भगवान शिवाचे शुभ चिन्ह
भगवान शिवाचे शुभ चिन्ह खूप महत्वाची आहेत. त्यांच्या
प्रत्येक शुभ चिन्हाच्या मागे काही न काही गुपिते दडलेले आहे.
जसे आकड्याचे फुल, बिल्वपत्र,
पाणी, दूध आणि चंदनाच्या व्यतिरिक्त इतर काही
गोष्टी त्यांना आवडतात.
१) शिवलिंग
भगवान शिवाचे निर्गुण आणि
निराकार रूपाचे प्रतीक असलेले शिवलिंग ब्रह्मा, आत्मा आणि
ब्रह्माण्डाचे प्रतीक आहे. वायु पुराणानुसार प्रलय काळात सर्व सृष्टी ज्यामध्ये
मिळून जाते आणि पुन्हा सृष्टीकाळात ज्यापासून सृष्टी प्रगट होते त्यालाच शिवलिंग
असे म्हणतात.
२) त्रिशूळ
भगवान शिव यांच्याजवळ नेहमी एकच
त्रिशूळ असायचं. त्रिशूल हे तीन प्रकाराच्या दैनंदिन, दैवीय,
शारीरिक त्रासांच्या नायनाट करण्याचे सूचक आहेत. या मध्ये सत,
रज आणि तम तीन प्रकारच्या शक्ती आहे. त्रिशुळाचे तीन शूळ सृष्टीच्या
उदय, संरक्षण आणि लयीभूत होण्याचे प्रतिनिधित्व करतात.
शैवमतानुसार शिव या तिन्ही भूमिकांचे अधिपती आहेत. हे शैव सिद्धांताच्या पशुपती,
पशु आणि पाश यांचे प्रतिनिधित्व करतात. अशी आख्यायिका आहे की हे
महाकालेश्वराचे ३ काळ (वर्तमान, भूत, भविष्य)
चे प्रतीक आहे. या व्यतिरिक्त हे स्वपिण्ड, विश्व आणि
शक्तीच्या सर्वोच्च स्थानासह एक होण्याचे प्रतीक आहे. हे डाव्या भागास इडा,
दक्षिणेत पिंगळा आणि मध्य देशात असलेल्या सुषुम्ना नाड्यांचे प्रतीक
आहेत.
३) रुद्राक्ष
अशी आख्यायिका आहे की
रुद्राक्षाचा जन्म शिवाच्या अश्रूंपासून झाला आहे. धार्मिक ग्रंथानुसार २१ मुखी
रुद्राक्ष असल्याचे पुरावे आहेत, पण सध्या १४ मुखीनंतरचे
सर्व रुद्राक्ष दुर्गम आहेत. हे धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. रक्त प्रसरण
देखील संतुलित राहतं.
४) त्रिपुंड टिळक
भगवान शिव कपाळी त्रिपुंड टिळक
लावतात. हे तीन लांब पट्ट्या असलेले टिळक असतं. हे त्रेलोक्य आणि त्रिगुणांचे
प्रतीक आहेत. हे सतोगुण, रजोगुण आणि तपोगुणाचे प्रतीक आहेत.
त्रिपुंड दोन प्रकारचे असतात - पहिले तीन पट्ट्यांच्या मध्ये लाल रंगाचे ठिपके
किंवा बिंदू असते. हा ठिपका शक्तीचा प्रतीक आहेत. सामान्य माणसाने अश्या प्रकाराचे
त्रिपुंड लावू नये. दुसरे असतात फक्त तीन पट्ट्या असलेले त्रिपुंड. यामुळे मन
एकाग्र होतं.
५) रक्षा किंवा उदी
शिव आपल्या शरीरावर उदी किंवा
अंगारा लावतात. उदी जगाच्या निरर्थकतेचा बोध करवते. उदी आकर्षण, मोह, इत्यादी पासून विरक्तीची प्रतीक आहे. देशातले
एकमेव स्थळ उज्जैनच्या महाकाळ देऊळात शिवाची भस्मारती होते. यामध्ये स्मशानेतील
राख किंवा रक्षाचा वापर करतात. यज्ञाच्या रक्षेत अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात.
