Blog Views

|| श्री गुरु पादुकोदय स्तोत्रम् ||

|| श्री गुरु पादुकोदय स्तोत्रम् ||

आज मुहुर्तवूया एक नित्योत्सव |
अद्वैत आमोदे जेणे फुलेल हे विश्व ||
क्षणो क्षण प्रभातेल नवोनव महापूर्व |
प्रसाद चिन्ह श्री श्री श्रीविद्येचे ||
परा - परापरा - अपरा |
श्री गुरुपूजा ही त्रिशिरा ||
विमर्शा माउलीची ही स्तनदुग्धधारा |
ओष्ट विण्याचा समय हा ||
अपरा आराधनेत भेद - ग्रह स्थिती |
परापरा अवस्थेत भेद - अग्रह वृत्ती ||
परा अवस्थानांत अभेद स्फूर्ती |
श्री गुरु पुजेची पादुका ही ||
आदिभान हे परात्पर गुरुबीज |
विमर्श शक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज ||
जीवू जीवूचा पहिला परीवाज |
गुरूपादुकेचे आलोचन ||
एक उफराटे अ -कुल ब्रह्मपद्म |
तेथ निष्कलेचे निजशक्ती धाम ||
निर्झरले व्यापिनिंचे श्याम व्योम |
अमृत मेघ वोसंडला ||
चतुष्कोणी देवात्म्यांचे उगमस्थान |
बिंदुस्थली अमृतसिद्धीचे अनुभावन ||
यथाक्रम आंतर अनुभवांचे अनुस्थापन |
श्री गुरु विद्येचा सहजाचार हा ||
विमर्श म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती |
पादुकोदय म्हणजे शिव शिवेची साग्यरस स्थिती ||
गुरुकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती |
"गुरुकृपा " ये नामें जीव जीवूचे निरवस्थान ||
'चार' म्हणजे सोपचार आराधन |
'राव ' म्हणजे विमर्श शक्तीचे उपयोजन ||
'चरू ' म्हणजे द्रव्य गुणांचे संयोगीकरण |
'मुद्रा ' या नावे प्रतीकाचा प्रत्यंक भाव ||
चित गगन चंद्रिकेची फेसाळली जान्हवी |
श्री गुरु कृपेची वेल्हाळली की पान्हवी ||
प्रकटली वा निलावजाची श्री सुषमा अभिनवी |
श्री गुरुपादुकोदय स्तोत्र हे ||
श्री नव शुक्तीकांचा सम्यक समुल्लेख |
येथ देशोपनिषद रहस्यांचे महावार्तिक ||
आदिकृपेचा जणू सतताभिषेक |
श्री गुरु पादुकोदय स्तोत्रम ||

|| इति श्री गुरु पादुकोदय स्तोत्रम समाप्त ||

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs