श्रीयोगेश्र्वरीकवचम्
श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः । श्री देव्युवाच ।
भगवन् सर्वमाख्यातं मंत्रतंत्रादिकं त्वया ।
योगिन्याः कवचं देव न कुत्रापि प्रकाशितम् ॥ १ ॥
श्रोतुमिच्छामि यत्नेन कृपापात्रं तवास्म्यहम् ।
कथयस्व महादेव यद्दहं प्राणवल्लभा ॥ २ ॥
ईश्र्वर उवाच ।
श्रृणु देवी महाविद्दां सर्व देवर्षिपूजिताम् ।
यस्याः कटाक्षमात्रेण त्रैलोक्यविजयी हरिः ॥ ३ ॥
सृष्टिं वितनुते ब्रह्मा संहर्ताsहं
तथैव च ।
यस्याः स्मरणमात्रेण देवाः देवत्वमाप्नुयुः ॥ ४ ॥
रहस्यं श्रृणु वक्ष्यामि योगिन्याः प्राणवल्लभे ।
त्रैलोक्यसुंदरं नामं कवचं मंत्रविग्रहम् ॥ ५ ॥
श्री योगेश्र्वरीकवचमंत्रस्य महादेव ऋषिः।
अनुष्टुप् छंदः । श्री योगेश्र्वरी देवता ।
ऐं बीजम् । र्हीं शक्तिः । श्रीं कीलकम् ।
श्रीयोगेश्र्वरीप्रसादप्रीत्यर्थे । जपे विनियोगः ।
अथ न्यासः ।
महादेव ऋषये नमः शिरसि ।
अनुष्टुप् छंदसे नमः मुखे ।
श्री योगेश्र्वरी देवतायै नमः ह्रदये ।
ऐं बीजाय नमः दक्षिणस्तने ।
र्हीं शक्तये नमः वामस्तने |
श्रीं कीलकाय नमः नाभौ ।
ऐं अंगुष्ठाभ्यां नमः ह्रदयाय नमः।
र्हीं तर्जनीभ्यां नमः शिरसे स्वाहा ।
श्रीं मध्यमाभ्यां नमः शिखायै वषट् ।
ऐं अनामिकाभ्यां नमः कवचाय हुम् ।
र्हीं कनिष्ठिकाभ्यां नमः नेत्रत्रयाय वौशट्
।
श्रीं करतलकरपृष्ठाभ्यां नमः अस्त्राय फट् ।
ध्यान
खड्गं पात्रं च मुसलं लांगलं च बिभर्ति सा ।
आख्याता रक्तचामुंडा देवी योगेश्र्वरीति च ॥ १ ॥
मानसोपचारैः संपूज्य ।
लं पृथिव्यात्मकं श्रीयोगेश्र्वरीदेवतायै नमः गंधं परिकल्पयामि ।
हं आकाशात्मकं श्रीयोगेश्र्वरीदेवतायै नमः पुष्पं परिकल्पयामि ।
यं वाय्वात्मकं श्रीयोगेश्र्वरीदेवतायै नमः धूपं परिकल्पयामि ।
रं तेजात्मकं श्रीयोगेश्र्वरीदेवतायै नमः दीपं परिकल्पयामि ।
वं अमृतात्मकं श्रीयोगेश्र्वरीदेवतायै नमः नैवेद्दं परिकल्पयामि ।
सं सर्वात्मकं श्रीयोगेश्र्वरीदेवतायै नमः तांबुलादि सर्वोपचारान्
परिकल्पयामि ।
अथ कवचम्
शिरो मे शांकरी पातु मूर्ध्नि नारायणी तथा ।
ऐं बीजं भालदेशे च र्हीं बीजं दक्षिणनेत्रे ॥
१ ॥
श्रीं बीजं वामनेत्रे च दक्षिणश्रोत्रे परास्मृता ।
वामश्रोत्रे नारसिंही नासामूलं च खड्गिनी ॥ २ ॥
नासिकां मानिनी पातु मुखं मेsवतु चाम्बिका ।
कपोलौ भूतसंहारी चिबुकं भ्रामरी तथा ॥ ३ ॥
कंण्ठं मे चण्डिका पातु ह्रदयं विंध्यवासिनी ।
उदरे गिरिजा पातु नाभिं मेsवतु भोगिनी ॥ ४ ॥
शुंभिनी पृष्ठदेशे तु स्कन्धयोः शूलधारिणी ।
हस्तयोर्योगिनी रक्षेत् कंबुकण्ठी गलं तथा ॥ ५ ॥
कट्ट्यां च सुन्दरी रक्षेत् गुह्यं गुह्येश्र्वरी तथा ।
कुंजिका पातु मे मेढ्ं पायुदेशं च शांभवी ॥ ६ ॥
भद्रकाली पातु चोरु जान्वो मेsवतु कालिका ।
जंघे पातु महाभीमा गुल्फाववतु शूलिनी ॥ ७ ॥
पादयोः श्रीधरी रक्षेत् सर्वांगेsवतु भोगिनी ।
रक्तमज्जावसामांसान्यस्थिमेदांसि भैरवी ॥ ८ ॥
