Blog Views

स्वामी स्तवन (नाही जन्म नाही नाम )

स्वामी स्तवन


नाही जन्म नाही नाम । नाही कुणी माता पिता ।
प्रकटला अद्भुतसा । ब्रह्मांडाचा हाच पिता ॥१॥

नाही कुणी गुरुवर । स्वये हाच सुत्रधार ।
नवनाथी आदिनाथ । अनाथांचा जगन्नाथ ॥२॥

नरदेही नरसिंह । प्रकटला तरुपोटी ।
नास्तिकाच्या कश्यपूला । आस्तिकाची देण्या गती ॥३॥

कधी चाले पाण्यावरी । कधी धावे अधांतरी ।
यमा वाटे ज्याची भीती । योगेश्वर हाच यती ॥४॥

कधी जाई हिमाचली । कधी गिरी अरवली ।
कधी नर्मदेच्या काठी । कधी वसे भीमा तटी ॥५॥

काली माता बोले संगे । बोले कन्याकुमारीही।
अन्नपुर्णा ज्याचे हाती । दत्तगुरु एक मुखी ॥६॥

भारताच्या कानोकानी । गेला स्वये चिंतामणी ।
सुखी व्हावे सारे जन । तेथे धावे जनार्दन ॥७॥

प्रज्ञापुरी स्थिर झाला । माध्यान्हीच्या रविप्रत ।
रामानुज करी भावे । स्वामी-पदा दंडवत ॥८॥

समर्थ रामदास रचित || श्री नरसिंह पंचक ||

|| श्री नरसिंह पंचक || नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें। प्रगट रूप विशाळें दाविलें लोकपाळें। खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें। तट तट तट स्तंभि ...

Popular Blogs