प्रलय आल्यावर साऱ्या जगाचे नायनाट झाल्यावर उरते फक्त रक्षा. अशीच स्थिती आपल्या
शरीराची देखील असते.
६) डमरू
आपल्या हिंदू धर्मात सर्व देवी
आणि देवतांकडे कोणते न कोणते वाद्य असतातच. त्याच प्रकारे भगवान शिवाकडे डमरू असे
जे नादाचे प्रतीक आहे. भगवान शिवाला संगीताचे जनक मानतात. त्यांच्या आधी कोणाला ही
गाणं, नाचणं आणि वाजवणं येत नसे. नाद म्हणजे एक अशी ध्वनी
किंवा आवाज जो संपूर्ण विश्वात सतत येत असतो ज्याला 'ॐ'
असे म्हणतात. संगीतात अन्य स्वर ये- जा करतात, त्यांचा मधील असलेला स्वरच नाद किंवा आवाज आहे. नादातूनच वाणीच्या चारही
रूपांचे 1. पर, 2. पश्यंती, 3. मध्यमा और 4. वैखरीचे जन्म झाले आहेत.
७) कमंडळु
या मध्ये पाणी भरलेले असतं जे
अमृताचे प्रतीक आहे. कमंडळु प्रत्येक योगी किंवा संतांकडे असतं.
८) हत्तीची चामडं आणि वाघाची चामडं
शिव आपल्या शरीरांवर हस्ती आणि
व्याघ्रची चामडी किंवा कातडी घालतात. हस्ती म्हणजे हत्ती आणि व्याघ्र म्हणजेच वाघ
किंवा सिंह. हत्ती हे अभिमानाचं आणि वाघ हिंसेचे प्रतीक आहे. शिवजींनी अहंकार आणि
हिंसा दोघांना डांबून ठेवले आहेत. वाघ शक्ती आणि सत्तेचे प्रतीक आहे आणि शक्तीच्या
देवीचं वाहन आहे. भगवान शिव नेहमीच या वर बसतात किंवा धारण करतात. हे दर्शविणारे
आहे की शिव हे शक्तीचे स्वामी आहेत आणि सर्व शक्ती पासून हे वर आहेत.
९) शिव कुंडळ
हिंदू धर्मात कान टोचण्याचा
संस्कार सोहळा असतो. शैव, शक्ती आणि नाथ संप्रदायामध्ये
दीक्षा घेताना कान टोचून त्यात मुद्रा किंवा कुंडळे घालण्याची पद्धत आहे प्राचीन
मूर्तींमध्ये शिव आणि गणपतींच्या कानात सर्पकुंडळे, उमा आणि
इतर देवींच्या कानात शंख किंवा पत्रकुंडळे आणि विष्णूंच्या कानात मकर कुंडळे
दिसतात.
दोन कानातले ज्यांना 'अलक्ष्य'
(कोणत्याही माध्यमातून दर्शविला जाऊ शकत नाही), आणि निरंजन (जे नश्वर डोळ्याने बघितले जाऊ शकत नाही) देवानेच घातले आहेत.
लक्षात घेण्यासारखे असे की देवांच्या डाव्या कानातील कुंडळे स्त्री रूपाने वापरली
आहेत आणि उजव्या कानातील कुंडळे पुरुष स्वरूपाने वापरलेले आहेत. दोन्ही कानातील
कुंडळे शिव-शक्तीच्या स्वरूपाचे सृष्टीच्या सिद्धांताचा प्रतिनिधित्व करतात.
