Blog Views

॥ मारुती स्तोत्र ॥


** मारुती स्तोत्र **

भीमरुपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसुता, रामदुता प्रभंजना ॥ १ ॥
महाबळी प्राणदातां, सकळा ऊठवी भयें
सौख्यकारी दु:ख हारी, दुत वैश्णव गायका ॥ २ ॥
दिनानाथा हरीरुपा, सुंदरा जगदंतरां
पातालदेवता हंता, भव्य सिंदुर लेपना ॥ ३ ॥
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातनां
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परीतोषका ॥ ४ ॥
ध्वजांगे उचले बाहो, आवेशे लोटला पुढें
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखता कांपती भयें ॥ ५ ॥
ब्रह्मांडे माईलीनेणों, आंवळे दंतपंगती
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठील्या बळें ॥ ६ ॥
पुच्छ ते मुर्डिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं
सुवर्ण कटि कांसोटी, घंटा किंकिणि नागरा ॥ ७ ॥
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्ल्तेपरी  ॥ ८ ॥
कोटीच्या कोटी उड्डाणें, झेपावें उत्तरेकडे
मंद्राद्रीसारखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ॥ ९ ॥
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ॥ १० ॥
अणुपासोनि ब्रह्मांडा, एवढा होत जातसे
तयासी तुळणा कोठे, मेरुमंदार धाकुटे ॥ ११ ॥
ब्रह्मांडाभोवतें वेढे, वज्रपुच्छें करुं शकें
तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडी पाहतां नसे ॥ १२ ॥
आरक्त देखिलें डोळां, ग्रासिले सुर्यमंडळा
वाढतां वाढतां वाढे, भेदिले शुन्यमंडळा  ॥ १३ ॥
धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समस्तही
पावती रुपविद्यादि, स्तोत्र पाठे करुनियां ॥ १४ ॥
भूतप्रेतसमंधादी, रोग व्याधीसमस्तही
नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ॥ १५ ॥
हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी
दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळा गुणें ॥ १६ ॥
रामदासीं अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू
रामरुपी अंतरात्मा, दर्शने दोष नासती   ॥ १७ ॥

इति श्री रामदासकृतं
संकटनिरसनं मारुतीस्तोत्रं संपूर्णंम् ।

***********





श्री स्वामी समर्थ आरती

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!!   छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसीभ...

Popular Blogs