Blog Views

कोमल वाचा दे रे राम


परमपूज्य श्रीसमर्थ रामदास स्वामींनी प्रभु श्रीरामचंद्रांकडे मागितलेली ही उदात्त व पावन भिक्षा ! 
या भिक्षेतुन मानवी जीवनाच्या उन्नयनासाठी आवश्यक
 सद्‌गुणांची जाणीव श्रीसमर्थ सर्व समाजाला करुन देत आहेत व तेच मागणे प्रभुकडे मागत आहेत!
मध्यंतरी पू. आचार्य श्रीगोविंददेव गिरीजी महाराजांच्या 'पावन भिक्षेचे' महत्व विषद करणार्‍या लेखासह हे रेखाचित्र साकारण्याचा सुयोग लाभला!
चित्रकार गोपाळ नांदुरकर.

कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम ।

प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम ॥

हीत कारक दे रे राम, जन सुख कारक दे रे राम ।

अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम ॥

विद्या वैभव दे रे राम, ऊदासिनता दे रे राम ।

मागो नेणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम ॥

तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम ।

संगीत गायन दे रे राम, अलाप गोडी दे रे राम॥

धात माता दे रे राम, अनेक घाटी दे रे राम।

रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम॥

दस्तक टाळी मज दे रे राम, नृत्य कला मज दे रे राम।

प्रबंध सरली दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम ॥

सावध पण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम।

दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम ॥

पावन भिक्षा दे रे राम, दिन दयाळा दे रे राम।

अभेद भक्ती दे रे राम, आत्म निवेदन दे रे राम ॥

तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम ।

सज्जन संगती दे रे राम, अलीप्त पण मज दे रे राम ॥

ब्रह्म अनुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम ।

मजवीण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम॥

चित्रकार Gopal Nilkanth Nandurkar यांच्या भिंतीवरून साभार....

दीप ज्योती मंत्र (शुभं करोति कल्याणमारोग्यं)

दीप ज्योती मंत्र  शुभं करोति कल्याणमारोग्यं धनसंपदा। शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते॥ दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः। दीपो...

Popular Blogs