चामुंडा चैव वाराही कौमारी वैष्णवी तथा ।
माहेश्र्वरी च सर्वाद्दा जयश्री मंड्गला तथा ॥ ९ ॥
रक्षतुश्र्वायुधैर्दिक्षु मां विदिक्षु यथा तथा ।
इतीदं कवचं दिव्यं षण्मासात् सर्वसिध्दिदम् ॥ १० ॥
फलश्रुतिः
स्मरणात्कवचस्यास्य जयः सर्वत्र जायते ।
राजद्वारे स्मशाने च भूतप्रेताभिचारके ॥ ११ ॥
बंधने च महादुःखे जपेच्छत्रुसमागमे ।
प्रयोगं चाभिचारं च यो नरः कर्तृमिच्छति ॥ १२ ॥
आयुताश्र्च भवेत् सिद्धिः पठनात्कवचस्य तु ।
सर्वत्र लभते कीर्ति श्रीमान भवति धार्मिकः ॥ १३ ॥
भूर्जे विलिख्य कवचं गुटिका यस्तु धारयन् ।
मंत्रसिद्धिमवाप्नोति योगेश्र्वर्याः प्रसादतः ॥ १४ ॥
पुत्रवान् धनवान् श्रीमान नानाविद्दानिधिर्भवेत ।
अष्टोत्तरशतं जप्त्वा पुरश्र्चरणमस्य वै ॥ १५ ॥
सिद्धर्थं सर्वदा कुर्यात् योगिनी प्रीतिभाक् भवेत् ।
ब्रह्मास्त्रादीनि शाम्यन्ति तद्गात्रस्परशनात्ततः ॥ १६ ॥
इदं कवचमज्ञात्वा योगिनी भजते नरः ।
शतलक्षं जपित्वाsपि तस्य विद्दा न सिद्धयति ॥
१७ ॥
इति श्रीरुद्रयामले बहुरुपाष्टकप्रस्तावे ईश्र्वरपार्वतीसंवादे
योगेश्र्वरी कवचं संपूर्णम् ॥
श्रीयोगेश्वरीकवचाचा मराठी अर्थ
श्री गणेशाला नमस्कार. श्री
सरस्वतीदेवीला नमस्कार.
देवी म्हणाली
१-२) हे भगवंता! मंत्र-तंत्रादी
सर्व आपण सांगितले, पण कोठेही प्रसिद्ध न झालेल्या
योगिनी देवीच्या कवचाबद्दल, आपल्या कृपाप्रसादाने ऐकण्याची
माझी ईच्छा आहे. हे महादेवा, हे प्राणवल्लभा ते मला सांगा.
ईश्र्वर (भगवान शंकर) म्हणाले
३-५) हे देवी ही महाविद्दा सर्व
देव आणि ऋषींकडून पूजली जाते. याच विद्देच्या कटाक्षाने हरि तीन्हीलोकी विजयी
झाले. ब्रह्मदेव सृष्टिची निर्मिती करु शकले आणि मी संहार करणारा झालो. हीचेच स्मरण
केल्याने देवांना देवत्व प्राप्त झाले. हे प्राणवल्लभे या योगिनी (कवचा)चे रहस्य
ऐक. या कवचाचे नाव त्रैलोक्यसुंदर असे आहे.
श्री योगेश्र्वरी कवच मंत्राचा
महादेव हा ऋषी आहे. अनुष्टुप हा छंद आहे. देवता योगेश्र्वरी आहे. ऐं हे बीज आहे.
र्हीं ही शक्ति आहे.
श्रीं हे कीलक आहे.
श्रीयोगेश्र्वरीचा आशिर्वाद मिळावा म्हणून या जपाचा विनियोग सांगितला आहे.
अथ न्यास
डोक्याला स्पर्श करुन महादेव ऋषीनां स्मरणपूर्वक नमस्कार असो. मुखाला स्पर्श
करुन अनुष्टुप छंदाला नमस्कार असो.
ह्रदयाला स्पर्श करुन योगेश्र्वरी देवीला नमस्कार असो.
उजव्या स्तनाला स्पर्श करुन ऐं बीजाला नमस्कार असो.
डाव्या स्तनाला स्पर्श करुन र्हीं शक्तीला
नमस्कार असो.
नाभीला स्पर्श करुन श्रीं कीलकाला नमस्कार असो.
ऐं अंगठ्याला नमस्कार असो. ह्रदयाला नमस्कार असो.
र्हीं तर्जनीला नमस्कार असो. डोक्याला अर्पण.
श्रीं मधल्या बोटाला नमस्कार असो. शेंडीला स्पर्श
ऐं अनामिकेला नमस्कार असो. कवचाची निर्मिती
र्हीं कनिष्ठिकेला नमस्कार असो. तीनही
नेत्रांना स्पर्श
श्रीं उजव्या हाताच्या तळाला आणि पृष्ठाला नमस्कार.
अस्त्राची निर्मिती झाली म्हणून टाळी वाजवणे.
ध्यान
खड्ग आदी अस्त्रे, पात्र, मुसलधारण
केलेल्या व रक्ताळलेली मुडंकी गळ्यांत घातलेली अशी देवी योगेश्र्वरी नावाने
प्रसिद्ध आहे.
मानसोपचार पूजन
लं या बीजरुपाने पृथिव्यात्मक
असलेल्या श्रीयोगेश्र्वरी देवतेला मी गंधाची कल्पना करुन गंध अर्पण करतो.
हं या बीजरुपाने आकाशात्मक
असलेल्या श्रीयोगेश्र्वरी देवतेला मी फुलाची कल्पना करुन फुल अर्पण करतो.
यं या बीजरुपाने वाय्वात्मक
असलेल्या श्रीयोगेश्र्वरी देवतेला मी धूपाची कल्पना करुन धूप अर्पण करतो.
रं या बीजरुपाने तेजात्मक
असलेल्या श्रीयोगेश्र्वरी देवतेला मी दीपाची कल्पना करुन दिप अर्पण करतो.
वं या बीजरुपाने अमृतात्मक
असलेल्या श्रीयोगेश्र्वरी देवतेला मी नैवेद्दाची कल्पना करुन नैवेद्द अर्पण करतो.
सं या बीजरुपाने सर्वात्मक
असलेल्या श्रीयोगेश्र्वरी देवतेला मी तांबुलादि सर्वोपचाराची कल्पना करुन
तांबुलादी सर्वोपचार अर्पण करतो.
योगेश्र्वरी कवच
१) शांकरी माझ्या मस्तकाचे, नारायणी डोक्याचे, ऐं हे बीज कपाळाचे
आणि र्हीं हे बीज माझ्या उजव्या डोळ्याचे रक्षण करो.
२) श्रीं हे बीज डाव्या
डोळ्याचे, परास्मृता उजव्या कानाचे, डाव्या कानाचे नारसिंही आणि नाकाच्या मूळाचे खड्गिनी रक्षण करो.
३-४) मानिनी माझ्या नाकाचे, मुखाचे अंबिका, गालांचे भूतसंहारी,
ओठांचे भ्रामरी, माझ्या कंठाचे चण्डिका,
ह्रदयाचे विंध्यवासिनी, पोटाचे गिरिजा आणि
बेंबीचे भोगिनी रक्षण करो.
५) शुंभिनी पाठीचे, खांद्द्यांचे शूलधारिणी, हातांचे योगिनी
आणि कंबुकण्ठी माझ्या गळ्याचे रक्षण करो.
६-८) माझ्या कंबरेचे सुंदरी, गुप्तांगाचे गुह्येश्र्वरी, मेंढ्चे
कुंजिका आणि शांभवी बर्हीमार्गाचे रक्षण करो. ऊराचे भद्रकाली, गुडघ्यांचे कालिका, महाभीमा जंघेचे आणि गुल्फांचे
शूलिनी रक्षण करो. माझ्या पायांचे श्रीधरी, सर्वांगाचे
भोगिनी आणि रक्त, मज्जा, मांस, अस्थि, अवयव आणि चरबीचे भैरवी रक्षण करो.
९-१०) चामुंडा, वाराही, कौमारी, वैष्णवी,
माहेश्र्वरी, सर्वाद्दा, जयश्री आणि मंगला सर्व आयुधानीशी माझे सर्व दिशा, उपदिशांकडून
रक्षण करोत. असे हे दिव्य कवच सहा महीन्यांत सर्व सिद्धि देणारे आहे.
फलश्रुती
११-१३) कवचाचे स्मरण केले तरी
सर्वत्र विजय मिळतो. राजद्वारी, स्माशानांत,
भूतप्रेतांच्या मध्ये, बंधनांत, अतिदुःखांत, शत्रुनी घेरले असता, या कवचाचा जप केल्यावर विजय मिळतो. ज्या नराला या कवचाचा प्रयोग कराचा
असेल तो यशस्वी होतो. या कवचाच्या पठणामुळे निरनिराळ्या सिद्धिंची प्राप्ती होते.
सर्वत्र कीर्ति मिळते, संपत्ति मिळते आणि असा माणूस धार्मिक
होतो.
१४- १७) भूर्जपत्रावर लिहून हे
कवच धारण केले तर योगेश्र्वरीच्या प्रसादाने मंत्रसिद्धी होते. या कवचाचा एकशे
आठवेळा जप केल्यावर असा भक्त पुत्रवान, धनवान,
संपत्तिवान, नाना प्रकारच्या विद्दांचा ज्ञानी
होतो. हे कवच सिद्ध झाल्यावर योगिनी प्रसन्न होऊन अशा भक्तावर ब्रह्मास्त्राचा
काहिही परीणाम होत नाही व त्या त्या अवयवास स्पर्श केल्याने शांत होते. हे कवच न
जपता योगिनीची शतलक्ष जपांनी अगर अन्यप्रकारे केलेली भक्ति ही फळदायी होत नाही.
अशा प्रकारे हे रुद्रयामलामधिल
बहुरुपाष्टक प्रस्तावांतील ईश्र्वर-पार्वती संवादांतील योगेश्र्वरी कवच संपूर्ण
झाले.