Blog Views

आरती मल्हाराची

आरती मल्हाराची 

पंचानन हय वाहन सूर भूषित निळा
खंडा मंडित दंडित दानव अवळीला
मणी मल्ल मर्दूनी तो धूसर पिवळा
करी कंकण बाशिंगे सुमनांच्या माळा
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुरा भवदुस्तर तारी ll ll

सुरवर सत्वर वर दे मजलागी देवा
नाना नामे गाईल हि तुमची सेवा
अघटीत गुण गावया वाटतसे हेवा
फणीवर शिणला तेथे नर पामर केवा
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुरा भवदुस्तर तारी ll ll

रघुवरस्मरणी शंकर हृदयी निवाला
तो हा मल्लांतक अवतार झाला
यालागी आवडे भावे वर्णिला
रामी रामदास जिवलग भेटला
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुरा भवदुस्तर तारी ll ll

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs