Blog Views

श्री सुर्यस्तुती

श्रीसूर्यस्तुति

जयाच्या रथा एकची चक्र पाहीं। नसे भूमि आकाश आधार कांहीं॥ असे सारथी पांगुळा ज्या रथासी। नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥१ ॥ करीं पद्म माथां किरीटी झळाळी। प्रभा कुंडलांची शरीरा निराळी॥पहा रश्मि ज्याची त्रिलोकासि कैसी। नमस्कार ०॥२॥ सहस्रद्वयें दोनशे आणि दोन । क्रमी योजनें जो निमिषार्धतेन ॥ मन कल्पवेना जयाच्या त्वरेसी। नमस्कार० ॥३॥ विधीवेदकर्मासि आधारकर्ता । स्वधाकार स्वाहादि सर्वत्र भोक्ता ॥ असे अन्नदाता समस्तां जनांसी। नमस्कार०॥४॥ युगें मंत्र कल्पांत ज्याचेनि होती। हरिब्रह्मरुद्रादि ज्या बोलिजेती ॥ क्षयांतीं महाकाळरूप
प्रकाशी॥ नमस्कार० ॥५ ॥ शशी तारका गोवुनी जो ग्रहांतें। त्वरें भेरु वेष्टोनियां पूर्वपंथें ॥ भ्रमें जो सदा लोक रक्षावयासी। नमस्कार०॥६॥ समस्तां सुरांमाजि तूं जाण च्या म्हणोनीच तू श्रेष्ठ त्या नाम सूर्या ।। दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशीं। नमस्कार॥७॥ महामोह तो अंधकारासि नाशी । प्रभा शुद्ध सत्त्वाचि अज्ञान नाशी। अनाथां कृपा जो करी नित्य ऐसी। नमस्कार० ॥८॥ कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची । न चाहूं शके शत्रु त्याला विरिची ॥ उभ्या राहती सिद्धि होऊनि दासी। नमस्कार०९।। फळे चंदने आणि पुष्पेंकरोनी। पुजावें बरें एकनिष्ठा धरोनी।। मनीं इच्छिलें पाविजे त्या सुखासी। नमस्कार० ॥१०॥ नमस्कार साष्टांग बापा स्वभावें। करोनी तया भास्कर लागी घ्यावें ॥ दरिदें सहस्रादि जो क्लेश नाशी ॥ नमस्कार० ॥११ ॥ वरी सूर्य आदित्य मित्रादि भानू। विवस्वान इत्यादिही पादरेणू ॥ सदा वांच्छिती पूज्य ते शंकराची। नमस्कार०॥१२॥

श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs