Blog Views

|| श्री दत्ताची आरती || (३)

श्री दत्ताची आरती
जय जय श्रीमद्गुरुवरदेवाधिदेवा । पंचारति हे चरणीं घडवी मज सेवा ॥जयदेव०॥

वास तुझा ब्रह्मांडीं चालक तूं देवा । अससी तूं सर्वांचा आनंदठेवा ।
वदती वेद सरस्वति न होय हा ठावा । कामति माझी नमितों पदिं देईं ठावा ॥१॥

सद्दाता तव महिमा वर्णितसे वेद । मोक्षाची सत्रें हीं ठेविलिं बहुसुखद ।
अतिदु:खें शक्ति नसे हरि माझा खेद । ज्ञानामृत पाजुनि दे अखंड तव पद ॥२॥

लीला अनंत तूझ्या वदता आनंत । चारी साही आठरा पाहता नच अंत ।
नारदव्यासमुनींद्र ध्याता नच येत । तो तूं देहा धरुनी देसि करीं स्वार्थ ॥३॥

पदिं गंगा कटिं शोभे शाटी कौपीन । हृदयीं लक्ष्मीकौस्तुभभृगुपदलांछन ।
दंडकमंडलु हातीं रवींसुदम वदन । राहो माझे हृदयीं हेंचि सदा ध्यान ॥४॥

आलिंगो त्वड्मूर्ती दिसोच हे नयना । ऐको कर्ण गुणांतें नामामृत रसना ।
त्वत्पदसुमगंध सदा लागो हा घ्राणा । दे परभक्ति श्रद्धा सतत करूं नमना 
॥५॥

समर्थ रामदास रचित || श्री नरसिंह पंचक ||

|| श्री नरसिंह पंचक || नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें। प्रगट रूप विशाळें दाविलें लोकपाळें। खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें। तट तट तट स्तंभि ...

Popular Blogs