Blog Views

।। श्री गणपती स्तोत्र ॥ मराठी

।। श्री गणपती स्तोत्र ॥

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका
भक्तीने स्मरतां नित्य आयुःकामार्थ साधती ।.१ ।।

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते ।
तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ।।२।।

पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव तें ।
सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ।।३।।

नवयें श्री भालचंद्र दहावें श्रीविनायक ।।
अकरायें गणपति बारावें श्रीगजानन ।।४।।

देवनार्वे अशी बारा तीन संध्या म्हणे नर
विघ्नभीति तसे त्याला प्रभो । तू; सर्वसिद्धि दे ।।५।।

विद्यार्थ्याला मिळे विद्या धनाथ्र्याला मिळे धन
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गि ।।६।।

जपतागणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ ।
एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ।।७।।

नारदांनी रचिलेले झाले संपुर्ण स्तोत्र हैं।
श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले ।।८।।

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs