जय जय कृष्ण नाथा तिन्ही लोकींच्या ताता
आरती ओवळीता हरली घोर भव चिंता ।।धृ।।
धन्य ते गोकुळ हो जेथे करी कृष्ण लीला
धन्य ती देवकी माता कृष्ण नवमास जोपासला।।1।।
धन्य तो वासुदेव कृष्ण गुप्त पणे रक्षिला
धन्य ती यमुना माई कृष्णा पदी ठेवी माथा ।। 2 ।।
धन्य ती नंद यशोदा ज्यांनी प्रभू खेळविला
धन्य ते बाळ गोपाळ कृष्ण देई दही काला।।3।।
धन्य ते गोप गोपी अनुभवती सुख सोहळा
धन्य राधा रुक्मिणी जणू कृष्ण भक्ती सरिता ।।4।।