श्री बालकोट स्वामी समर्थ
मानसपूजा
नमो स्वामीराज दत्तावतार । श्री विष्णु ब्रह्मा शिव शक्ति
रुपम्। ब्रह्मस्वरुपाय करुणाकराय। स्वामी समर्थाय नमो नमस्ते।।
हे स्वामि दत्तात्रया हे कृपाळा। मला ध्यानमूर्ती दिसू देइ डोळा॥
कुठे माय माझी म्हणे बाळ जैसा। समर्था तुम्हावीण हो जीव तैसा ॥१॥
स्वामी समर्था तुम्ही स्मृतीगामी। हृदयासनी या बसा प्रार्थितो मी॥
पुजेचे यथासांग साहित्य केले। मखरांत स्वामी गुरु बैसविले ॥२॥
महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती। जिथे सर्व सिद्धी पदी लोळताती ।।
असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ। परब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त ।।३।।
सुवर्ण ताटी महारत्न ज्योती। ओवाळुनी अक्षता लावू मोती॥
शुभारंभ ऐसा करुनी पुजेला। चरणावरी ठेवू या मस्तकाला।॥४॥
हा अध्ध्यन अभिषेक स्वीकारी माझा। तुझी पाद्यपूजा करी बाळ तुझा॥
प्रणिपात साष्टांग शरणागतीचा। तुम्हा वाहिला भार या जीवनाचा ॥५॥
ही ब्रह्मा पूजा महाविष्णु पूजा। शिव शंकराची असे शक्तिपूजा॥
दही दुध शुद्धोदकाने तयाला। पंचामृतस्नान घालू प्रभूला॥६||
श्री वीणा तुतारी किती वाजताती। शंखादि वाद्ये पहा गर्जताती॥
म्हणती नगारे गुरुदेव दत्त। श्री दत्त, जय दत्त, स्वामी समर्थ॥७॥
प्रत्यक्ष गंगा जलकुंभि आली। दत्त स्वामीसया स्नान घाली॥
महासिद्ध आले पदतीर्थ घ्याया। महिमा तयांचा कळेना जगा या ॥।८॥
मी धन्य झालो हे तीर्थ घेता। घडू दे पूजा ही यथासांग आता।
आजानुबाहू भव्य क्रांती सतेज। नसे मानवी देह हा स्वामिराज ॥९॥
प्रत्यक्ष श्रीसद्गुरु दत्तराज। तया घालुया रेशमी वस्त्र साज।।
सुगंधीत भाळी टिळा रेखियेला। शिरी हा जरी टोप शोभे तयाला ।। १०॥
वक्ष:स्थळी लाविल्या चंदनाचा। सुवास तो वाढवी भाव साचा ।।
श्री राहु या बिल्व तुलसीदलाते। गुलाब जाईजुई अत्तराते॥११॥
गंधाक्षता वाहुनिया पदाला। ही अर्पुया जीवन पुष्पमाला॥
चरणी करांनी मिठी मारू देई। म्हणे लेकरासी सांभाळ आई।१२।।
इथे लावुया केशर कस्तुरी। सुगंधात हा धूप नाना प्रतीचा॥
जली ही तुम्हा अर्पियेली। गगनातुनि पुष्पवृष्टी जाहली॥१३॥
करुणावतारी अवधूत कीर्ती। दयेची कृपेचीच जी शुद्ध मूर्ती ।।
भा फाकली शक्तिच्या मंडलांची। अशी दिव्यता स्वामी योगेश्वराची ॥१४॥
हृदय मंदिराची ही स्नेह ज्योती। मला दाखवी स्वामिची योग मूर्ती करु आरती ।।
आर्त भावे प्रभूची। गुरुदेव श्री स्वामी दत्तात्रयाची॥१५||
पंचारती ही असे पंचप्राण। ओवाळुनी ठेऊ चरणावरून॥
निघेना पुढे शब्द बोलू मी तोही। मनीचे तुम्ही जाणता सर्व काही॥१६||
हे स्वामीराजा बसा भोजनाला। हा पंचपक्वान्न नैवेद्य केला ।।
रणाचि पोळी तुम्हा आवडीची। लाडू करंजी असे ही खव्याची ॥१७॥
डाळिंब द्राक्ष फळे आणि मेवा। हे केशरी दूध घ्या स्वामिदेवा ॥
पुढे हात केला या लेकराने। प्रसाद द्यावा अपुल्या कराने॥१८||
तांबूल घ्यावा स्वामी समर्था। चरणाची सेवा करु द्यावी आता ।।
प्रसन्नतेतूनच मागू मी काय। हृदयी ठेव माते तुझे दोन्ही पाय ॥१९॥
सर्वस्व हा जीव चरणीच ठेऊ। दुजी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ॥
नको दूर लोटू आपुल्या मुलासी। कृपाछत्र तुमचेच या बालकासी ॥२०||
धरु दे आता घट्ट तुझ्या पदाला। पदी ठेऊ दे शीर शरणागताला ।।
हृदी भाव यावे असे तळमळीचे। करी पूर्ण कल्याण जे या जिवाचे ॥२१॥
तुझे बाळ पाही तुझी वाट देवा। नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा॥
मनी पूजनाची असे दिव्य ठेव। वसो माझिया अंतरी स्वामी देव॥२२॥
समाप्त श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरणी
***