Blog Views

रेशमी वस्त्र ....सोवळे नेसून पूजा का करतात ?

रेशमी वस्त्र ....सोवळे नेसून पूजा का करतात ?

सोवळे हे रेशमापासून बनवलेले असते. रेशमी कापडाचा गुणधर्मच धूळ आकृष्ट न करण्याचा असतो . सुती कापड वापरण्यास चांगले असले तरीसुद्धा सुती कापड धूळ आकृष्ट करून घेते. व तसेच काही जणांची त्वचा sensitive (संवेदनशील) असते त्यामुळे नवेकोरे सुतीकापड अंगावर घातल्यास त्रास होतो. त्यामुळे सुती कापड हे शक्यतो एकदा तरी धूवूनच वापरतात. आणि सुती कापडाचा धूळ आकृष्ट करण्याचा गुणधर्म असल्यामुळे ते वारंवार धुवून घ्यावे लागते. 

परंतु रेशमी कापड हे नवेकोरे वापरले तरीही त्याचा त्वचेला त्रास होत नाही व धूळ आकृष्ट न करण्याचा गुणधर्म असल्यामुळे ते वारंवार धुवून घ्यावे लागत नाही. 

तसेच सुती कापडाच्या तुलनेत रेशमी कापड वजनास हलके असते. रेशमी कापड हे hypoallergenic असते त्यामुळे त्वचेला त्रास होत नाही .

हे रेशमी कापड थंडीच्या दिवसात गरम आणि गरमीच्या दिवसात थंड असते. व तसेच रेशमी कापड त्वचेवरील घाम शोषूण घेते त्यामुळे त्वचा कोरडी राहते म्हणून घामामुळे त्वचेला त्रास होत नाही . 

स्वाभाविकतःच हे रेशमी कापड मऊ व चमकदार असते व त्यामुळेच ते शाही दिसते .

*हे आहे वैज्ञानिक कारण सोवळे नेसण्याचे...

किरण गद्रे

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs