जय देवी मंगळागौरी ॥ ओवाळीन सोनियाताटी ॥ रत्नांचे दिवे ॥ माणिकांच्या वाती ॥ हिरेया मोती ज्योती ॥ ध्रु० ॥
मंगळमूर्ती उपजली कार्या ॥ प्रसन्न झाली अल्पायुषी ॥ राया तिष्ठली राजबाळी ॥ अहेवपण द्यावया ॥ जय० ॥१॥
पूजेला ग आणिती जाईच्या कळ्या ॥ सोळा तिकटी सोळा दूर्वा ॥ सोळा परीची पत्री ॥
जाई जुई आबुल्या शेवंतू नागचांफे ॥ ध्रु० ॥
पारिजातकें मनोहरें ॥ गोकर्ण महाफुले ॥ नंदेटें तगरें ॥
पूजेला ग आणिली ॥ जय० ॥ २ ॥
साळीचे तांदूळ मुगाची डाळ ॥ अळणी खिचडी रांधिती नार ॥ आपुल्या पतीलागी सेवा करिती फार ॥ जय० ॥ ३ ॥
डुमडुमे डुमडुमे वाजंत्रे वाजती ॥ कळावी कांकणे हाती शोभाती ॥ शोभती बाजुबंद ॥ कानीं कापांचे गबे ॥
ल्यायिली अंबा शोभे ॥ जय० ॥ ४ ॥
न्हाउनी माखुनी मौनी बैसली ॥ पाटावाची चोळी क्षीरोदक नेसली ॥ स्वच्छ बहुत होउनी ॥ अंबा पूजा बैसली ॥ जय० ॥ ५ ॥
सोनियाचे ताटी ॥ घातिल्या आता ॥
नैवेद्य षड्रस पक्वान्न ॥ ताटीं भरा बोने जय० ॥ ६ ॥
लवलाहे तिघे काशी निघाली ॥ माऊली मंगळागौरी भिजवू विसरली ॥
मागुती परतुनिया आली ॥ अंबा स्वयंभू देखिली ॥
देऊळ सोन्याचा ॥ खांब हिरेयांचे ॥ वरती कळस मोतियांचा ॥ जय० ॥ ७ ॥