Blog Views

श्री देवीची आरती



श्री देवीची आरती

दुर्गे दुर्गट भारी तुजविण संसारी
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरणाते वारी
हारी पडलो आता संकट निवारी॥१॥
जयदेवी जयदेवी महिषासुरमर्दिनी
सुरवरईश्वरदे तारक संजीवनी जयदेवी जयदेवी

त्रिभुवनी भुवनी पाहता तुजाऎसी नाही
चारही श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करता पडीले प्रावाही
ते तु भक्तलागी ते तु दासालागी पावसि लवलाही ॥ २॥
जयदेवी जयदेवी ....

प्रसन्न वदने प्रसन्ने होसी निजदासा
क्लेशापासुनी सोडी तोडी भवपाशा
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा
नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥३॥
जयदेवी जयदेवी ....




श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs