळे अन्नदान घडून येते. मुंगी आणि तत्सम जीवात्मे संतुष्ट
होतात. तुमच्यावरील कर्ज फिटण्यास मदत होते. तुमच्या बद्दल लोकांची मने अनुकूल
व्हायला मदत होते. तसेच मंगळवारी मसूरदाळ ,बुधवारी उडीद ,गुरुवारी भाजलेले चणे ,शुक्रवारी मूग असे टाकल्यास
पैशाची चणचण भासणार नाही.साखर टाकल्यांनंतर पेल्यात पाणी घेऊन त्या पाण्यावरती " ॐ चिमी
चिमी स्वाहा " हा मंत्र ७ वेळा म्हणावा आणि नंतर ते
पाणी पिऊन टाकावे.हे मंत्रोक्त पाणी प्यायल्यामुळे माणसे अनुकूल व्हायला लागतात.
विरोधक विरोध सोडून तुम्हाला अनुकूल व्हायला लागतात. गुप्त शत्रूंचा त्रास कमी
व्हायला लागतो. त्यांच्या कारवाया उघडकीस यायला लागतात.पैशाची अतिशय निकड असेल तेव्हा मानवी प्रयत्नांबरोबर खालील मंत्र २१
वेळा म्हणावा. कुठूनतरी पैशाची व्यवस्था होते.ॐ नमो शाबरीदेव्यै अस्माकं दारिद्रयं छिंदय छिंदय शीघ्र धनागमम कुरु कुरु स्वाहा.मंगळवारी कर्ज काढू नये. शुक्रवारी कर्ज द्यावे.