१०) चंद्र
शिवाचे एक नाव "सोम"
देखील आहे. सोमचे अर्थ आहे चंद्र. शिवाने चंद्रमा धारण करणं म्हणजे मनाला आपल्या
ताब्यामध्ये घेण्याचे प्रतीक आहेत. जगातील पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ येथे
चंद्रमानेच स्थापिले होते. मुळातच शिवाचे सगळे सण आणि उत्सव चन्द्रमासावर अवलंबीत
असतात. शिवरात्री, महाशिवरात्री इत्यादी शिवाशी निगडित
सणांमध्ये चंद्रकलांचे महत्व आहेत. हे अर्धचंद्र शैवपंथी आणि चंद्रवंशीचे पंथाचे
प्रतीक आहे. मध्य अशियात हे त्या जातींच्या लोकांच्या झेंड्यावर बनलेले असायचे.
चंगेज खानच्या झेंड्यावर अर्धचंद्र असे. या अर्धचन्द्राचे झेंड्यावर असल्याचं एक
वेगळाच इतिहास आहे.
११) जटा आणि गंगा
शिव हे अंतराळाचे देव आहेत.
त्यांचे नाव व्योमकेश असे, तर आकाश त्यांची जटा आहेत. जे
वातावरणाचे प्रतीक आहेत. वायू आकाशात पसरलेली असते. सौरमंडळाच्या वरील
परमेष्ठीमंडळ आहे. त्याचा अर्थपूर्ण घटकाला गंगा म्हटले आहेत. म्हणून गंगा
शिवाच्या जटांमध्ये वाहते. शिव रुद्रस्वरुप, तापट आणि
विध्वंसक रूप घेतलेले आहेत. गंगेला जटेमधे धारण केल्यापासूनच शिवाला पाणी
घालण्याची प्रथा सुरु झाली. ज्यावेळी गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणावयाचे ठरले
तेव्हा हा प्रश्न उद्भवला की गंगेच्या या अफाट वेगामुळे पृथ्वीला छिद्र पडू शकतो,
त्यामुळे गंगा पाताळात सामावले. अश्या परिस्थितीत भगवान शंकराने
गंगेला आपल्या जटेमधे बसवले आणि मगच गंगा पृथ्वीवर अवतरविली. गंगोत्री
तीर्थक्षेत्र या घटनेचे साक्षीदार आहेत.
१२) वासुकी आणि नंदी
वृषभ हे शिवाचे वाहन आहेत. ते
नेहमीच शिवासोबत असतात. वृषभ म्हणजे धर्म. मनुस्मृतीनुसार 'वृषो
हि भगवान धर्म:
'. वेदांनी धर्माला ४ पायांचे प्राणी
म्हटलं आहे. त्यांचे ४ पाय म्हणजे धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष आहे. महादेव या ४ पाय असलेल्या
वृषभाची स्वारी करतात. म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष त्याचा स्वाधीन आहेत. एका मान्यतेनुसार,
वृषभाला नंदी देखील म्हणतात, जे शिवाचे एक गण
आहे. नंदीनेच धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, कामशास्त्र आणि मोक्षशास्त्राची रचना केली होती. त्याचप्रमाणे शिवाला
नागवंशींशी जवळीक होता. नाग कुळाचे सगळे लोकं शिवक्षेत्र हिमालयात वास्तव्यास
होते. काश्मिरातील अनंतनाग या नागवंशीचे गढ असे. नागकुळातील सर्वजण शैव धर्माचे
पालन करायचे. भगवान शिवाचे नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या नावानेच स्पष्ट आहे की
नागांचे इष्ट देव असल्यामुळे शिवाचे नागाशी सलोख्याचे संबंध आहे. भारतात
नागपंचमीला नागांच्या पूजेची परंपरा आहे. विरोधी भावनांमध्ये सुसंवाद स्थापित
करणारे शिव नाग किंवा सापासारख्या भयंकर जीवाला आपल्या गळ्यातील हार बनवतात.
गुंडाळलेला नाग किंवा साप जखडलेल्या कुंडलिनीच्या सामर्थ्याचे प्रतीक आहेत.
साभार.....
(सतीश अलोणी)