Blog Views

रामाची कर्पूरआरती

रामाची कर्पूरआरती

धूप दीप झाला आता कर्पूर आरती । रामा कर्पूर आरती ॥
छत्र सिंहासनी बैसले जानकीपती । बैसले अयोध्यानृपती ॥ धृ ॥


कर्पूरवडीसम मानस माझे निर्मळ राहू दे । रामा निर्मळ राहू दे ॥
कर्पूरवडीचा भावभक्तिचा सुगंध वाहू दे । रामा सुगंध वाहू दे ॥
कर्पूरवडीची लावून ज्योत, पाहीन तव मूर्ति । रामा पाहीन तव मूर्ति ॥
छत्र सिंहासनी बैसले जानकीपती । बैसले अयोध्यानृपती ॥ १ ॥

ध्यान कळेना,ज्ञान कळेना ना कळे काही । रामा ना कळे काही ॥
शब्दरूपी गुंफ़ुनि माला वाहतो पायी । रामा वाहतो पायी ॥
मुखी नाम, नेत्री ध्यान, हृदयी तव मूर्ति । रामा हृदयी तव मूर्ति ॥
छत्र सिंहासनी बैसले जानकीपती । बैसले अयोध्यानृपती ॥२ 
॥ 

 


श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs